U-Go Scholarship Program 2024-25 | 60000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | यु गो स्कॉलरशिप प्रोग्रॅम | Best Scholarships 2024 –

U-Go Scholarship Program 2024-25 | 60000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | यु गो स्कॉलरशिप प्रोग्रॅम | Best Scholarships 2024 –

     बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे असते परंतु आर्थिक परिस्थितीमुळे तसे शक्य होत नाही. जे विद्यार्थी खरोखरच हुशार आहेत त्यांच्यासाठी विविध स्कॉलरशिप बद्दलची माहिती आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आज सुद्धा अशाच एका स्कॉलरशिप बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत ती स्कॉलरशिप आहे, यु गो स्कॉलरशिप ( U-Go Scholarship ). जाणून घेऊयात अधिक माहिती…

U-Go Scholarship Program 2024-25 | 60000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | यु गो स्कॉलरशिप प्रोग्रॅम | Best Scholarships 2024 –

U-Go Scholarship Program | यु गो  शिष्यवृत्ती –

– U-Go स्कॉलरशिप प्रोग्रॅम ( U-Go Scholarship Program ) व्यावसायिक पदवी घेत असलेल्या विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य देण्यासाठी डिझाईन केलेला आहे. 

– अध्यापन, फार्मसी, नर्सिंग, अभियांत्रिकी, मेडिकल, आर्किटेक्चर, लॉ आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम घेत असलेल्या आणि शैक्षणिक दृष्ट्या हुशार विद्यार्थ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट यु गो या स्कॉलरशिपच्या आहे. 

– यु गो ही कॅलिफोर्निया, यु एस ए येथे ना नफा संस्था असून भारतामधील महत्त्वाकांक्षी आणि हुशार विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देते.

U-Go Scholarship Program | यु गो  शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 

यु गो  शिष्यवृत्ती पात्रता | U-Go Scholarship Program Eligibility –

– अध्यापन, नर्सिंग, फार्मसी, मेडिकल, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, कायदा अशा प्रकारच्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या तरुणी युगो स्कॉलरशिप साठी पात्र आहेत. 

– ज्या विद्यार्थिनी शेवटच्या वर्षाला शिकत आहे त्या सोडून पदवी अभ्यासक्रमाच्या इतर कुठल्याही वर्षामध्ये शिकत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

– अर्जदार उमेदवारांनी इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत किमान 70% गुण मिळवलेले असावेत.

– अर्जदारांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 

– भारतभरातील विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.

यु गो  शिष्यवृत्ती फायदे | benefits of U go scholarship program –

या शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झालेल्या पात्र स्कॉलर्सला पुढील प्रमाणे फायदे मिळतील : 

अध्यापन अभ्यासक्रमांसाठी – दोन वर्षांसाठी 40,000 रुपये ($500) प्रति वर्ष 

नर्सिंग आणि फार्मा अभ्यासक्रमांसाठी – चार वर्षांसाठी  40,000 रुपये ($500) प्रति वर्ष 

बीसीए, बीएससी इत्यादी तीन वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी – 3 वर्षांसाठी प्रति वर्ष  40,000 रुपये ($500) पर्यंत

अभियांत्रिकी, MBBS, BDS, कायदा, आर्किटेक्चर कोर्स इ. साठी – चार वर्षांसाठी  60,000 रुपये ($750) प्रति वर्ष.

टीप

शैक्षणिक खर्च (शिक्षण शुल्क, प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तके इ.), राहण्याचा खर्च (वसतिगृह शुल्क, मेस फी, गणवेश इ.), उपकरणे (लॅपटॉप, मोबाइल) , उपकरणे इ.), मासिक भत्ता इ. 100% शैक्षणिक खर्च कव्हर करण्यासाठी शिष्यवृत्ती 

यु गो  शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for U go scholarship program –

– इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रे 

– सरकारने जारी केलेला ओळख पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हर लायसन्स/पॅन कार्ड)

– चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र)

– कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (ITR फॉर्म-16/सक्षम सरकारी अधिकाऱ्याने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र/पगार स्लिप) 

– शैक्षणिक खर्च केलेल्या देय पावत्या

 – अर्जदाराचे बँक खाते तपशील

–  अर्जदाराचा फोटो

U-Go Scholarship Program | यु गो  शिष्यवृत्ती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या स्कॉलरशिप साठी अप्लाय करण्याकरिता : येथे क्लिक करा.

यु गो  शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा | How to apply for U go scholarship program –

– यु गो शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा. 

– त्यानंतर लॉगिन करा जर तुम्ही रजिस्टर केलेलं नसेल तर मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी किंवा गुगल अकाउंट ऑफ रोड रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा. 

– लॉगिन केल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म पेज ओपन होईल. 

– या स्कॉलरशिपच्या एप्लीकेशन मध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरा आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

– भरलेला फॉर्म पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून त्यानंतर सबमिट या ऑप्शन वर क्लिक करा. 

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment