Best term insurance plan of 2025 | How to select best term plan?2025 मध्ये सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स योजना | सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स योजना कशी निवडावी?
Best term insurance plan of 2025 | How to select best term plan?2025 मध्ये सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स योजना | सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स योजना कशी निवडावी?
आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटापासून वाचवण्यासाठी तसेच एक सुरक्षित भविष्य निर्माण करण्यासाठी योग्य टर्म इन्शुरन्स घेणे अत्यंत आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजेच जीवन विमा यामध्ये आपण ठराविक कालावधीसाठी इन्शुरन्स घेतो. आजच्या ब्लॉगमध्ये २०२५ मध्ये सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स योजना कशी निवडावी (Best term insurance plan of 2025
) याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.
Best term insurance plan of 2025 | How to select best term plan?2025 मध्ये सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स योजना | सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स योजना कशी निवडावी?
Table of Contents
Best term insurance plan of 2025
टर्म इन्शुरन्स योजना म्हणजे काय?
टर्म इन्शुरन्स ही एक अशी जीवन विमा योजना आहे, यामध्ये आपल्याला निश्चित कालावधीसाठी किमान विमा संरक्षण मिळते.
यामध्ये असलेली रक्कम नक्की केली जाते, आणि यासाठी असलेला किमान वय, धोका आणि आर्थिक संरक्षण यांचा विचार केला जातो.
जर त्या कालावधीत आपल्याला काही झालं तर, विमाधारकाच्या कुटुंबाला किंवा वारसांना रक्कम मिळते.
२०२५ साठी सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स योजना निवडण्यासाठी काही महत्त्वाचे घटक :
कंपनीची प्रतिष्ठा आणि विश्वसनीयता:
सर्वप्रथम इन्शुरन्स कंपनीची प्रतिष्ठा आणि विश्वसनीयता तपासणे महत्त्वाचे आहे.
आपल्या विमा योजनेचे वितरण, क्लेम प्रक्रिया, आणि सर्वसाधारण सेवा यावर विश्वास असणे आवश्यक आहे. ज्या कंपन्यांच्या क्लेम सेटलमेंट रेट्स उच्च आहेत, त्यांना आपल्यासाठी सर्वोत्तम ठरवू शकता.
पॉलिसीची किमान आणि जास्तीत जास्त विमा रक्कम:
प्रत्येक व्यक्तीचे जीवन, कुटुंबाची आर्थिक स्थिती, आणि आवश्यकतांनुसार विमा रक्कम आवश्यक असू शकते. आपल्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपण किती विमा घेणार हे ठरवणे महत्त्वाचे आहे.
जास्त विमा रक्कम घेतल्यास, भविष्यात असलेल्या रिस्कवर कवर मिळवता येईल.
पॉलिसीची कालावधी:
टर्म इन्शुरन्सच्या पॉलिसीची कालावधी ठरवताना आपले वय, कुटुंबाची स्थिती, आणि भविष्यातल्या गरजा विचारात घेणे आवश्यक आहे.
आर्थिक परिस्थिती आणि प्रीमियम रेट्स:
आपले वय किती आहे आणि किती विमा संरक्षण आवश्यक आहे, त्याच प्रमाणे प्रीमियम रेट्स वेगवेगळे असू शकतात. तसेच आपल्या आर्थिक परिस्थितीला जुळणारा प्रीमियम रेट निवडणे हे महत्त्वाचे आहे.
त्याचप्रमाणे, प्रीमियम किंमतीमध्ये कमी होणारे पर्याय शोधणे देखील महत्वाचे आहे.
इतर फायदे:
काही विमा योजनांमध्ये अॅड-ऑन्स आणि कॅश बॅक ऑफर देखील असू शकतात. यासारखे अतिरिक्त फायदे निवडताना त्यांचा फायदेशीर उपयोग कसा होईल हे बघणे आवश्यक आहे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स योजना निवडण्यासाठी काही टिप्स I Tips for Best term insurance plan of 2025
वय आणि जीवन शैली: आपल्या वयानुसार पॉलिसी घेतल्यास, त्याच्यावर लागणारा प्रीमियम कमी होईल. तसेच आपल्या जीवनशैलीनुसार पॉलिसीचे स्वरूप ठरवले पाहिजे.
पॉलिसीची तुलना करा: विविध कंपन्यांच्या पॉलिसी आणि योजनांची तुलना करा, आणि ज्यात आपल्याला सर्वाधिक फायदे मिळतात त्याची निवड करा.
क्लेम सेटलमेंट रेट तपासा: क्लेम सेटलमेंट रेट हे एक महत्त्वाचे घटक आहे, जे आपल्याला टर्म इन्शुरन्स पॉलिसीची निवड करतांना बघायला हवे.
विविध अॅड-ऑन्स आणि कव्हरेज पर्याय तपासा: प्रत्येक प्लॅनमध्ये अॅड-ऑन्स आणि कव्हरेज पर्याय असू शकतात. आपल्या गरजा आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी चांगले फायदे मिळवण्यासाठी त्यांची तपासणी करा.
काही टर्म इन्शुरेंस आणि त्याबद्दल इतर माहिती
Ref – Policybazaar
सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स योजना निवडताना, आपल्याला आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य पॉलिसी आणि योग्य विमा रक्कम निश्चित करणे महत्त्वाचे आहे.