5 Side Hustles | एक्स्ट्रा इन्कम अंदाजे ₹15,000/महिना मिळविण्यासाठी 5 साईड हस्टल्स | Best working opportunities 

5 Side Hustles | एक्स्ट्रा इन्कम अंदाजे ₹15,000/महिना मिळविण्यासाठी 5 साईड हस्टल्स | Best working opportunities 

    सध्याच्या जगामध्ये इन्कम मिळवण्याचा फक्त सिंगल सोर्स असणे पुरेसे नाही तर आपले इन्कम वाढवण्यासाठी इनकम मिळवण्यासाठी इतर मार्ग ( 5 Side Hustles) शोधणे आवश्यक आहे. असे काही मार्ग उपलब्ध सुद्धा आहेत की जे दर महिन्याला चांगली इन्कम मिळवून देऊ शकतात. जाणून घेऊयात अशाच काही आयडियाज बद्दल…

Advertisement

5 Side Hustles | एक्स्ट्रा इन्कम अंदाजे ₹15,000/महिना मिळविण्यासाठी 5 साईड हस्टल्स –

5 Side Hustles

5 Side Hustles

१.Virtual Assistant | वर्चुअल असिस्टंट –

– हल्ली वर्चुअल असिस्टंट या कामासाठी खूप मागणी आहे कारण वर्चुअल असिस्टंट चांगल्या सर्विसेस देतात तसेच वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ऑफिसमध्ये कुठलेही फिजिकल सेटअप करण्याची आवश्यकता भासत नाही. 

– वर्चुअल असिस्टंट फोन कॉल्स मॅनेज करणे, ई-मेल अकाउंट मॅनेजमेंट तसेच शेडूलिंग यांसारखे टास्क करतात आणि यासाठी बऱ्याच कंपन्या फुल टाईम एम्पलोयी हायर न करता वर्चुअल असिस्टंट  नेमतात.

– वर्चुअल असिस्टंट बनण्याकरता सोशल मीडिया कंटेंट मॅनेजमेंट, ग्राफिक डिझाईनिंग, ब्लॉग राइटिंग, इंटरनेट मार्केटिंग यांसारखी स्किल्स शिकणे आवश्यक आहे. 

– वर्चुअल असिस्टंट या पदासाठी अंदाजे 15 हजार रुपये पर्यंत किंवा त्याहून अधिक सुद्धा सॅलरी मिळू शकते.

२.Transcription Services | ट्रान्सस्क्रीप्शन सर्विसेस –

– एक्स्ट्रा साईड इन्कम मिळवण्याची अजून एक आयडिया आहे ट्रान्सस्क्रीप्शन सर्विसेस.

– ट्रान्सस्क्रीप्शन म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग टेक्स्ट फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करणे.

– ट्रान्सस्क्रीप्शन सर्विस देण्याकरता आपल्याकडे चांगले टायपिंग स्किल असणे आवश्यक आहे.

– अशा काही वेबसाईट्स आहेत की ज्या अशा प्रकारचे जॉब ऑफर करतात.

३.Digital Creatives | डिजिटल क्रिएटिव्हज –

– साईड इन्कम मिळवण्याची तिसरी आयडिया आहे डिजिटल क्रिएटिव्हज.

– डिजिटल टूल्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग किंवा ग्राफिक डिझाईन यांसारखे क्रिएटिव्ह वर्क करणे. 

– बऱ्याच कंपन्या त्यांचा डिजिटल प्रेझेन्स वाढवण्यासाठी अशा प्रकारचे टास्क स्किल्ड डिजिटल क्रिएटिव्ह कडून आऊट सोर्स करून घेतात.

– त्यामुळे अशा प्रकारचे काम सुरू करण्यासाठी आपण असे स्किल शिकणे तसेच सतत हे स्किल अपडेट करत राहणे आवश्यक आहे. 

– सुरुवातीला अगदी छोट्या प्रोजेक्ट पासून आपण सुरुवात करू शकतो आणि हळूहळू अनुभव यायला लागेल आणि त्यानंतर मोठे प्रोजेक्ट्स आपण मिळवू शकतो. कुठल्याही कामांमध्ये अनुभव, सराव खूप महत्त्वाचा असतो.

४.Dropshipping | ड्रॉप शिपिंग –

– ड्रॉप शिपिंग असा व्यवसाय आहे ज्यामध्ये आपल्याला इन्व्हेंटरी मेंटेन करावी लागत नाही. 

– ड्रॉप शिपिंग मध्ये थर्ड पार्टी सप्लायरचा प्रॉडक्ट असतो ,पॅकेजिंग करून शिपिंग थेट कस्टमरला केली जाते.

– ड्रॉप शिपिंग व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे लॅपटॉप आणि चांगले इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

– ड्रॉप शिपिंग व्यवसाय करून बरेच लोक चांगली इन्कम करत आहेत.

– प्लॅटफॉर्म्स : Alibaba, eBay आणि इतरही अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.

५.Selling at Local Markets | लोकल मार्केटमध्ये विक्री –

– काहीतरी युनिक प्रॉडक्ट बनवून लोकल मार्केटमध्ये तो सेल करणे. 

– जर आपल्याकडे असे काही स्किल असेल तर असे प्रॉडक्ट बनवून आपण स्वतः फिजिकली प्रेझेंट न राहता दुसरे कोणालातरी आपला स्टॉल किंवा शॉप मॅनेज करायला सांगून किंवा एखाद्या व्यक्तीसोबत जबाबदाऱ्या आणि फायनान्स मध्ये पार्टनरशिप करून व्यवसाय करू शकतो.

– आपण स्वतः प्रॉडक्ट बनवत नसलो तरी आपल्या परिसरामध्ये किंवा एखाद्या परिसरामध्ये ज्या उत्पादनाची आवश्यकता आहे त्या प्रकारचे शॉप त्या ठिकाणी सुरू करू शकतो, स्वतः नोकरी करत असलो तरी सुद्धा सुरुवातीला इतर कुणाला तरी ती जबाबदारी देऊन व्यवसाय सुरू करू शकतो.

– लोकल मार्केट सोबतच आपण ऑनलाइन सुद्धा प्रॉडक्ट्स विक्री करू शकतो. 

    अशाप्रकारे वर्चुअल असिस्टंट, ट्रास्क्रिप्शन सर्विस, डिजिटल क्रिएटिव्हज, ड्रॉप शिपिंग, लोकल मार्केटमध्ये विक्री अशा काही आयडिया ( 5 Side Hustles ) आहेत ज्याद्वारे आपण एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment