Aadhar Seva Kendra Online Apply | आधार सेवा केंद्र ऑनलाईन फॉर्म सुरू | Aadhaar card centre | Best business ideas 2025
आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत, ( Aadhar Seva Kendra Online Apply ) याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
Aadhar Seva Kendra Online Apply | आधार सेवा केंद्र ऑनलाईन फॉर्म सुरू | Aadhaar card centre | Best business ideas 2025
Table of Contents
जळगाव जिल्ह्याला माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत आधार संच प्राप्त झालेले आहेत आणि ज्या महसूल मंडळामध्ये सध्याला आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरू करावेत असे निर्देश शासनामार्फत मिळालेली आहेत. यानुसार जिल्ह्यामधील रिक्त महसूल मंडळांमध्ये आधार संच देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 2 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन येता अर्ज भरू शकतात याकरिता कुठलीही फी आकारली जाणार नाही.
हे फॉर्म ऑनलाईनच भरले जाणार आहेत आधार केंद्रासाठी हार्ड कॉपी स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
Aadhar Seva Kendra Online Apply Important dates | आधार सेवा केंद्र ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाच्या तारखा
अर्ज स्वीकारण्याची तारीख आणि वेळ : 24 मार्च 2025 सकाळी 11 वाजता.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ : 2 एप्रिल 2025 संध्याकाळी 5 वाजता.
मिळालेल्या अर्जांची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध होण्याची तारीख : 4 एप्रिल 2025
पात्र अर्जांचे नाव जाहीर होण्याची तारीख : 9 एप्रिल 2025
* 9 एप्रिल 2025 या दिवशी पात्र अर्जदारांमधून लकी ड्रॉ पद्धतीने आधार संच वितरित करण्यात येणार आहेत.
अर्जासोबत सादर करण्याची कागदपत्रे :
विहित नमुन्या मधील अर्ज
अर्जदाराचे आधार कार्ड
पॅन कार्ड
आधार NSEIT सुपरवायझर प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रते संबंधीतील प्रमाणपत्र ( किमान बारावी )
अर्जदारांची पात्रता निकष :
एकावेळी एक अर्जदार एका जागेसाठीच अर्ज करू शकतो जर एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले तर त्या उमेदवाराचे सर्व अर्ज बाद करण्यात येतील.
शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आधार संचाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांकडे DIT किंवा इतर कुठल्याही नोंदणीकृत संस्थेमार्फत वितरित करण्यात आलेले इतर आधारसंच नसावेत जर एखाद्या अर्जदाराकडे एकापेक्षा अधिक आधारसंच असतील तर जिल्हा प्रशासन ते अधिकचे आधारसंच रद्द करून इतर अन्य उमेदवारांना वाटप करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
अर्जदार ऑपरेटर किंवा सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत आणि तसे प्रमाणपत्र सुद्धा त्यांच्याकडे असावे.
अर्जदाराने आधारकीट साठी UIDAI च्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
अर्जदार या तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र चालवत आहेत त्याच तालुक्यामध्ये आधार केंद्रासाठी कर्ज करू शकतात, तालुका बाहेरील अर्ज बाद करण्यात येतील.
नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणीच आधार केंद्र कार्यरत असणे आवश्यक असेल.
ज्या शासकीय कार्यालयात आधार केंद्र चालक आधार केंद्र चालवतील त्या कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी घेणे बंधनकारक असेल.
सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 ( शासकीय सुट्ट्या वगळता ) यावेळी मध्ये आधार केंद्र चालकांनी सेवा सुरू ठेवणे बंधनकारक असेल.
पात्र अर्जदाराला एकदा वितरीत केलेले आधार केंद्र हे कुठल्याही परिस्थितीमध्ये इतर कोणाच्याही नावावर हस्तांतरित करता येणार नाही त्याचप्रमाणे आधार केंद्राचा पत्ता सुद्धा बदलता येणार नाही याची सुद्धा नोंद घ्यावी.
सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक आधार केंद्रावर बसवणे बंधनकारक असेल.
डिजिटल पेमेंट चा उपयोग सर्व आधार केंद्र मध्ये करणे बंधनकारक राहील.
रेड चार्ट, आवश्यक कागदपत्रांची यादी तसेच १९४७ हेल्प डेस्क क्रमांक सर्व आधार केंद्रांवर दर्शनीय भागामध्ये लावणे बंधनकारक असेल.
आधार केंद्र चालकांनी आधार नोंदणी रजिस्टर व्यवस्थितपणे राखणे बंधनकारक असेल.
आधार केंद्र वाटपाचे सर्व अधिकार जिल्हास्तरीय समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत