Best 5 websites for stock analysis | स्टॉक एनालिसिस साठी पाच बेस्ट वेबसाइट्स | Best websites for stock analysis 2024 –

Best 5 websites for stock analysis | स्टॉक एनालिसिस साठी पाच बेस्ट वेबसाइट्स | Best websites for stock analysis 2024 –

   आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा पाच वेबसाईट ( Best 5 websites for stock analysis ) बघणार आहोत की ज्याच्या मदतीने स्टॉक ऍनॅलिसिस करणे सोपे होईल. जाणून घेऊयात स्टॉक ऍनॅलिसिस साठी पाच बेस्ट वेबसाईट ( Best 5 websites for stock analysis ) बद्दल अधिक माहिती…

Best 5 websites for stock analysis | स्टॉक एनालिसिस साठी पाच बेस्ट वेबसाइट्स –

Best 5 websites for stock analysis

Best 5 websites for stock analysis

१. Money Control | मनी कंट्रोल –

– मनीकंट्रोल ही भारतीय स्टॉक इन्वेस्टर मध्ये लोकप्रिय असणारी वेबसाइट आहे.

– या वेबसाइटवर तुम्हाला मार्केट न्यूज, ट्रेंड, चार्ट, लाईव्ह स्टॉक किमती, चलने, म्युच्युअल फंड, पर्सनल फायनान्स, IPO , कमोडिटीज इत्यादी सर्व प्रकारची माहिती मिळू शकते.

– मनीकंट्रोल वेबसाइट इन्व्हेस्टमेंट ट्रॅक करण्यासाठी आणि विश लिस्ट तयार करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करते.

– इक्विटी इन्वेस्टर साठी, येथे तुम्ही टेक्निकल इंडिकेटर्स सह कोणत्याही कंपनीचा फंडामेंटल डेटा (कँडलस्टिक चार्टसह) शोधू शकता.

– मनी कंट्रोल या वेबसाईटवर डिस्कशन फोरम म्हणून एक फीचर आहे ज्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये घडत असलेल्या हालचालींबद्दलची माहिती येथील डिस्कशन वरून आपल्याला कळू शकते. 

– परंतु या ठिकाणी होत असलेल्या डिस्कशन वरून लगेच निर्णय घेणे योग्य ठरणार नाही कारण काही डिस्कशन स्पॅम सुद्धा असू शकतात.

– मनी कंट्रोल सर्व मोबाइल प्लॅटफॉर्मवर ॲप देखील ऑफर करते- Android, IOS आणि Windows. ॲप सिंपल युजर इंटरफेस आणि चांगले नेव्हिगेशन फिचर्स देते.

२. Screener | स्क्रिनर –

– स्क्रिनर या वेबसाईटवरील बहुतेक फीचर्स फ्री आहेत. 

– स्क्रीनर ही फंडामेंटल अनालिसिस परफॉर्म करण्यासाठी चांगली वेबसाईट आहे जसे की फायनान्शिअल स्टेटमेंट, रेशो इत्यादी. 

– या वेबसाईटवर कंपनी बद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते जसे की फायनान्शिअल रेशोज, चार्टस, एनालिसिस, कॉर्टरली रिझल्ट, रिझल्ट, बॅलन्स शीट, कॉम्पिटिटर्स, प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट, कॅश फ्लोज इत्यादी.

– जनरली कंपनीचे फायनान्शिअल स्टेटमेंट खूप मोठे असतात परंतु स्क्रीनरवर हे स्टेटमेंट छोट्या रिपोर्ट्स मध्ये कन्व्हर्ट करते, ज्यामुळे युजफुल इन्फॉर्मेशन लवकर मिळते.

– या वेबसाईटवर डिस्प्ले होणारा डेटा युजर फ्रेंडली असल्यामुळे अगदी कोणीही ॲन्युअल रिपोर्ट्स, बॅलन्स शीट यांसारखी माहिती सहजरीत्या वाचू शकते.

३.NSE India | एन एस ई इंडिया –

– ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ची अधिकृत वेबसाइट आहे.

– तुम्ही एनएसई एक्सचेंजवर लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्यांची आर्थिक माहिती आणि स्टॉक कोट्स मिळवू शकता.

– या वेबसाइटवर दिलेली माहिती अचूक आणि सातत्याने अपडेट केली जाते.

– कंपनीने त्यांचे फायनान्शियल रिपोर्ट्स एक्स्चेंजला सादर करणे आवश्यक असल्याने, तुम्ही या वेबसाइटवर कोणत्याही कंपनीचे तिमाही अहवाल, शेअरहोल्डिंग पॅटर्न, बल्क  /ब्लॉक डील डिटेल्स यासारखा फायनान्शिअल डेटा इथे मिळू शकतो.

– चार्ट्स तसेच या वेबसाइटवर NSE आणि निफ्टी संबंधी हिस्टॉरिक डेटा उपलब्ध आहेत. 

–  कॉर्पोरेट्स, डोमेस्टिक आणि फॉरेन इन्वेस्टर , न्यू लिस्ट, IPO इत्यादींबद्दल माहिती शोधू शकता.

४.Trade Brains Portal | ट्रेड ब्रेन्स पोर्टल –

– स्टॉक रिसर्च आणि ॲनालिसिस करता येईल अशी ट्रेड ब्रेन्स पोर्टल ही वेबसाईट आहे. 

– स्टॉक एक्स्चेंज (NSE आणि BSE) मध्ये लिस्टेड असलेल्या 4,000 हून अधिक कंपन्यांची सर्व माहिती एका  क्लिकवर उपलब्ध आहे.

– विविध फीचर्स या ठिकाणी उपलब्ध आहे जसे की मल्टिपल स्टॉक एका स्क्रीनवर कम्पेअर करता येतील असे स्टॉक स्क्रीनर्स , व्हेरियस स्टॉक बास्केट्स, मल्टिपल वॉच लिस्ट, सुपरस्टार ट्रेडर्स पोर्टफोलिओज, फायनान्शिअल रेशो इत्यादी.

५. investing.com | इनवेस्टिंग –

– जर तुम्हाला पब्लिक कंपनीशी संबंधित माहिती मिळवायची असेल तर इनवेस्टिंग ही एक उत्तम साइट आहे.

– तुम्ही या वेबसाइटवर स्टॉकचे फंडामेंटल आणि टेक्निकल एनालिसिस करू शकता.

– या वेबसाईटवर जनरल इन्फॉर्मेशन, न्यूज आणि ॲनालीसिस, चार्ट्स, फायनान्शियल, टेक्निकल्स, फोरम्स यांसारखी माहिती मिळते.

– इन्व्हेस्टिंग डॉट कॉम या वेबसाईटवरील काही फीचर्स फ्री मध्ये आपण वापरू शकतो.

– या वेबसाईटवर स्टॉक स्क्रीनर असे एक टूल आहे ज्याच्या मदतीने स्टॉक्स स्क्रीन करून मार्केट कॅपिटलायझेशन, पी इ रेशो, ROE, CAGR यासारख्या वेगवेगळ्या क्रायटेरियावर आधारित स्टॉक शॉर्टलिस्ट करू शकतो..

   अशाप्रकारे मनी कंट्रोल, स्क्रीनर, एन एस इ इंडिया, ट्रेड ब्रेन्स पोर्टल, इन्वेस्टिंग डॉट कॉम या स्टॉक ऍनॅलिसिस करण्यासाठी चांगल्या वेबसाइट्स ( Best 5 websites for stock analysis ) आहेत.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment