Health insurance cashless facility | Cashless everywhere | हॉस्पिटल्स मध्ये मिळणार कॅशलेस सुविधा …
भारतात ज्या व्यक्तींनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे, त्यांना आता देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळतील. कॅशलेस एव्हरीव्हेअर ( Cashless everywhere) या नावाने ओळखले जाणारे हे धोरण भारतातील आरोग्य सेवा प्रणालीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आणि पॉलिसीधारकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सज्ज आहे. या ब्लॉगमध्ये पॉलिसीधारकांना कॅशलेस एव्हरीव्हेअर मुळे कसा फायदा होईल तसेच इतरही माहिती बघणार आहोत…
Table of Contents
कॅशलेस एव्हरीव्हेअर | Cashless everywhere –
– कॅशलेस एव्हरीव्हेअर हा भारतातील जनरल इन्शुरन्स कौन्सिल आणि आरोग्य विमा कंपन्यांनी घेतलेला निर्णय आहे.
– पॉलिसीधारकांना हॉस्पिटलमध्ये आगाऊ पैसे देण्याची गरज दूर करणे हे कॅशलेस एव्हरीव्हेअरचे उद्दिष्ट आहे.
– पूर्वीपॉलिसीधारकांना वैद्यकीय उपचार घेताना दोन पर्याय होते.
पहिला पर्याय : स्वतःला योग्य रुग्णालयात दाखल करणे, बिले भरणे आणि नंतर विमा कंपनीकडून दवाखान्याचा खर्च क्लेम करून परत मिळवणे. परंतु या प्रक्रियेला अनेकदा वेळ लागायचा.
दुसरा पर्याय : कॅशलेस, विमा कंपनी थेट रुग्णालयासोबत बिलांची पूर्तता करेल परंतु यासाठी प्रत्येक विमा कंपनीची हॉस्पिटलची यादी असायची.
– परंतु आता कॅशलेस एव्हरीवेअरमुळे भारतामधील कोणत्याही रुग्णालयामध्ये कॅशलेस उपचार घेणे शक्य होणार आहे.
Benefits of Cashless Everywhere for Policyholders | कॅशलेस एव्हरीवेअरचे विमाधारकांना फायदे-
– कॅशलेस एव्हरीव्हेअरमुळे, पॉलिसीधारक आता हॉस्पिटलमध्ये पैसे न भरता उपचार घेऊ शकतात, ही सेवा भारतातील कोणत्याही रुग्णालयात उपलब्ध आहे.
– हा लाभ घेण्यासाठी, पॉलिसीधारकांनी त्यांच्या आरोग्य विमा कंपनीला हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या ४८ तास अगोदर माहिती देणे आवश्यक आहे.
– हे सुद्धा लक्षात घेणे महत्वाचे आहे की, ही सेवा फक्त 15 पेक्षा जास्त बेड्स असलेल्या रुग्णालयांमध्ये लागू आहे.याव्यतिरिक्त, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल झाल्यास, पॉलिसीधारक कॅशलेस सेवेचा लाभ घेण्यासाठी 48 तासांच्या आत विमा कंपनीला कळवू शकतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पॉलिसीच्या अटी व शर्तींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे.
जनरल इन्शुरन्स कौन्सिलचे मुख्य प्रमुख, तपन सिंघल यांच्या मते, ६३% पॉलिसीधारक वैद्यकीय उपचारांसाठी कॅशलेस मार्ग निवडतात. उर्वरित पॉलिसीधारक आगाऊ पैसे भरतात आणि नंतर प्रतिपूर्तीचा दावा करतात. कॅशलेस लाभ घेण्यासाठी विमा कंपनीच्या नेटवर्कचा भाग असलेली रुग्णालये निवडणे महत्त्वाचे होते. परंतु कॅशलेस एव्हरीवेअर मुळे अधिकाधिक लोक हेल्थ इन्शुरन्स घेतील आणि कॅशलेस एव्हरीवेअर मुळे या क्षेत्रामधील फसवणूक सुद्धा कमी होईल.
निलेश साठे,इन्शुरन्स तज्ज्ञ यांच्या मते “GICने घेतलेल्या या निर्णयामुळे इन्शुरन्स कंपन्या, ग्राहक आणि छोट्या हॉस्पिटल्सला सुद्धा फायदा होणार आहे. अनेकवेळा हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम मिळावा म्हणून गैरप्रकार केले जातात.
कॅशलेस सुविधा नसणाऱ्या हॉस्पिटल्ससोबत संगनमत करून हे क्लेम केले जातात. पण GIC च्या या निर्णयामुळे ही सगळी व्यवस्था centralized होईल आणि अशा गैरप्रकारांना आळा बसू शकेल.”
कॅशलेस एव्हरीव्हेअर ( Cashless everywhere) चा फायदा पॉलिसीधारकांना होईल.