रेशनकार्ड धारक आता घरबसल्या धान्य मागवू शकणार फक्त एका क्लिक वर..
मा.पंतप्रधानांनी वन रेशन वन रेशन कार्ड हि योजना आणली. आर्थिकदृष्ट्या मजुरांना परवडणाऱ्या किमतीत धान्य मिळावे यासाठी वन रेशन कार्ड योजना चालविली जाते. त्या केंद्रातून अनेकांना धान्य मिळत. परंतु तेथे गर्दी असल्याने अनेकदा रेशन सुध्दा मीळत नाही. व अनेक समस्यांना समोर जावं लागत.
या समस्येवर मात करण्यासाठी मेरा रेशन अॅप सुरू केलंय. आता आपण या अॅप द्वारे घरी बसून धान्य मिळवु शकतो..
Mera Ration app-रेशन कार्ड ऍप बद्दल सगळी माहिती. इथे वाचा- Mera Ration app
या ऍप द्वारे रेशनकार्ड धारक आता घरबसल्या धान्य मागवू शकणार-
आपण घरी बसून रेशन बुक करू शकता.
रेशन शॉप विक्रेता व लाभार्थी यांच्यामध्ये सर्व सेवा सोपे करणे हे
या मोबाईल अॅपचे उद्दिष्ट आहे.
या अॅप मध्ये नोंदणी केल्यानंतर सर्वाना रेशन घेण्यास सोईचे जाइल.
अॅप चालु कसा करावा ते खालीलप्रमाणे.
1. सर्वप्रथम अॅप GOOGLE PLAY STORE वरुन डाऊनलोड करा
2. इंस्टाल झाल्यावर अॅप उघडा आणि त्यात आपल्या रेशनकार्ड ची माहिती भरा.
3. माहिती पुर्ण भरल्यानंतर नोंदणी पुर्ण होइल.. असे सर्व झाल्यावर आपण अॅपवरून रेशन मागवू शकता..
अॅपचे फायदे
या अॅपचा सर्वाधिक स्थलांतरितांना फायदा होईल
रेशन सेंटरबद्दल माहिती घेने हे या अॅपद्वारे खूप सोपे जाईल.
खालील व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे Mera Ration app कसं वापरायचं.
या अॅपद्वारे आपल्या सूचना किंवा तक्रार नोंदवली जाते.
रेशन कधी आणि कसे प्राप्त होईल, ते कार्डधारक या अॅपच्या मदतीने इतर माहिती स्वतः घेऊ शकतील.
रेशन कार्डधारकांना या अॅपमुळे महिन्याभरात त्यांना किती रेशन मिळेल ते पाहण्यासही ते सक्षम असतील.
मेरा रेशन अॅप हे सध्यातरी हिंदी आणि इंग्लिश या भाषांमध्ये उपलब्ध आहे. लवकरच इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होतील.