Vima Sakhi Yojana | विमा सखी योजना | पात्र महिलांना रोजगाराची संधी | Best job opportunities 2024-25
नुकतीच हरियाणा दौऱ्यावर असताना सोमवार दिनांक 9 डिसेंबर या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विमा सखी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. केंद्र सरकार मार्फत महिलांसाठी विमा सखी योजना राबविण्यात येणार असून विमा सखी म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांना मानधन सुद्धा देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विमा सखी योजना या योजनेची घोषणा केलेली आहे. पुढील तीन वर्षांमध्ये विमा सखी योजनेअंतर्गत तब्बल दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न असणार आहे तर तीन वर्षात एलआयसी कडून विमा सखींना 2 लाख 16 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
विमा सखी योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 35000 स्त्रियांना विमा एजंट म्हणून रोजगार उपलब्ध होणार असून या योजनेच्या अंतर्गत महिलांना तीन वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि या प्रशिक्षणा दरम्यान स्त्रियांना दरमहा सात हजार रुपये स्टायपेंड म्हणून दिला जाणार आहे. विमा सखी योजनेसाठी शिक्षण दहावी पूर्ण असावे आणि किमान वय 18 वर्षे असणे गरजेचे आहे.
Vima Sakhi Yojana | विमा सखी योजना | पात्र महिलांना रोजगाराची संधी | Best job opportunities 2024-25
Table of Contents
Vima Sakhi Yojana | विमा सखी योजना :
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हरियाणा दौऱ्यावर असताना विमा सखी योजनेची घोषणा करण्यात आली.
– विमा सखी योजना ही महिलांसाठी एक नवी रोजगाराची संधी ठरणार आहेत.
– विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना विमा एजंट म्हणून तसेच एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी सुद्धा मिळणार आहे.
– ज्या महिलांचे शिक्षण दहावी पूर्ण आहे व वय किमान 18 वर्षे आहे त्यांना विमा योजना म्हणून काम करता येणार आहे तर ज्या महिला पदवीधारक आहे त्यांना भविष्यामध्ये एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी सुद्धा मिळू शकते.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत