Work from home income ideas | घरबसल्या कमाई करता येण्यासाठी काही इन्कम आयडियाज | Affiliate Programs | Best opportunities 2024

Work from home income ideas | घरबसल्या कमाई करता येण्यासाठी काही इन्कम आयडियाज | Affiliate Programs –

      अफीलियट मार्केटिंग बद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे परंतु ती अशी की अफीलियट मार्केटिंग म्हणजे अफीलियट मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तीने सोशल मीडिया मार्केटिंग द्वारे किंवा इतर ठिकाणी प्रमोशन आणि मार्केटींग करून त्यांच्या अफीलियट लिंक वर ग्राहकांनी क्लिक करून प्रॉडक्ट्स खरेदी केल्यानंतर अफीलियट मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तीला कमिशन मिळते परंतु हे फक्त तेवढ्यापुरताच मर्यादित न राहता,अफीलियट प्रोग्रॅम मध्ये सामील होऊन इतर लोकांनी आपल्या लिंक द्वारे फ्री अकाऊंट मध्ये साइन अप करून कमाई करता येऊ शकते. या ब्लॉगमध्ये विविध अफीलियट प्रोग्रॅम (Affiliate Programs) बद्दल माहिती बघणार आहोत. 

Advertisement

Affiliate Programs for Earning Money | Affiliate Programs

Affiliate Program 1: Hostinger

– Hostinger हा असा अफिलीएट प्रोग्रॅम आहे की जो अफिलिएट लिंक द्वारे झालेल्या प्रत्येक सेलवर 60 टक्के कमिशन ऑफर करतो.

– जर युझर्स ने फ्री अकाउंट साइन अप केले तर काही परचेस न करता त्यावर काही कमावता येणार नाही. परंतु, असे इतर प्रोग्रॅम्स आहेत जिथे तुम्ही युझर्सने कोणतेही अतिरिक्त पर्चेस केले नाही तरी कमाई करू शकता. चला तर बघुयात असे Affiliate Programs

Affiliate Program 2: Semrush

– Semrush हे पॉपुलर कीवर्ड रिसर्च टूल असून ब्लॉगिंग साठी, SEO तसेच ऍड कॅम्पेनसाठी वापरले जाते.

– Semrush affiliate program जॉईन करून तीन मार्गांनी रेव्हेन्यू अर्न करता येऊ शकतो.

– जर एखाद्या युजरने प्रीमियम प्लान आपल्या अफिलिएट लिंक वरून परचेस केला तर त्या युजरच्या साइन अप नंतर 

$200 पर्यंत कमिशन आपल्याला मिळू शकते. 

– युजरने फ्री ट्रायल साठी जरी साइन अप केले तरीसुद्धा $10 कमिशन आपल्याला मिळते.

– आणि एखाद्या युजरने फ्री ट्रायल साठी किंवा इतर प्लॅनसाठी enrol न करता फक्त साईन अप केले आहे तरीसुद्धा $0.01 कमिशन मिळते.

– जर अशाप्रकारे आपली 100 लोकांपेक्षा जास्त लोकांची कम्युनिटी बनली म्हणजेच 100 लोकांपेक्षा जास्त लोक जॉईन झाले तर प्रत्येक साईन अप वर $1 कमिशन मिळेल.

– जे लोक Semrush युज करतात ते लोक तीस दिवसांची फ्री ट्रायल घेतातच त्यामुळे असे दहा लोक जरी जॉईन झाले तरी $100 रीव्हेन्यू मिळू शकेल.

Affiliate Program 3: Grammarly

– Grammarly सर्वांना माहीतच आहे की हे Google Chrome extension आहे तसेच ग्रामर करेक्शन टूल सुद्धा आहे.

– आपल्या अफिलिएट लिंक वरून जर युजरने साइन अप केले तेही अगदी फ्री तर $0.20 मिळतात यासाठी Grammarly चांगल्या रीतीने आपण प्रमोट करू शकतो.

– जर युजरने सबस्क्रीप्शन प्लान परचेस केले तर $20 पर्यंत रेव्हेन्यू मिळू शकते.

Affiliate Program 4: ShareASale

– ShareASale हे एक अफिलीएट मार्केट प्लेस आहे या ठिकाणी विविध अफिलीएट प्रोग्रॅम्स आहेत. परंतु हे अफिलीएट प्रोग्रॅम्सचे प्रॉडक्ट सेल न करता आपल्याला फक्त ShareASale ला प्रमोट करायचे आहे.

– ShareASale वर आपल्या लिंक द्वारे कोणीही फक्त साइन अप जरी केले तरी अशा प्रत्येक लीडवर $30 पर्यंत earning करता येऊ शकते, या ठिकाणी युजरला कुठलेही परचेस करायचे नाही फक्त युजरने साइन अप केले आणि त्यानंतर युजरचे अकाउंट वापरून झाले तरीसुद्धा आपल्याला $30 मिळतात.

– जर भविष्यामध्ये त्या युजरने ShareASale वरून काही परचेस केले किंवा लिंक जनरेट करून सेल केले तरीसुद्धा $150 पर्यंत मिळू शकतात.

Affiliate Program 5 : Constant contact 

– Constant contact हे एक ईमेल मार्केटींग टुल आहे.

– आपल्या लिंक वरून Constant contact वर जाऊन जर कुणीही फ्री अकाऊंट बनवले तरीही $5 मिळतील.

– जर तो यूजर फ्री ट्रायल वरून प्रीमियम अकाउंट मध्ये कन्व्हर्ट झाला तर $105 मिळतील.

Affiliate Program 6: Plural Sight

– Plural Sight हे एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे जे विविध कोर्सेस ऑफर करते.

– Plural Sight प्रमोट करून $5 प्रत्येक फ्री अकाउंट आपल्याला मिळू शकतात.

– जर युजरने सबस्क्रिप्शन प्लान परचेस केला किंवा इतर कोर्सेस परचेस केले तर 15 ते 50 % पर्यंत कमिशन मिळू शकते, युजर मंथली सबस्क्रिप्शन घेत आहे की ॲन्यूल ह्यावर हे डिपेंड आहे.

Affiliate Program 7: SendinBlue

– SendinBlue हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जे ई-मेल मार्केटिंग, एसएमएस मार्केटिंग, व्हाट्सअप मार्केटिंग कॅम्पेन, लँडिंग पेजेस ऑफर करते.

– SendinBlue प्रमोट करून प्रत्येक साईन अप वर 5€ मिळतात.

– जर युजरने मंथली किंवा वार्षिक सबस्क्रीप्शन घेतले तर अशावेळी 100€ पर्यंत कमिशन आपल्याला मिळू शकते. 

   अशाप्रकारे विविध अफिलिएट प्रोग्रॅम्स (Affiliate Programs) आहेत ज्याद्वारे चांगले इनकम कमावले जाऊ शकते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment