मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 | Maharashtra Saur Krushipamp Yojana 2023 –

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 | Maharashtra Saur Krushipamp Yojana 2023 –

     अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसोबतच वीज सुद्धा आता मानवी जीवनासाठी आवश्यक घटक झाली आहे आणि विजेचा उपयोग सर्वच ठिकाणी केला जातो. शेतीसाठी तर वीज अत्यंत महत्त्वाची आहे, कारण शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी विजेचा वापर केला जातो. परंतु बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये वीज उपलब्ध नसल्याकारणाने पिकांचे नुकसान होते. परंतु महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो.या योजनेबद्दलच आपण आज माहिती बघणार आहोत.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 | Maharashtra Saur Krushipamp Yojana 2023 –

– महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्ट आहे.

– मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना असून या योजनेअंतर्गत जवळपास एक लाख सौर कृषी पंप टप्प्याटप्प्याने पुरवण्याचा शासनाचा उद्देश आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये २५,००० सौर कृषी पंप, दुसऱ्या टप्प्यामध्ये ५०,००० सौर कृषी पंप तर तिसऱ्या टप्प्यामध्ये २५,००० सौर कृषी पंप कृषी पंप देण्याचा उद्देश आहे.

– महाराष्ट्र सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत प्रत्यक्षपणे टप्पा सुरू झाल्यानंतर १८ महिन्यात राबवण्यात येणार आहे.

– महाराष्ट्र राज्यामधील दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना फायदे | Benefits of Maharashtra Saur Krushipamp Yojana –

– या योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाच्या किमतीच्या ९५ % इतके अनुदान देणारे देण्यात येणार आहे तर उर्वरित ५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे.म्हणजेच ह्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे.

– मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना ५ एकर पर्यंत शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना ३ एचपी पंप देण्यात येणार आहे तर ५ एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपी आणि ७.५ एचपी पंप देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना पात्रता | Eligibility –

– ज्या शेतकऱ्यांकडे जलस्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात परंतु अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक विद्युत कनेक्शन नसणे गरजेचे आहे.

– सतत वाहणारी नदी किंवा नाले, वैयक्तिक शेततळे किंवा सामुदायिक शेततळे यांच्या शेजारी जरी शेतजमीन असेल तरीसुद्धा असे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.

– महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना या योजने अंतर्गत प्राधान्य असेल.

– विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी 

– महावितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या शेतकरी

– ज्यांना नजीकच्या काळात विद्युत कनेक्शन मिळणे शक्य नाही असे शेतकरी, 

– अतिदुर्गम भागातील शेतकरी 

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आवश्यक कागदपत्रे | Necessary documents for Maharashtra Saur Krushipamp Yojana –

– शेतीचे कागदपत्रे

– मूळ निवासाचे प्रमाणपत्र

– अर्जदाराचे आधार कार्ड

– 7 / 12 उतारा 

– बँक पासबुक

– मोबाईल नंबर

– ओळख पत्र

– पासपोर्ट साईज फोटो

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज | Application for Maharashtra Saur Krushipamp Yojana –

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने पुढील वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना माहिती PDF – येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment