गोल्डन चान्स 🎯 गव्हर्मेंट मोफत ट्रेनिंग + स्वयंरोजगार | Government courses with certificate 2024 I Best career opportunities

गोल्डन चान्स 🎯 गव्हर्मेंट मोफत ट्रेनिंग + स्वयंरोजगार | Government courses with certificate 2024 –

     पूर्वी ज्यांच्याकडे शिक्षण नसायचे त्यांना नोकऱ्या मिळवणे कठीण व्हायचे परंतु हल्ली शिक्षण असून सुद्धा लगेच नोकरी मिळेलच असे नाही. परंतु नोकरी करण्याची किंवा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची गरज प्रत्येकालाच असते. कधीकधी चांगले शिक्षण घेऊन सुद्धा चांगली नोकरी मिळत नाही कारण टेक्नॉलॉजी मध्ये सतत विविध बदल घडत असतात,त्यामुळे आपण नेहमी अपडेटेड राहणे गरजेचे आहे. आजच्या आर्टिकल मध्ये आपण असे काही कोर्सेस बघणार आहोत की जे सध्या विविध क्षेत्रांमध्ये गरजेचे सुद्धा आहेत त्याचबरोबर हे कोर्सेस अगदी मोफत आपल्याला करता येणार आहे आणि कोर्स कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे त्यासोबतच नोकरीच्या विविध संधी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. चला तर जाणून घेऊयात हे कोणते गव्हर्मेंट कोर्सेस ( Government courses with certificate ) आहेत…

Government courses with certificates

   आपल्याला फ्री मध्ये चांगले कोर्सेस करता यावेत त्यासोबतच नोकरी मिळावी यासाठी सरकारतर्फे एक वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे त्याची लिंक पुढे दिलेली आहे.

https://www.skillindiadigital.gov.in/home

      SKILL INDIA DIGITAL ही सरकारतर्फे सरकारतर्फे सुरु करण्यात आलेली वेबसाईट असून यावर ५५५ पेक्षा अधिक कोर्सेस उपलब्ध आहेत, या लिंक वर जाऊन तुम्ही हे कोर्सेस चेक करू शकता परंतु या आर्टिकल मध्ये आम्ही तीन असे कोर्सेस घेऊन आलो आहोत की ज्या कोर्सेसची सध्या डिमांड आहे जाणून घेऊयात त्या कोर्सेस बद्दल अधिक माहिती…

१. Web Design & Development –

– वेब डिझाईन आणि डेव्हलपमेंट या कोर्सची सध्या खूप मागणी असून हा कोर्स केल्यामुळे आपण वेबसाईट तसेच ॲप डिझाईन करू शकतो यामुळे विविध व्यावसायिक त्यांचा व्यवसाय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणू शकतात.

– तसेच हा कोर्स केल्यामुळे आपण ब्लॉगिंग सुद्धा करू शकतो.

– वेब डिझाईन अँड डेव्हलपमेंट हा कोर्स केल्यामुळे आपण वेब डिझायनर किंवा वेब डेव्हलपर म्हणून नोकरी सुद्धा करू शकतो.

– स्किल इंडिया डिजिटल या प्लॅटफॉर्मवरून हा कोर्स करण्यासाठी वयाची आणि शिक्षणाची कुठलीही अट नाही.

– वेब डिझाईन अँड डेव्हलपमेंट हा कोर्स स्किल इंडिया डिजिटल या प्लॅटफॉर्मवर आपण हिंदी भाषेमधून करू शकतो तसेच इतर भाषेमध्ये सुद्धा करू शकतो.

– वेब डिझाईन अँड डेव्हलपमेंट या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.

२. Kisan Drone Operator –

– आपल्या भारत देशामध्ये शेती खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते सध्या शेती ही आधुनिक पद्धतीने सुद्धा केली जात आहे आणि त्यामध्ये समावेश आहे ड्रोनचा..

– परंतु हा ड्रोन प्रत्येकालाच वापरता येईल किंवा हाताळता येईल असे नाही त्यामुळे हा ड्रोन कशा रीतीने ऑपरेट करायचा याबद्दलचा सुद्धा कोर्स स्किल इंडिया डिजिटल या प्लॅटफॉर्मवरून आपण करू शकतो.

– किसान ड्रोन ऑपरेटर हा कोर्स केल्यामुळे आपण शेतीमध्ये याचा फायदा करू शकतो त्याच सोबतच व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करण्यासाठी सुद्धा ड्रोन कशा रीतीने हाताळला पाहिजे याचे सुद्धा नॉलेज आपल्याला या कोर्समधून मिळू शकते.

– किसान ड्रोन ऑपरेटर हा कोर्स करून आपण शेती संबंधित कंपनीमध्ये ड्रोन ऑपरेटर म्हणून नोकरी करू शकतो त्यासोबतच आपण आपल्या स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतो.

– ड्रोन मुळे शेतीमधील उत्पादकता वाढवण्यामध्ये मदत होते तसेच इतरही अनेक फायदे होतात.

– किसान ड्रोन ऑपरेटर हा कोर्स स्किल इंडिया डिजिटल या प्लॅटफॉर्मवर करण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची कुठलीही अट नाही.

– स्किल इंडिया डिजिटल या वेबसाईटवरून किसान ड्रोन ऑपरेटर हा कोर्स हिंदी भाषेमध्ये करण्यासाठी पुढे लिंक दिलेली आहे इतर भाषेमध्ये सुद्धा हा कोर्स उपलब्ध असू शकतो.

– किसान ड्रोन ऑपरेटर या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.

३ . Cyber security –

– जोपर्यंत आपला मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरनेट आहे तोपर्यंत सायबर सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे.

– सायबर सिक्युरिटी हा कोर्स केल्यामुळे आपल्याला सायबर हल्ले किंवा कशाप्रकारे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा इतर माहिती हाताळून सायबर अटॅक होतात याबद्दल माहिती मिळेल तसेच आपण जे ऑनलाईन ट्रांजेक्शन करतो त्यावेळी सुद्धा कधी कधी स्पॅमर्सकडून आपल्याला फसवले जाते याबद्दल कसे प्रोटेक्ट करावे अशी आणि इतरही माहिती आपल्याला शिकण्यास मिळेल.

– सायबर सिक्युरिटी हा कोर्स केल्यामुळे आपण वैयक्तिकरित्या सेक्युअर होऊच त्यासोबतच आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि त्या मार्फत इतर लोकांना सायबर सिक्युरिटी बद्दल माहिती देऊ शकतो तसेच सायबर सिक्युरिटी मध्ये नोकरीच्या सुद्धा विविध संधी उपलब्ध आहेत.

– स्किल इंडिया डिजिटल या प्लॅटफॉर्मवरून सायबर सिक्युरिटी हा कोर्स करण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची कुठलीही अट नाही.

– सायबर सिक्युरिटी हा कोर्स इंग्लिश भाषेमधून करण्यासाठी आणि या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment