Vima Sakhi Yojana | विमा सखी योजना | पात्र महिलांना रोजगाराची संधी | Best job opportunities 2024-25
नुकतीच हरियाणा दौऱ्यावर असताना सोमवार दिनांक 9 डिसेंबर या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विमा सखी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. केंद्र सरकार मार्फत महिलांसाठी विमा सखी योजना राबविण्यात येणार असून विमा सखी म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांना मानधन सुद्धा देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विमा सखी योजना या योजनेची घोषणा केलेली आहे. पुढील तीन वर्षांमध्ये विमा सखी योजनेअंतर्गत तब्बल दोन लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न असणार आहे तर तीन वर्षात एलआयसी कडून विमा सखींना 2 लाख 16 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
विमा सखी योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 35000 स्त्रियांना विमा एजंट म्हणून रोजगार उपलब्ध होणार असून या योजनेच्या अंतर्गत महिलांना तीन वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि या प्रशिक्षणा दरम्यान स्त्रियांना दरमहा सात हजार रुपये स्टायपेंड म्हणून दिला जाणार आहे. विमा सखी योजनेसाठी शिक्षण दहावी पूर्ण असावे आणि किमान वय 18 वर्षे असणे गरजेचे आहे.
Vima Sakhi Yojana | विमा सखी योजना | पात्र महिलांना रोजगाराची संधी | Best job opportunities 2024-25
Table of Contents
Vima Sakhi Yojana | विमा सखी योजना :
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हरियाणा दौऱ्यावर असताना विमा सखी योजनेची घोषणा करण्यात आली.
– विमा सखी योजना ही महिलांसाठी एक नवी रोजगाराची संधी ठरणार आहेत.
– विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना विमा एजंट म्हणून तसेच एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी सुद्धा मिळणार आहे.
– ज्या महिलांचे शिक्षण दहावी पूर्ण आहे व वय किमान 18 वर्षे आहे त्यांना विमा योजना म्हणून काम करता येणार आहे तर ज्या महिला पदवीधारक आहे त्यांना भविष्यामध्ये एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी सुद्धा मिळू शकते.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
Vima Sakhi Yojana Eligibility | विमा सखी योजना पात्रता :
– विमा सखी म्हणून काम करण्यासाठी अर्जदार महिलेचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 70 वर्ष असावे.
– अर्जदार महिला किमान दहावी उत्तीर्ण असावी.
– भविष्यामध्ये विकास अधिकारी म्हणून काम करण्यासाठी अर्जदार महिलाही पदवीधारक असणे आवश्यक आहे.
Vima Sakhi Yojana Benefits | विमा सखी योजना फायदे :
– विमा सखी योजनेच्या पहिल्या टप्प्यांमध्ये 35000 महिलांना रोजगार मिळणार आहे.
– या महिलांना तीन वर्षासाठी प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.
– प्रशिक्षण सुरू असताना पाच ते सात हजार रुपये दरमहा स्टायपेंड सुद्धा दिला जाणार आहे.
– दहावी उत्तीर्ण महिला विमा एजंट म्हणून काम करू शकतात तर भविष्यामध्ये पदवीधारक महिला या विकास अधिकारी म्हणून काम करू शकणार आहेत.
– ठराविक उद्दिष्ट साध्य केल्यास इनसेंटीव्ह सुद्धा दिला जाऊ शकतो.
– महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विमा सखी योजना ही महत्त्वपूर्ण ठरू शकते.
– विमा सखी योजनेअंतर्गत रोजगार मिळाल्यास महिला आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकणार आहेत.
– विमा साठी योजनेमुळे जनतेमध्ये विमा बद्दल अधिक जागृती सुद्धा निर्माण होईल.
विमा सखी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- विमा साठी योजनेसाठी एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे, पुढे लिंक दिलेली आहे.
- आता click here for bhima sakhi या ऑप्शनवर क्लिक करा.
- नंतर तुमचे नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर व इतर सर्व माहिती सविस्तर अचूक भरा.
- तुम्ही भारतामधील कोणत्याही एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनरशी संबंधित असाल तर त्याविषयी तशी माहिती द्या.
- आता कॅपचा कोड भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
विमा सखी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |