5000 जमा करून मिळवा 27 लाख..जाणून घ्या कसे | Sukanya Samriddhi Yojana | Best Government schemes 2024 information

      राज्य सरकारतर्फे आणि केंद्र सरकारतर्फे जनतेसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जात असतात. सुकन्या समृद्धी योजना ( Sukanya Samriddhi Yojana ) ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना असून ” बेटी बचाओ ,बेटी पढाओ ” या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी नक्कीच ही योजना एक चांगली योजना आहे. जाणून घेऊयात सुकन्या समृद्धी योजनेबद्दल अधिक माहिती….

Advertisement

सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samruddhi Yojana – 

– मुलींचे भविष्य उज्वल करणे हा सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे.

– सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींना शिक्षणासाठी तसेच इतर कामांसाठी सुद्धा खूप हातभार लागणार आहे.

– मुलगी दहा वर्षाची होण्यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडणे गरजेचे आहे.

– सुकन्या समृद्धी योजनेमध्ये २५०/-  रुपये ते दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

– सुकन्या समृद्धी योजनेसाठी गुंतवणूक कालावधी १५ वर्षे आहे, परंतु मॅच्युरिटी कालावधी 21 वर्ष आहे

– सुकन्या समृद्धी योजनेसाठी व्याजदर ८ टक्के होते. सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर 2023 – 24 या आर्थिक वर्षात जानेवारी ते मार्च या तिमाही मध्ये ८ टक्क्यांवरून 8.2% इतके करण्यात आले आहे.

– मुलगी अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीचे खाते पालकां द्वारे चालवले जाते.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Sukanya Samriddhi  Yojana –

– आधार कार्ड

– रहिवासी पुरावा

– मुलीच्या जन्माचा दाखला

– मुलीचा आणि पालकांचा फोटो

– पालकांचे पॅन कार्ड, रेशन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स

– इतर आवश्यक कागदपत्रे किंवा माहिती जसे की मोबाईल नंबर…

सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता | Eligibility for Sukanya Samriddhi Yojana –

– अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

– सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडताना मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

– पालक किंवा कायदेशीर पालकच फक्त मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात.

– एका मुलीसाठी एकापेक्षा अधिक खाते उघडता येत नाही.

– एका परिवारातील फक्त दोन मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडता येते.( जुळ्या मुलींना सुद्धा खाते उघडता येऊ शकते. )

सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते कसे उघडावे ? How to open account for Sukanya Samriddhi Yojana ?

– सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जावे.

– तिथून या योजनेसाठी असणारा फॉर्म मिळवावा.

– त्यानंतर फॉर्म मधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून हा फॉर्म जमा करावा.

– 250 रुपये प्रीमियम खाते उघडण्यासाठी भरावा.

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुदतीपूर्व बंद होण्याची कारणे  –

– जर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुदतपूर्व बंद करायचे असेल तर पाच वर्षांनी बंद केले जाऊ शकते.

– खातेदाराचा मृत्यू झाल्यास

– अत्यंत दयाळू कारणास्तव

– खातेदारकाच्या पालकाचा मृत्यू झाल्यास

• मॅच्युरिटीवर क्लोजर –

– खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी किंवा 18 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी (लग्नाच्या तारखेच्या 1 महिना अगोदर किंवा 3 महिन्यानंतर ).

महिन्याला पाच हजार जमा करून 27 लाख मिळवा ते कसे बघुयात ….

सुकन्या समृद्धी योजनेसाठी सध्याचा व्याजदर : 8.2%

मासिक गुंतवणूक : 5000 रुपये

वार्षिक गुंतवणूक : 60,000 रुपये

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते समजा या वर्षी म्हणजेच 2024 ला सुरू केले तर 2045 हे वर्ष मॅच्युरिटी वर्ष असेल.

एकूण गुंतवणूक : 60,000X15 = 9,00,000/-

एकूण व्याज – 18,71,031 रुपये

मिळणारी एकूण रक्कम – 27,71,031रुपये

ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची महत्वपूर्ण योजना…

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version