बेस्ट वर्क फ्रॉम होम कमवा २ हजार रोज । Remote Jobs I No interview Remote Jobs | iconik Marathi | Best job opportunities 2024

बेस्ट वर्क फ्रॉम होम कमवा २ हजार रोज । Remote Jobs I No interview Remote Jobs | iconik Marathi

       तुम्ही घरूनच करता येईल अशी नोकरी शोधत आहात का? तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक अप्रतिम अपडेट आहे. असे Remote Jobs प्लॅटफॉर्म सांगणार आहोत की जे 15 ते 60 वयोगटातील व्यक्तींद्वारे करता येणाऱ्या रिमोट जॉब्स ऑफर करते. तुम्ही विद्यार्थी असाल, व्यावसायिक असाल, गृहिणी असाल किंवा साइड इनकम मिळवू पाहणारे असाल, या प्लॅटफॉर्ममध्ये प्रत्येकासाठी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत. सर्वात चांगला भाग म्हणजे या 100% रिमोट नोकऱ्या आहेत, त्यामुळे तुम्हाला कुठेही प्रवास करण्याची गरज नाही. 

Advertisement

Job Categories | जॉब कॅटेगिरीज –

 या प्लॅटफॉर्मवर विविध जॉब कॅटेगिरीज आहेत,हे प्लॅटफॉर्म नोकरीच्या विविध संधी ऑफर करते. तुम्हाला टिचिंग, अकाऊंटिंग, लॉ किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात रस असल्यास, तुम्हाला येथे अनेक नोकऱ्या मिळू शकतात. 

जाणून घेऊयात या चार प्लॅटफॉर्म बद्दल अधिक माहिती…

Remote jobs platforms –

Remote jobs

1. Virtual vocations –

– तुम्ही विविध क्षेत्रात रिमोट जॉब्स शोधत असाल तर ही वेबसाइट तुमच्यासाठी योग्य आहे. 

– हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, नर्सिंग, एज्युकेशन कन्सल्टिंग, स्टिचिंग, रायटिंग, टायपिंग, ग्राफिक डिझाइन, मार्केटिंग आणि इतर बऱ्याच क्षेत्रांमध्ये मध्ये नोकऱ्यांची लिस्ट उपलब्ध करते. 

– सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही या नोकऱ्यांसाठी कोणत्याही फी शिवाय अर्ज करू शकता. फक्त वेबसाइट ब्राउझ करा, तुम्हाला आवड असलेली नोकरी शोधा आणि अर्ज करा.

Website : https://www.virtualvocations.com/

 2. Daily Remote Portal –

– ही वेबसाइट दररोज नवीन रिमोट नोकरीच्या अपॉर्च्युनिटीज अपडेट करते.

– या वेबसाईटवर विविध जॉब कॅटेगिरीज आहेत. त्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिझाइन, सपोर्ट, सेल्स, रायटिंग, लीगल, फायनान्स, मार्केटिंग, डेटा एंट्री, आरोग्य सेवा, शिक्षण, वर्चुअल असिस्टंट आणि ही तर बऱ्याच क्षेत्रामध्ये नोकऱ्या देते. 

– तुम्ही लेटेस्ट रिमोट जॉब्स  ब्राउझ करू शकता आणि तुमची कौशल्ये आणि आवड यांच्याशी जुळणाऱ्या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकता. या प्लॅटफॉर्मवर नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Website : https://dailyremote.com/?#main

3.Wellfound platform –

– या प्लॅटफॉर्ममुळे ज्यांना जॉब पाहिजे त्यांचा सुद्धा फायदा आहे तसेच ज्यांना एम्प्लॉईज पाहिजे त्यांना सुद्धा जॉब या ठिकाणी लिस्ट करता येणार आहेत आणि एम्प्लॉईज हायर करता येणार आहेत.

– वेल फाउंड प्लॅटफॉर्मवर सुद्धा विविध कॅटेगिरी मधील किंवा विविध क्षेत्रांमधील जॉब उपलब्ध आहेत.

– 150K + टेक जॉब्स उपलब्ध आहेत तसेच इतरही अनेक नोकरीच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत.

– आपल्या स्किल्सनुसार आणि आवडीनुसार आपण जॉब साठी अप्लाय करू शकतो.

Websitehttps://wellfound.com/

4. Remoters –

– रिमोटर्स हा सुद्धा रिमोट जॉब मिळवण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे.

– या प्लॅटफॉर्मवर सुद्धा जॉब कॅटेगिरी नुसार, आपल्या स्किलनुसार, सॅलरीनुसार, लोकेशन नुसार जॉब्सची निवड करू शकतो.

– आपल्याकडे जे स्किल आहे किंवा आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यानुसार आपण फुल टाइम किंवा पार्ट टाइम रिमोट जॉब या ठिकाणी सर्च करू शकतो.

– तसेच या वेबसाईटवर रिमोट जॉब साठी गायडन्स सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे.

Websitehttps://remoters.net/jobs/

Benefits of Remote Jobs | रिमोट जॉब करण्याचे फायदे –

रिमोट जॉब त्याच्या असणाऱ्या फायद्यांमुळे दिवसेंदिवस अधिक प्रसिद्ध होत चालले आहे जाणून घेऊयात रिमोट जॉब चे फायदे :

*   ऑफिसला न जाता घरून सुद्धा हे जॉब आपण करू शकतो.

*   आपले वर्किंग हवर्स निवडण्याची फ्लेक्सिबिलिटी आपल्याकडे असते.

*   ऑफिसला जाण्यासाठी प्रवासाचा खर्च व इतर खर्च रिमोट जॉब मुळे वाचतो.

*   जर आपण इंटरनॅशनल कंपनी सोबत रिमोट वर्क करत असू तर आपली इन्कम डॉलर्स मध्ये होते.

*   आपली इन्कम डॉलर मध्ये झाल्यामुळे आपली चांगली कमाई होते आणि त्यामुळे आपली स्वप्न घर घेणे, गाडी घेणे, किंवा व्यवसाय सुरू करणे किंवा इतर स्वप्न आपण पूर्ण करू शकतो.

*   तसेच वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत असताना आपल्याला नवनवीन स्किल्स शिकायला मिळतात आणि अनुभव सुद्धा मिळतात.

*  रिमोट जॉब साठी आपण ग्लोबली अप्लाय करू शकतो आणि जगामधील टॉप कंपन्यांसोबत सुद्धा काम करू शकतो.

    रिमोट जॉब्स सगळ्या वयोगटातील व्यक्तींना वर्क फ्रॉम होम करण्याची आणि चांगली इन्कम कमावण्याची मोठी संधी देते. मग आपण फ्रेशर असू किंवा अनुभवी असू तरीसुद्धा खूप सारे ऑप्शन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ब्लॉगमध्ये दिलेले प्लॅटफॉर्म्स रिमोट जॉब च्या विविध संधी उपलब्ध करून देते. तर मग वाट कसली बघताय तुमच्या स्किल्स वर फोकस करा आणि जॉब साठी अप्लाय करा, गुडलक 👍🏻….

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment