Rajmata Jijau Free Cycle Scheme | राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना | Best Government schemes information in Marathi 2024 –
शिक्षण हे सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण आहे. परंतु शिक्षण घेण्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी येतात तसेच शाळा जवळ नसल्याकारणाने दूरवरून प्रवास करावा लागतो. दूरवरून प्रवास करण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुद्धा काहींची चांगली नसते. परंतु अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारतर्फे काही योजना राबवल्या जात असतात त्या योजनांपैकी एक योजना म्हणजे राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना ( Rajmata Jijau Free Cycle Scheme ).
या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल दिली जाते. जाणून घेऊयात या योजनेबद्दल अधिक माहिती…
– राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत ज्या दारिद्र्य रेषेखालील मुली शाळेमध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकत आहेत, त्यांना मोफत लेडीज सायकल वाटप केली जाते.
– राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेमुळे नक्कीच मुलींना शिक्षणामध्ये येणारे अडथळे कमी होण्यामध्ये मदत होईल तसेच दारिद्र्य रेषेखालील मुलींना शिक्षणाकडे आकर्षित करणे सुद्धा सोपे होईल.
– राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना ही योजना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे राज्यांमधील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे.
– प्रत्येक वर्षी 20 कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेसाठी देण्यात येतो.
– राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना ही मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे तसेच मुलींचे जीवनमान सुधारण्यामध्ये सुद्धा या योजनेमुळे मदत होऊ शकते.
– ज्या विद्यार्थिनींचे आर्थिक परिस्थिती चांगली नाही परंतु शाळेसाठी त्यांना दूरवर प्रवास करावा लागतो अशा विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेमुळे मोफत सायकल मिळते आणि त्यामुळे शाळेपर्यंतच्या प्रवासासाठी सायकल घेण्याकरता कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता मुलींना भासणार नाही.
– विद्यार्थिनींनी सायकलवर प्रवास केल्यामुळे शाळेपर्यंत पायी जाण्याचा वेळ हा वाचेल आणि या वेळेचा सदुपयोग अभ्यासासाठी तसेच इतर चांगल्या कामांसाठी करता येईल.
Rajmata Jijau Free Cycle Scheme अंतर्गत दिला जाणारा प्राधान्यक्रम –
लाभार्थी मुलीची निवड करताना तसेच मुलींना प्राधान्य देण्यात येईल.
पुढील भागातील विद्यार्थिनींना प्राधान्य देण्यात येईल –
– दुर्गम/अतिदुर्गम ग्रामीण भाग
– शहरी भागातील झोपडपट्टी/गलिच्छ वस्तीतील
Rajmata Jijau Free Cycle Scheme चे लाभार्थी
इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांमधील विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ घेता येईल.
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत मिळणारा लाभ –
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल खरेदी करण्याकरिता 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. हे आर्थिक सहाय्य पात्र विद्यार्थिनीच्या किंवा तिच्या पालकांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.
– अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
– इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांमधील विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ घेता येईल.
– दुर्गम/अतिदुर्गम ग्रामीण भाग आणि शहरी भागातील झोपडपट्टी/गलिच्छ वस्तीतील विद्यार्थिनींना प्राधान्य देण्यात येईल.
राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजनेच्या अटी व शर्ती –
– या योजनेसाठी लाभार्थी असणाऱ्या विद्यार्थिनीला सायकल खरेदी केल्याची बिल शाळेमध्ये जमा करणे गरजेचे आहे.
– राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्य मधील विद्यार्थिनींनाच घेता येईल.
– इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांमधील विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ घेता येईल, या योजनेचा लाभ मुलांना घेता येणार नाही.
– राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना ही ग्रामीण आणि नगरपरिषद क्षेत्रामधील शाळांसाठीच लागू असेल.
– अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीची शाळा आणि घर यामध्ये किमान दोन किलोमीटर अंतर असणे आवश्यक आहे.
– इतर कुठल्याही केंद्र किंवा राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन अर्जदार विद्यार्थिनीने सायकलचा लाभ घेतलेला असल्यास राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– अर्जदार विद्यार्थिनीला सातवी मध्ये किमान 75 टक्के गुण असणे गरजेचे आहे.
– अर्जदार विद्यार्थिनींचे आई-वडील किंवा घरातील इतर कोणतीही व्यक्ती सरकारी कार्यालयात नोकरीस नसावी.
– या योजनेचा लाभ शहरी भागामधील विद्यार्थिनींना घेता येणार नाही.
– अर्जदार विद्यार्थिनी शिक्षण घेत असलेली शाळा ही शासन मान्यता प्राप्त अनुदानित असावी.
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Rajmata Jijau Free Cycle Scheme –
– अर्जदार विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा अर्ज त्यांच्या क्षेत्रामधील जिल्हा कार्यालयामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जाऊन घ्यावा.
– अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी , सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी व त्यानंतर अर्ज जमा करावा.
– संबंधित अधिकाऱ्यांकडून अर्जाची व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करून पात्र असल्यास या योजनेचा लाभ दिला जाईल.
किंवा
– पात्र विद्यार्थिनींनी त्यांच्या शाळेतून राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा अर्ज घ्यावा.
– अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज शाळेमध्ये जमा करावा.
– शाळेमधून तो अर्ज शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जमा केला जाईल.
– संबंधित अधिकाऱ्यांकडून अर्जाची व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करून पात्र असल्यास या योजनेचा लाभ दिला जाईल.