अयोध्या राम मंदिरः श्रीराम भगवानजींसाठी १०८ फुटांची अगरबत्ती… बघा नक्की कशी आहे ही अगरबत्ती…| 108 feet long Incense Stick for Ram Mandir
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या सोहळ्यासाठी गुजरातमधील वडोदरा येथे 108 फूट उंचीची अगरबत्ती / धूप काठी तयार केली जात आहे. श्री राम मंदिर हे सर्वच भक्तांसाठी खूप खास असणार आहे आणि त्यासाठीच ही खास अगरबत्ती सुद्धा बनवली जात असेल. यापूर्वी कदाचित अशा प्रकारची अगरबत्ती कोणीही बनवलेली नसावी, अशी 108 फूट उंच अशी अगरबत्ती खास प्रभू श्रीराम यांच्यासाठी बनवली जात आहे.
ही 108 फूट उंचीची अगरबत्ती पूर्णपणे तयार झाल्यानंतर अयोध्या या ठिकाणी ही अगरबत्ती पाठवली जाणार आहे. वडोदरा येथील एका शेतामध्ये दहापेक्षा अधिक लोखंडी ट्रायपॉड स्टँड लावून त्यावर ही अगरबत्ती बनवली जात आहे.
या अगरबत्तीचे वजन 3500 किलोच्या आसपास आहे तर ही अगरबत्ती 108 फूट उंच किंवा लांब तर साडेतीन फूट रुंद आहे. ही अगरबत्ती बनवण्यासाठी साधारणतः तीन ते चार महिने इतका कालावधी लागला असावा, अजूनही काही काम सुरूच आहे.
प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाची तयारी अगदी उत्साहात आणि जोरदार पद्धतीने सुरू आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध प्रमुख पुजारी तसेच नेतेमंडळी सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर इतर ही खास लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकतात. प्रभू राम मंदिरासाठी प्रत्येक भक्ताच्या मनात काही ना काही तरी करावे अशी इच्छा असते आणि म्हणूनच गुजरात मधील रामभक्तांनी 108 फूट उंच अशी खूप मोठी अगरबत्ती कदाचित जगातील सर्वात मोठी अगरबत्ती सुद्धा म्हणता येईल इतकी मोठी अगरबत्ती बनवली आहे.
या अगरबत्तीची खासियत म्हणजे ही अगरबत्ती सर्वात उंच आणि रुंद तर आहे त्याचबरोबर ही अगरबत्ती 45 दिवसांपर्यंत जळू शकते आणि जवळपास पंधरा ते वीस किलोमीटरच्या परिसरामध्ये या अगरबत्तीचा सुगंध दरवळणार आहे. ही अगरबत्ती बनवण्यासाठी गाईचे शुद्ध तूप, सुगंधी घटक , गीर गायीचे शेण , हवन साहित्य वापरण्यात आलेले आहे.
वडोदरा येथील तरसाली भागात राहणारे “विहाभाई भारवाड” हे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घराबाहेर ही अगरबत्ती बनवत आहेत. या महिन्याच्या अखेरीस हे काम पूर्ण होऊ शकते.विहाभाई भारवाड यांनी यापूर्वी सुद्धा लांब अगरबत्ती यशस्वीपणे बनवली होती,असे म्हंटले जात आहे.
वडोदरा ते अयोध्येपर्यंत सुमारे 1800 किमी अंतरापर्यंत अगरबत्ती घेऊन जाण्यासाठी एक लांब ट्रेलर ट्रक जोडला जाणार आहे.
अशी ही कदाचित जगामधील सुद्धा सर्वात लांब किंवा उंच अगरबत्ती असणार आहे जिचा सुगंध 15 किलोमीटर ते 20 किलोमीटरच्या आसपास दरवळणार आहे.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |