५ असे व्यवसाय जे घराच्या छतावर सुद्धा केले जाऊ शकतात… | Business ideas | Terrace Business Ideas –
बऱ्याच लोकांना काही ना काही तरी व्यवसाय सुरू करायचा असतो परंतु भांडवलाच्या कमतरतेमुळे किंवा जागेच्या अभावामुळे व्यवसाय सुरू करणे शक्य नसते. तर आजच्या लेखामध्ये आपण जे व्यवसाय बघणार आहोत ते अगदी घराच्या छतावर सुद्धा सुरू केले जाऊ शकतात म्हणजे या ठिकाणी जागेचा प्रश्नच उरत नाही, तसेच कमी गुंतवणुकीमध्ये सुद्धा हे व्यवसाय सुरू केले जाऊ शकतात.
1 . टेरेस फार्मिंग –
जर तुमच्या घरावर मोठे टेरेस उपलब्ध असेल तर त्यावर भाजीपाल्याची शेती करता येऊ शकते. मोजक्या प्रमाणामध्ये आणि उत्तम क्वालिटीचा सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेऊन या सेंद्रिय भाजीपाल्याची विक्री करता येऊ शकते. अशाप्रकारे सेंद्रिय भाजीपाल्याचा व्यवसाय करता येऊ शकतो.
त्याचबरोबर फुलझाडी सुद्धा लावून फुलांची विक्री सुद्धा करता येऊ शकते.
2 . रूफ टॉप कॅफे / रेस्टॉरंट –
जर तुमचे घर गर्दीच्या परिसराच्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी छोटेसे कॅफे किंवा रेस्टॉरंट सुरू केले जाऊ शकते. अशा उंच ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेणे बरेच लोक पसंद करतात त्यामुळे तुमच्या टेरेसवर अशा पद्धतीचे वातावरण निर्माण करून छोटेसे कॅफे किंवा छोटेसे रेस्टॉरंट सुरू करता येऊ शकते.
3 . टेरेस स्पेस रेंटल / टेरेस वरील जागा इव्हेंट साठी भाड्याने देऊ शकता –
बऱ्याच जणांकडे मोठ्या आकाराचा टेरेस उपलब्ध नसल्याकारणाने छोटे इव्हेंट्स जसे की वाढदिवस, सेलिब्रेशन पार्टी, डोहाळे जेवण किंवा इतर पार्टी करण्यासाठी हॉल बुक करावा लागतो परंतु त्या ऐवजी जर परवडणाऱ्या किमतीमध्ये रेंटल टेरेस स्पेस उपलब्ध झाली तर नक्कीच ग्राहक सुद्धा त्या दिशेने वळतील आणि म्हणूनच हा व्यवसाय सुद्धा फायदेशीर ठरू शकतो.
4 . आउट डोअर फिटनेस क्लासेस –
सर्वच लोक स्वतःच्या आरोग्याबद्दल ,फिटनेस बद्दल सध्या जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेले आहेत.त्यामुळे हल्ली योगा क्लासेस किंवा इतर व्यायामाचे प्रकार अशा ऍक्टिव्हिटीज भरपूर प्रमाणामध्ये वाढल्या आहेत. बरेच लोक योगा क्लासेस किंवा इतर एक्सरसाइज घेतात परंतु प्रत्येकाकडे अशा प्रकारचे क्लासेस घेण्यासाठी जागा उपलब्ध असतेच असे नाही ,अशा लोकांना तुमच्या टेरेस वरील जागा भाड्याने देऊ शकता. बरेच लोकांना मोकळ्या हवेमध्ये व्यायाम करणे ,योगा करणे आवडते, तसेच ऑक्सिजन सुद्धा व्यवस्थित मिळतो. त्यामुळे आउटडोर फिटनेस क्लासेस ही एक चांगली संकल्पना आहे. जे लोक अशा प्रकारचे क्लासेस घेतात त्यांना जागा रेंट ने देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा या गोष्टींमध्ये ट्रेन असाल तर स्वतः सुद्धा अशा प्रकारचे क्लासेस घेऊ शकतात.
5 . मोबाईल टॉवर –
जर तुमच्या घराच्या छतावर पुरेशी जागा उपलब्ध असेल तर कुठल्याही मोबाईल कंपनीचा टॉवर बसवला जाऊ शकतो, त्यासाठी मोबाईल कंपन्यांशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांच्या कंपनीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार जर सर्व गोष्टी व्यवस्थित रित्या बसत असतील तर तुमच्या घराच्या छतावर मोबाईल टॉवर बसवला जाऊ शकतो आणि जर मोबाईल टॉवर बसवण्याची परमिशन मिळाली आणि मोबाईल टॉवर बसवला गेला तर दरमहा काहीतरी रक्कम त्या मोबाईल कंपनीतर्फे दिली जाते.
अशाप्रकारे घराच्या छतावर सुद्धा व्यवसाय सुरू केले जाऊ शकतात तेही कमी गुंतवणुकीमध्ये…..