Reliance Foundation Scholarship | २ लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची सुवर्णसंधी | रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप | Best Scholarships 2024
आजच्या ब्लॉगमध्ये विद्यार्थ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची एक सुवर्णसंधी म्हणजेच रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप ( Reliance Foundation Scholarship ) या स्कॉलरशिप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत….
Reliance Foundation Scholarship | २ लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची सुवर्णसंधी | रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप | Best Scholarships 2024
Table of Contents
Reliance Foundation Scholarship | रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप –
– दरवर्षी 5000 गुणवंत विद्यार्थ्यांना रिलायन्स फाउंडेशन अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिप त्यांच्या पदवी पूर्व महाविद्यालयीन शिक्षणासाठी मदत करते.
– विद्यार्थ्यांना कुठलाही आर्थिक भार न उचलता त्यांचा अभ्यास व्यवस्थित सुरू ठेवता यावा आणि विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यामध्ये तसेच यशस्वी होण्यामध्ये आणि भारतामधील भविष्यामध्ये सामाजिक किंवा आर्थिक विकासामध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे असा रिलायन्स फाउंडेशन अंडरग्रॅज्युएट स्कॉलरशिपचा उद्देश आहे.
– 15 लाख रु.पेक्षा कमी घरगुती उत्पन्न असलेले विद्यार्थी , त्यांच्या पदवीपूर्व अभ्यासाच्या पहिल्या वर्षात (शैक्षणिक वर्ष 2024-25) नोंदणी केलेले या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात. मुली आणि विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अर्जांना प्रोत्साहन देण्याचाही या प्रोग्रॅमचा उद्देश असेल.
– निवडलेल्या स्कॉलर्सला त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीत 2 लाखांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळेल.
– शिष्यवृत्ती अनुदानाव्यतिरिक्त, रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रेजुएट स्कॉलरशिप स्कॉलर्सला माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कचा भाग बनण्याची संधी आणि सक्षम सपोर्ट सिस्टीम उपलब्ध करेल, ज्यामुळे त्यांना करियर यशस्वीरित्या घडवण्यासाठी मार्गदर्शन होईल.
रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती वैशिष्ट्ये | features of Reliance foundation scholarship –
– पदवीपूर्व महाविद्यालयीन शिक्षणासह देशाच्या कानाकोपऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना सपोर्ट देणे.
– त्यांच्या आवडीच्या कोणत्याही प्रवाहाचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे.
– गुणवंत विद्यार्थ्यांना मेरिट-कम-मीन्स आधारावर पुरस्कृत केले जाते.
– 5,000 पर्यंत पदवीधर स्कॉलर्स निवडले जातील.
– पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीत उपलब्ध शिष्यवृत्तीची एकूण रक्कम २ लाखांपर्यंत असेल.
– शिष्यवृत्तीमुळे आर्थिक सहाय्याच्या पलीकडे विद्यार्थ्यांना मजबूत माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कद्वारे आपोआप नेटवर्किंगच्या संधी मिळतील.
Reliance Foundation Scholarship Eligibility criteria I रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता निकष :
अर्ज करण्यासाठी तुम्ही पुढील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत:
– भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
– इयत्ता 12वी किमान 60% सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
– सध्या कोणत्याही प्रवाहातील नियमित फुल टाईम पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षी (शैक्षणिक वर्ष 2024-25) नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
– हाऊस होल्ड उत्पन्न रु. १५ लाखापेक्षा कमी असलेले विद्यार्थी (रु. २.५ लाख पेक्षा कमी असलेल्यांना प्राधान्य)
– ॲपटीट्यूड टेस्ट अनिवार्य आहे.
पुढील विद्यार्थी रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत:
– जे विद्यार्थी दुसऱ्या वर्षात आहेत किंवा त्यापेक्षा पुढील वर्षात शिक्षण घेत आहेत (शैक्षणिक वर्ष 2023-24 किंवा त्यापूर्वी पासून त्यांचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत)
– ऑनलाइन, हायब्रीड, रिमोट, डिस्टन्स किंवा इतर कोणत्याही नॉन-रेग्युलर पद्धतींद्वारे पदवी मिळवणारे विद्यार्थी.
– इयत्ता दहावीनंतर डिप्लोमा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
– 2 वर्षांचा पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रम करत असलेले विद्यार्थी .
– जे विद्यार्थी अनिवार्य ॲपटीट्यूड चाचणीला उत्तर देत नाहीत किंवा परीक्षेदरम्यान फसवणूक करताना आढळतात.
Reliance Scholarship | रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप या स्कॉलरशिप बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.
Reliance Foundation Scholarship | रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा.
वरील लिंक वर क्लिक करून Click here to apply या ऑप्शन वर क्लिक करा आणि पुढील प्रोसेस फॉलो करा.