Aadhar enrollment supervisor Recruitment 2024
Training, Testing and Certification
Aadhar enrollment supervisor recruitment 2024 | आधार एनरोलमेंट सुपरवायझर रिक्रुटमेंट 2024 –
नमस्कार ,जय महाराष्ट्र !
आपल्या आयकॉनिक मराठी चॅनल वर आपण वेगवेगळ्या इन्कम आयडियाज, बिझनेस आयडिया, जॉब वॅकन्सी याबद्दल माहिती घेऊन येत असतो आज सुद्धा असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आधार एनरोलमेंट सुपरवायझर रिक्रुटमेंट 2024 याबद्दल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत… चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया…
आता इलेक्शन जवळ आलेले आहे त्यामुळे म्हणा किंवा तसही स्थलांतर केल्यामुळे किंवा लग्न झाल्यानंतर पत्ता चेंज करणे, नाव चेंज करणे, आधार अपडेट करणे यांसारखी आधार अपडेट करण्याची कामे करावी लागतात आणि ते महत्त्वाचे सुद्धा आहे कारण आधार कार्ड हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि आपण सुद्धा सुपरवायझर म्हणून काम करू शकतो त्यासाठी नक्की पात्रता काय लागेल ,रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत….
यासाठी बारावीपर्यंत शिक्षण ही पात्रता असणार आहे तर जर समजा तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर असाल तर दहावीपर्यंत शिक्षण ही पात्रता लागू असणार आहे.
या साठी सर्वात सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे ,त्यानंतर आपल्याला ट्रेनिंग मटेरियल उपलब्ध होईल , नंतर एक टेस्ट घेतली जाईल आणि त्यानंतर टेस्ट क्लिअर केल्यावर एक सर्टिफिकेट आपल्याला मिळेल. या सर्टिफिकेट चा उपयोग एनरोलमेंट सुपरवायझर ऑपरेटर आणि child enrolment lite client ऑपरेटर या दोन पोस्टसाठी होईल.
आपल्याकडे जर हे सर्टिफिकेट असेल तर आपल्याकडे पुढील पर्याय उपलब्ध आहेत –
१ . नोकरी करू शकतो
२ . आधार सेवा केंद्र सुरू करू शकतो
३ . ऑनलाईन काम करू शकतो
४ . त्याचबरोबर गव्हर्मेंट ऑफिसेस जसे की बँक ,पोस्ट ऑफिस या ठिकाणी सुद्धा फॅसिलिटी उपलब्ध असते त्या ठिकाणी सुद्धा अप्लाय करू शकता.
* इंग्लिश आलेच पाहिजे असे नाही ,येत असल्यास उत्तम.
Registration –
– सर्वप्रथम UIDAI या अधिकृत वेबसाईटवर जा.
– ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर लैंग्वेज सिलेक्ट करू शकता.
– यानंतर “इकोसिस्टीम” या ऑप्शन वर क्लिक करून तेथील “ट्रेनिंग, टेस्टिंग अँड टेस्टिंग इकोसिस्टीम” या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
– या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती बघायला मिळेल. १.एनरोलमेंट सुपरवायझर ऑपरेटर आणि
२. चाइल्ड एनरोलमेंट लाईट क्लाएंट ऑपरेटर
एनरोलमेंट सुपरवायझर ऑपरेटर स्वतःचे आणि चाइल्ड एनरोलमेंट लाईट क्लाएंट ऑपरेटर हे दोन्ही काम करू शकतात ,परंतु चाइल्ड एनरोलमेंट लाईट क्लाएंट ऑपरेटर हे एनरोलमेंट सुपरवायझर ऑपरेटरचे काम करू शकत नाही.
– या आधी सांगितल्याप्रमाणे आपली टेस्ट होईल ती टेस्ट पास झाल्यानंतर जे काही मार्क्स आपल्याला येतील त्यानुसार या पोस्ट साठी आपल्याला सर्टिफिकेट देण्यात येते.
– ही टेस्ट देण्याकरता 399 + 18 %gst म्हणजेच 470 च्या आसपास फी भरावी लागेल. एकदा फी भरल्यावर सहा महिन्यांच्या आत ही परीक्षा देणे गरजेचे आहे. जर समजा ही परीक्षा आपण फेल झालो तर दर पंधरा दिवसांनी पुन्हा ही परीक्षा आपल्याला देता येईल असे सहा महिन्यांपर्यंत करता येईल परंतु त्यानंतर टेस्ट देण्यासाठी पुन्हा 199 रुपये फी भरावी लागेल.
– रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आपण हॅन्ड बुक, सिलॅबस, कोणकोणते सॉफ्टवेअर्स असतात याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकतो. हँडबुक व्यवस्थित रित्या वाचून घेतल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करावे.
– आता”ट्रेनिंग, टेस्टिंग अँड टेस्टिंग इकोसिस्टीम”यावर आपण क्लिक केलेले होते आणि ते पेज ओपन आहे त्यावरील पॉईंट नंबर ६ मध्ये रजिस्ट्रेशन लिंक आहे त्यावर क्लिक करावे.
– नंतर त्या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड विचारण्यात येतो परंतु जर समजा आपण नवीन यूजर असो असू तर क्रिएट न्यू यूजर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
– आता पुढील पेजवर XML file आणि share code विचारत आहे ,हे काय असते बघुयात.How to apply ह्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आपल्याला जी भाषा व्यवस्थित रित्या येते ती भाषा आपण येथे सिलेक्ट करायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला माहिती बघायला मिळेल त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे –
१ . आपले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे.
२ . आपला लेटेस्ट फोटोग्राफ आधार कार्डवर अपडेट असणे गरजेचे आहे.
येथील सर्व मुद्दे व्यवस्थित रित्या वाचून घ्यायचे आहे.
३ . ज्यावेळी आपले आधार कार्ड वर हे सर्व व्यवस्थितरित्या अपडेट असेल त्यानंतर येथे पॉईंट नंबर ४ मध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपले आधार कार्ड डाऊनलोड करावे लागेल.
– यासाठी लॉगिन करायचे आहे.
– लॉगिन केल्यानंतर एक फाईल आपल्याला मिळेल जी आपल्याला डाऊनलोड करायची आहे जी XML फॉरमॅटमध्ये असेल.
– आता ही फाईल आपल्याला अपलोड एक्स एम एल फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे ही फाईल अपलोड केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक कोड येईल तो कोड शेअर कोड या ऑप्शन मध्ये टाकायचा आहे आणि एक्सट्रॅक्ट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपली व्हेरिफिकेशन होईल.
– त्यानंतर आपला रजिस्टर कॅंडिडेट आयडी आणि डिफॉल्ट पासवर्ड कॅंडिडेट च्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वर सेंड केला जातो.
– ज्यावेळी आपण फर्स्ट टाइम लॉगिन करू त्यावेळी डिफॉल्ट पासवर्ड चेंज करता येतो.
– कॅंडिडेट ने त्यांचा रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे ज्याचा उपयोग सर्टिफिकेशन टेस्ट साठी आणि इतर details बघण्यासाठी होईल.
– त्यानंतर आपल्याला आपले कॉलिफिकेशन, एक्झाम साठीचे सेंटर यांसारखी सर्व माहिती भरून सबमिट करायचे आहे.
– त्यानंतर फी भरायची आहे. फी रिफंडेबल नसते.
– ती भरून झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर जर एक्झाम स्लॉट आपल्यासाठी उपलब्ध नाही झाला तर त्या ठिकाणी दिलेल्या ईमेल आयडीवर आपण तसा मेल करू शकतो किंवा कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकतो.
Aadhar enrollment supervisor recruitment- Apply
Aadhar Official Website- Link
जॉईन करा Whatsapp वर | https://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |