RTE Admission Process 2024-25 Maharashtra | RTE 2024-2025 | आर टी ई ऍडमिशन प्रोसेस | Best Government opportunities for education

RTE Admission Process 2024-25 Maharashtra | RTE 2024-2025 | आर टी ई ऍडमिशन प्रोसेस – 

         RTE म्हणजेच राईट टू एज्यूकेशन (Right To Education). विद्यार्थ्यांना आठवीपर्यंतचे शिक्षण शिक्षणाचा अधिकार कायद्याखाली मोफत देण्यात येते. 4 ऑगस्ट 2009 या दिवशी हा कायदा संसदेमध्ये मंजूर करण्यात आला होता आणि हा कायदा ” शिक्षण हक्क कायदा 2009 ” या नावाने ओळखला जातो. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात ऍडमिशन प्रोसेस (RTE Admission) सुद्धा व्यवस्थित रित्या घेतली जाते .RTE अंतर्गत 8 वीच्या वर्गाखालील आणि 14 वर्षांपेक्षा कमी वयाचे विद्यार्थी पात्र असतात.

Advertisement
RTE admission

महाराष्ट्राचे RTE पोर्टल: येथे क्लिक करा.👇🏻

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

RTE यूजर manual : येथे क्लिक करा.👇🏻

RTE Maharashtra Admission 2024-25 Online Application | RTE ऍडमिशन फॉर्म –

– https://student.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट विजिट करा.

– Online Application लिंक वर क्लिक करा.

– New Registration लिंक वर क्लिक करा.

– सर्व डिटेल्स व्यवस्थित भरून Register बटन क्लिक करा.

– आता आवश्यक सर्व डिटेल्स भरून आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.

– भरलेला फॉर्म पुन्हा एकदा व्यवस्थित तपासा आणि सबमिट करा.

RTE Admission Process 2024-25 | RTE ऍडमिशन प्रोसेस –

आवश्यक कागदपत्रे | Documents for RTE –

आरटीई फॉर्म भरण्यासाठी पुढील कागदपत्रे लागतात : –

– आधार कार्ड

– पासपोर्ट साईज फोटो

– रहिवासी दाखला

– बीपीएल रेशन कार्ड

– दिव्यांग असल्यास किंवा एचआयव्ही बाधित असल्यास किंवा इतर वैद्यकीय ट्रीटमेंटची आवश्यकता असल्यास संबंधित कागदपत्रे 

– जन्माचा दाखला

– जात प्रमाणपत्र

– बँक अकाउंट पासबुक

– चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे )

– अनाथ असल्यास तसे कागदपत्र

– आई-वडिलांचा घटस्फोट झालेला असल्यास किंवा इतर कारणास्तव एकच पालकत्व असेल तर संबंधित कागदपत्र

( बेघर मुला मुलींसाठी सुद्धा काही तरतूद असण्याची शक्यता आहे )

– कोविड प्रभावित बालके ( आई किंवा वडील किंवा कोणा एकाचे निधन झालेले असल्यास) 

वंचित गटातील बालकांमध्ये पुढील प्रवर्गाचा समावेश होतो:-

1) जात संवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती(अ),भटक्या जमाती (ब) भटक्या जमाती (क) भटक्या जमाती, (ड) इतर मागास (ओ.बी.सी.) विशेष मागास बालके (एस.बी.सी.)

२) दिव्यांग बालके,

३) एच.आई.व्ही बाधित किंवा एच. आई. व्ही प्रभावित बालके,

४) कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन)

५) अनाथ बालके

ह्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही.

आर टी ई चा निकाल कशा पद्धतीने लागतो | RTE Result –

आरटीईचा निकाल लॉटरी सिस्टीमने लागतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment