3D Mobile cover print business idea in marathi | Custom mobile cover print business idea in marathi

Custom Mobile cover print business idea in marathi | best business idea in Marathi

 

1.Introduction

मित्रांनो आजच्या technology च्या जीवनामध्ये रोज लाखो लोक नवीन मोबाईल विकत घेतात. आणि काही करोडो लोक आहेत ज्यांच्या कडे आधीपासूनच मोबाईल आहे. अश्या परीस्थितीत आपल्यासाठी एक नवीन business करण्याची संधी निर्माण झाली आहे. ती संधी अशी कि, लोक 10 हजार रुपयांपासून लाखो पर्यंत मोबाईल विकत घेतात पण जेव्हा त्या मोबाईलच्या सुरक्षिततेची गोष्ट निर्माण होते त्यावेळेस मोबाईलचा cover सुद्धा ते लोक तेवढेच प्राधान्य देऊन घेतात.

 

2.आपल्याला business करण्याची संधी

मार्केट मध्ये अनेक प्रकारचे मोबाईल cover असतात, वेगवेगळ्या डिझाईन मध्ये त्यात लोकांना जशी डिझाईन आवडते. त्याप्रकारामध्ये लोकांना पाहिजे तसे डिझाईन मिळत नाही. आणि याचाच फायदा घेऊन आपल्याला आपला बिझनेस करायचा आहे. आणि बिझनेस क्षेत्रातला नियम आहे. लोकांना जे लागत ते जर आपण पुरवल तर आपला बिझनेस यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. म्हणून लोकांना जो फोटो किंवा डिझाईन त्यांना जे cover च्या मागे टाकायचे असेल ते custom आपण टाकून देऊ शकतो. आणि मार्केट खूप मोठे आहे अश्या वेळेस लोक मार्केट मध्ये फक्त cover विकतात. पण जर आपण coverला custom केल तर customer आपलाच आहे.

 

3.हा business करण्यासाठी काय साहित्य आपल्या जवळ पाहिजे.

जसा प्रत्येक मोबाईलचा model वेगळा असतो. त्यानुसार त्याचा cover असतो. तर custom मोबाईल cover हा business करत असतांना एखाद्या व्यक्ती कडे आधीपासूनच cover आहे. त्याला त्याच्याकडे आधीपासून असलेल्या cover वर custom फोटो किंवा डिझाईन प्रिंट करायची असेल. तर तसे होऊ शकत नाही. आपला business करत असतांना प्रत्येक मोबाईलच्या model नुसार जे cover असेल ते आपल्याला कडे असणे गरजेचे आहे. त्या coverची किंमत फक्त 40रुपये/- एवढी असते. त्यानंतर ज्या मशिनमध्ये आपल्याला फोटो किंवा डिझाईन प्रिंट करायची असते. त्या मशिनची किंमत फक्त 35 हजार रुपये/- मात्र एवढी आहे. तुमच्यासाठी ही किंमत खूप जास्त सुद्धा असू शकते. पण पुढे तुम्हाला profit मार्जिन सुद्धा दिले आहे. ते तुम्ही वाचा त्यानंतर ही किंमत तुम्हाला खूप कमी वाटेल. याच्या सोबत प्रत्येक coverच्या model नुसार cover प्रिंट होत असतांना cover मध्ये फिट होण्यासाठी एक डायचा वापर करावा लागतो त्या एका डायची किंमत 700-1300 रुपया पर्यंत असते. असे अनेक डाय तुम्हाला घ्यावे लागतील. त्या त्या model नुसार पण एक वेळेस तुम्ही तो डाय घेतला तर पुन्हा तुम्हाला त्यात गुंतवणूक करयची गरज नाही. सोबतच एक वस्तू लागते ती म्हणजे ज्या कागदावर आपण प्रिंट करून cover वर चिकटवू शकतो तो म्हणजे sublimation paper. तो कागद 3 रुपयाचा मिळतो. त्या 3 रुपयाचा कागदामध्ये मोबाईलचा model जर लहान असेल तर 2 मोबाईल साठी प्रिंट निघू शकते. किंवा एका कागदा मध्ये एक मोबाईलची प्रिंट करू शकतो. व रेगुलर आपल्याला एक वस्तू maintain ठेवावी लागेल ती म्हणजे प्रिंटरची इंक त्या इंकला sublimation इंक म्हणतात. ती इंक 2400 रुपये/- मध्ये मिळते. त्यात 6 कलर असतात. एक वेळेस प्रिंट केल्यावर 800-900 cover प्रिंट करू शकतो.

 

4.प्रॉफिट मार्जिन

एक custom cover प्रिंट करायला एकूण 50रुपये/- मात्र एवढा खर्च येतो. त्याच्यात आपण वरील माहितीप्रमाणे raw material बघितलं. एक 40 रुपयाचा blank cover, 3 रुपयाचा sublimation paper, इंक आणि electricity हे सगळ मिळून आपल्याला एक cover प्रिंट करायला 50रुपये/- मात्र एवढा खर्च येतो.

 

आपण आपला business जर online मार्केट मध्ये घेऊन गेलो. आणि ecommerce वेबसाईट आहेत. जसे कि, amazon, flipkart, ईत्यादी. यांवर विकले तर एका cover ची किंमत 200 पासून सुरुवात करून 350 पर्यंत विकू शकतो. जरी 200 रुपये एवढी किंमत मानून विचार केला असता. 150 रुपये एका cover च्या मागे मार्जिन मिळेल.  आणि तुमच्या business ची digital मार्केटिंग तुम्ही केली तर रोज तुम्ही हजारो लोकांपर्यंत पोहचू शकतात. हजार लोकांपैकी समजा 50 order रोज तुम्हाला आले. तरी सुरुवातीला तुम्ही 7500रुपये/- रोज एवढा नफा कमवू शकतात. आणि रोज तुम्हाला फक्त 50 order आले. तरी तुम्ही महिना 2 लाख पर्यंत कमवू शकतात.त्याचबरोबर तुमच्या लोकल मार्केट मध्ये जर तुम्ही सुरुवात केली. तर तुम्ही संपूर्ण मार्केट मधील दुकानांना wholsale मध्ये तुम्ही तुमची service देऊ शिकतात. त्यात तुम्हाला सुरुवातीला 20हजार पासून पुढे Quantity नुसार profit होऊ शकतो. व तुम्ही स्वतः तुमचा एक मोठा ब्रांड तयार करून संपूर्ण भारतात तुमचा business करू शकतात. 

 

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Leave a Comment