तुम्हाला माहित आहे का असेही एटीएम असते की ज्याद्वारे  आपण सोनं खरेदी करू शकतो… आता तर आपल्या भारतात सुद्धा असे एटीएम उपलब्ध आहे….

तुम्हाला माहित आहे का असेही एटीएम असते की ज्याद्वारे  आपण सोनं खरेदी करू शकतो… आता तर आपल्या भारतात सुद्धा असे एटीएम उपलब्ध आहे….

Advertisement

     सोन्याची खरेदी करण्यासाठी आपल्याला सोन्याच्या दुकानांमध्ये जावे लागते. एटीएम मधून फक्त पैसेच निघतात असे बऱ्याच लोकांना वाटते परंतु आता एटीएम मधून चक्क सोनं सुद्धा आपण खरेदी करू शकणार आहे.

   आपल्या भारत देशामध्ये सोन्याची आवड असणारे असंख्य लोक आहेत. आपल्या देशामध्ये विविध सणसमारंभ मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात आणि बऱ्याचदा अशा सणासमारंभाच्या वेळी सोन्याची खरेदी सुद्धा आवर्जून केली जाते ,अगदी त्यामध्ये महिलांसोबतच पुरुषांचा सुद्धा समावेश असतो .विविध दागिने अशावेळी महिला व पुरुष खरेदी करतात.

    आपल्या देशामध्ये पहिले गोल्ड एटीएम हे तेलंगणा राज्यांमध्ये सुरू झालेले आहे. गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे गोल्ड एटीएम सुरू केलेले असून हे गोल्ड एटीएम आपल्या देशांमधील पहिले रियल टाईम गोल्ड डिस्पेन्सिंग मशीन असल्याचे सुद्धा म्हटले जात आहे.०.५ ते १०० ग्रॅम पर्यंतचे सोने या एटीएम मधून काढता येणार आहे. सध्या सोन्याला जो काही भाव चालू आहे त्या भावानुसार या सोन्याची खरेदी करता येणार आहे म्हणजेच या गोल्ड एटीएम द्वारे कॅशलेस सोने खरेदी करण्याचा अनुभव घेता येईल असे म्हणण्यास हरकत नाही.

   हे गोल्ड एटीएम अगदी २४ तास खुले असणार आहे. तसेच खरेदीदार क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या द्वारे सोने खरेदी करू शकणार आहे म्हणजेच या ठिकाणी रोख रकमेचा उपयोग ग्राहकांना करावा लागणार नाही. 

Advertisement

Leave a Comment