Term Insurance Guide | टर्म इन्शुरन्स खरेदी करताना टाळण्यासारख्या १० चुका | Best term Insurance plans 2025

Term Insurance Guide | टर्म इन्शुरन्स खरेदी करताना टाळण्यासारख्या १० चुका | Best term Insurance plans 2025

   टर्म इन्शुरन्स खरेदी करत असताना काही सामान्य चुका आपल्या मार्फत होऊ शकतात परंतु या चुका टाळण्यासाठी पुढे काही टिप्स दिलेल्या आहेत. टर्म इन्शुरन्स नक्कीच कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

Term Insurance Guide | टर्म इन्शुरन्स खरेदी करताना टाळण्यासारख्या १० चुका | Best term Insurance plans 2025

Term Insurance
Term Insurance

टर्म इन्शुरन्स ( Term Insurance ) म्हणजे काय? 

पॉलिसीच्या मुदतीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास टर्म इन्शुरन्स अंतर्गत विमा धारकाच्या कुटुंबाला पैसे मिळतात. 

टर्म इन्शुरन्स खरेदी करताना टाळण्यासारख्या १० चुका :

चूक 1: पॉलिसी डिटेल्स शेअर न करणे .

बरेच लोक विमा खरेदी करतात परंतु त्यांच्या कुटुंबाला त्याबद्दल सांगत नाहीत. म्हणूनच तुमच्या कुटुंबाला तुमच्या पॉलिसीबद्दल माहिती आहे याची खात्री करा आणि कागदपत्रे कोठे शोधावीत हे सुद्धा सांगून ठेवा. 

ई-विमा खाते: तुमच्या विमा पॉलिसी डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करा. हे तुम्हाला तुमच्या कुटुंबासह डिटेल्स सहज शेअर करू देते. ही सरकारकडून मोफत सेवा आहे. 

चूक 2: धूम्रपानाबद्दल प्रामाणिकपणे न सांगणे.

 तुम्ही धूम्रपान करत असल्यास विमा कंपनीला सांगणे महत्त्वाचे आहे. तुम्ही पॉलिसी खरेदी करताना धूम्रपान करत असल्यास, त्यांना तसे सांगा. जर तुम्ही नंतर धूम्रपान करण्यास सुरुवात केल्यास, तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये धूम्रपान करत असाल किंवा अल्कोहोल घेत असाल तर तसे त्यांना सांगावे.

चूक 3: ग्रुप इन्शुरन्स वर अवलंबून राहणे.

अनेक कंपन्या बेनिफिट म्हणून जीवन विमा देतात. परंतु, हा विमा तुम्ही तिथे काम करेपर्यंतच टिकतो. म्हणूनच एक वेगळी पॉलिसी मिळवा, तुम्ही तुमची नोकरी सोडल्यास, किंवा इतर काही कारणास्तव त्या कंपनीपासून वेगळे झाल्यास विमा मिळणार नाही. म्हणूनच तुमचा स्वतःचा टर्म इन्शुरन्स असणे आवश्यक आहे.

चूक 4: फक्त क्लेम सेटलमेंट रेशो पाहणे.

क्लेम सेटलमेंट रेशो किती % लोकांचे क्लेम मंजूर झाले हे दाखवते. पण, किती पैसे दिले आहेत हे दाखवत नाही. 

अमाऊंट सेटलमेंट रेशो:अमाऊंट सेटलमेंट रेशो पहा. हे मंजूर झालेल्या एकूण रकमेची टक्केवारी दाखवते. 

चूक 5: चुकीची कव्हरेज रक्कम निवडणे.

अनेक एजंट तुमच्या पगारावर आधारित रक्कम सुचवतात. परंतु, हा सर्वोत्तम मार्ग असेलच असे नाही.म्हणूनच  

खर्चावर आधारित कॅल्क्युलेशन्स करा :

तुम्हाला किती विम्याची गरज आहे हे ठरवण्यासाठी तुमचा महिन्याचा खर्च किती हे लक्षात घ्या,त्यामध्ये तुमचे लोन अमाऊंट गृहीत धरू शकता.

सूत्र : जीवन विम्याची रक्कम = (सध्याचा वार्षिक खर्च * (65 – सध्याचे वय) * 20) / 7.

या सूत्रामध्ये 7 इतकी महागाई गृहीत धरली आहे आणि आपण 65 वर्षांपर्यंत जगू असे गृहीत धरले आहे. 

उदाहरण: जर तुम्ही 30 वर्षांचे असाल आणि तुमचा वार्षिक खर्च 3,60,000 रुपये असेल, तर जीवन विम्याची रक्कम सूत्रानुसार 3.6 करोड इतकी असेल.

तसेच ditto कॅल्क्युलेटर च्या मदतीने सुद्धा जीवन विम्याची रक्कम तुम्ही ठरवू शकता.

चूक 6: MWP कायद्यावर स्वाक्षरी न करणे.

  • MWP म्हणजे विवाहित महिला मालमत्ता कायदा /Married Women’s Property Act. हा कायदा तुमच्या कुटुंबासाठी तुमचे पैसे सुरक्षित करू शकतो. 
  • जर तुमच्याकडे कर्ज असल्यास, MWP कायद्याशिवाय, विम्याचे पैसे प्रथम तुमची कर्जे फेडण्यासाठी जाऊ शकतात. 
  • MWP कायद्यानुसार, पैसे थेट तुमच्या पत्नी आणि मुलांकडे जातात. यामुळे त्यांना पूर्ण रक्कम मिळण्याची खात्री होते. स्त्रियाही आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करू शकतात.

चूक 7: solvency रेशो न बघणे

ज्या कंपनीकडून आपण इन्शुरन्स घेत आहोत त्या कंपन्यांची हेल्थ बघणे सुद्धा आवश्यक आहे म्हणजे त्या कंपन्या व्यवस्थित सुरू आहे का, बँकरप्ट तर नाही ना हे बघावे.solvency रेशो दोन पेक्षा जास्त असावा.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

चूक 8: एजंटवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे.

एजंट नेहमी तुम्हाला तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम प्रॉडक्ट विकू शकत नाहीत.

चूक 9 : इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी वेगळ्या न ठेवणे.

उदाहरण,ULIPS.

इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवा.

चूक १०. solvency रेशो न बघणे

ज्या कंपनीकडून आपण इन्शुरन्स घेत आहोत त्या कंपन्यांची हेल्थ बघणे सुद्धा आवश्यक आहे म्हणजे त्या कंपन्या व्यवस्थित सुरू आहे का, बँकरप्ट तर नाही ना हे बघावे.solvency रेशो दोन पेक्षा जास्त असावा.

तुमची उद्दिष्टे समजून घ्या,तुम्हाला तुमच्या विम्यामधून काय हवे आहे ते जाणून घ्या. तुम्ही संरक्षण, मुलांचे शिक्षण किंवा सेवानिवृत्ती नक्की कोणत्या कारणासाठी विमा घेत आहात याचा विचार करा. टर्म इन्शुरन्स हा तुमच्या कुटुंबाच्या भविष्याचे रक्षण करण्याचा उत्तम मार्ग आहे. वरील सांगितल्याप्रमाणे काही सामान्य चुका टाळून, तुम्ही तुमच्या गरजांसाठी सर्वोत्तम इन्शुरन्स निवडू शकता. 

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment