या कॅलिफोर्निया (USA) येथील स्वयंसेवी संस्थेचा आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देश भारतातील गुणवंत व प्रतिभावान तरुणींना व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य देणे हा आहे.
शिक्षण, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुकला, कायदा इत्यादी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. या अंतर्गत विद्यार्थिनींना त्यांच्या संपूर्ण पदवी अभ्यासक्रमाच्या काळात आर्थिक मदत दिली जाईल.
शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थिनींना शिक्षण पूर्ण करता येईल, शिकाईमध्ये अडथळा येणार नाही, तसेच भविष्यात स्वावलंबी व सक्षम करिअर घडवण्याचा मार्ग मोकळा होईल.
शिष्यवृत्ती रक्कम – प्रति वर्ष जास्तीत जास्त ₹60,000 (750$) – 4 वर्षांपर्यंत.
Scholarship Program 2025-26 पात्रता (Eligibility)
अर्जदार मुलगी असावी.
शिक्षण, नर्सिंग, फार्मसी, मेडिसिन, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, लॉ इ. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा.
पदवी अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकत असावा (अंतिम वर्ष सोडून).
इयत्ता 10वी व 12वी मध्ये किमान 70% गुण असणे आवश्यक.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹5 लाखांपेक्षा कमी असावे.
भारतातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थिनी अर्ज करू शकते.
Scholarship Program 2025-26 शिष्यवृत्तीचे फायदे (Benefits)
शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी (B.Ed इ.) – दरवर्षी ₹40,000 (2 वर्षे).
नर्सिंग व फार्मा अभ्यासक्रमासाठी – दरवर्षी ₹40,000 (4 वर्षे).
3 वर्षांचे अभ्यासक्रम (BCA, B.Sc. इ.) – दरवर्षी ₹40,000 (3 वर्षे).
इंजिनीअरिंग, MBBS, BDS, लॉ, आर्किटेक्चर इ. – दरवर्षी ₹60,000 (4 वर्षे).
👉 शिष्यवृत्तीमध्ये शैक्षणिक फी, प्रवेश फी, परीक्षा फी, पुस्तके, वसतिगृह/मेस फी, गणवेश, मोबाईल/लॅपटॉपसारख्या उपकरणांचा खर्च व मासिक भत्ता यांचा समावेश असेल.
Scholarship Program 2025-26 आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
इयत्ता 10वी व 12वीची गुणपत्रिका व उत्तीर्ण प्रमाणपत्र
शासकीय ओळखपत्र (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)
सद्य शैक्षणिक वर्षातील प्रवेशाचा पुरावा (फी पावती/प्रवेशपत्र/कॉलेज आयडी/बोनाफाईड)
उत्पन्नाचा पुरावा (ITR, फॉर्म-16, सरकारी प्रमाणपत्र, पगार पावती इ.)
✅ ही शिष्यवृत्ती भारतातील तरुणींसाठी उच्च शिक्षण व उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला करणारी आहे. योग्य पात्र असलेल्या सर्व विद्यार्थिनींनी याचा नक्की लाभ घ्यावा.
Intelligence Bureau Recuitment 2025 | इंटेलिजन्स ब्युरो (IB) सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) भरती 2025 | १० वी पाससाठी सुवर्णसंधी