5000 जमा करून मिळवा 27 लाख..जाणून घ्या कसे | Sukanya Samriddhi Yojana –
राज्य सरकारतर्फे आणि केंद्र सरकारतर्फे जनतेसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जात असतात. सुकन्या समृद्धी योजना ( Sukanya Samriddhi Yojana ) ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना असून ” बेटी बचाओ ,बेटी पढाओ ” या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी नक्कीच ही योजना एक चांगली योजना आहे. जाणून घेऊयात सुकन्या समृद्धी योजनेबद्दल अधिक माहिती….
Table of Contents
सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samruddhi Yojana –
– मुलींचे भविष्य उज्वल करणे हा सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे.
– सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींना शिक्षणासाठी तसेच इतर कामांसाठी सुद्धा खूप हातभार लागणार आहे.
– मुलगी दहा वर्षाची होण्यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडणे गरजेचे आहे.
– सुकन्या समृद्धी योजनेमध्ये २५०/- रुपये ते दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
– सुकन्या समृद्धी योजनेसाठी गुंतवणूक कालावधी १५ वर्षे आहे, परंतु मॅच्युरिटी कालावधी 21 वर्ष आहे
– सुकन्या समृद्धी योजनेसाठी व्याजदर ८ टक्के होते. सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर 2023 – 24 या आर्थिक वर्षात जानेवारी ते मार्च या तिमाही मध्ये ८ टक्क्यांवरून 8.2% इतके करण्यात आले आहे.
– मुलगी अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीचे खाते पालकां द्वारे चालवले जाते.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Sukanya Samriddhi Yojana –
– सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडताना मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
– पालक किंवा कायदेशीर पालकच फक्त मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात.
– एका मुलीसाठी एकापेक्षा अधिक खाते उघडता येत नाही.
– एका परिवारातील फक्त दोन मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडता येते.( जुळ्या मुलींना सुद्धा खाते उघडता येऊ शकते. )
सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते कसे उघडावे ? How to open account for Sukanya Samriddhi Yojana ?
– सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जावे.
– तिथून या योजनेसाठी असणारा फॉर्म मिळवावा.
– त्यानंतर फॉर्म मधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून हा फॉर्म जमा करावा.
– 250 रुपये प्रीमियम खाते उघडण्यासाठी भरावा.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुदतीपूर्व बंद होण्याची कारणे –
– जर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुदतपूर्व बंद करायचे असेल तर पाच वर्षांनी बंद केले जाऊ शकते.
– खातेदाराचा मृत्यू झाल्यास
– अत्यंत दयाळू कारणास्तव
– खातेदारकाच्या पालकाचा मृत्यू झाल्यास
• मॅच्युरिटीवर क्लोजर –
– खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी किंवा 18 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी (लग्नाच्या तारखेच्या 1 महिना अगोदर किंवा 3 महिन्यानंतर ).
महिन्याला पाच हजार जमा करून 27 लाख मिळवा ते कसे बघुयात ….
सुकन्या समृद्धी योजनेसाठी सध्याचा व्याजदर : 8.2%
मासिक गुंतवणूक :5000 रुपये
वार्षिक गुंतवणूक : 60,000 रुपये
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते समजा या वर्षी म्हणजेच 2024 ला सुरू केले तर 2045 हे वर्ष मॅच्युरिटी वर्ष असेल.
एकूण गुंतवणूक : 60,000X15 = 9,00,000/-
एकूण व्याज – 18,71,031 रुपये
मिळणारी एकूण रक्कम – 27,71,031रुपये
ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची महत्वपूर्ण योजना…