12वी नंतर करता येणारे 6 डिमांडिंग करीयर पर्याय | Most in demanding career options after 12th

12वी नंतर करता येणारे 6 डिमांडिंग करीयर पर्याय | Most in demanding career options after 12th

Blockchain Developer –

मित्रांनो web 3.0 चा revolution  हळू हळू वाढत आहे. तुम्ही बघितल असेल web 2.0 मध्ये  जस computer technology, search engine अश्या अनेक गोष्टी नवीन आल्यात. तसचं web 3.0  मध्ये खूप मोठ्या प्रमाणवर revolution होणार आहे. त्यात सर्वात जास्त blockchain technology चा वापर होणार आहे. आणि तुम्ही जर करीयर म्हणून जर blockchain technology ला बघत असणार तर हा खूप चांगला पर्याय आहे. blockchain technology सर्वच ठिकाणी use होणार आहे. त्यामुळे जे blockchain developer असतील त्यांची मागणी सर्वात जास्त असेल. म्हणून तुम्ही as a career block chain technology ला बघू शकतात. Mostly used blockchain technology in nft’s.
Advertisement

 शिक्षण – भारतातल्या अनेक institutes मध्ये blockchain technology वर 6 महिने 1 वर्ष असे कोर्सेस उपलब्ध आहे. किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा अनेक वेबसाईट वरून करू शकतात. 

AI( Artificial Intelligence Developer/Engineer)-

मित्रांनो AI तुम्हाला जर माहिती असेल Artificial Intelligence तर AI मुळे सर्व गोष्टी Automatic होत आहेत. आणि जे पण क्षेत्र तुम्ही पहाल त्या सर्व क्षेत्रात AIचा वापर होतो. त्यामुळे AI Devloper किंवा AI Engineers ची डिमांड वाढत आहे. AI मुळे सर्व गोष्टी automatic होतात. आणि त्यामुळे प्रत्येक कंपनी असेल बिसनेस असतील even youtube सुद्धा असेल तिथे AI चा वापर होतो. आणि AI Devloper ची डिमांड हळू हळू वाढत आहे. भविष्यामध्ये खूप लोकांचे काम या AI मुळे चालले जातील. जस आधी कंपनी मध्ये काम करण्यासाठी 20 लोक लागायचे त्याच ठिकाणी आता AI मुळे एकच मशिन सर्व काम करते. तर 20 लोकांचा खर्च वाचतो. सर्व automatic होत. फक्त त्या मशिनला चालविण्यासाठी एक व्यक्तीची गरज असते. बाकी सर्व काम automatic होत असते. आणि तुम्ही जर बघितल असेल तर हॉटेल्स मध्ये पण रोबोट्स यांना AI द्वारे कमांड देऊन त्या हॉटेल्स ला waiterless हॉटेल नाव देण्यात आल. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात सर्वात जास्त गरज असणार हे क्षेत्र आहे. त्याचबरोबर AI मुळे delivery boy च सुद्धा काम drone करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर AI मध्ये करियर करू इच्छिता तर खूपच चांगले क्षेत्र आहे.

शिक्षण – या क्षेत्रात जाण्यासाठी 10वी नंतर Diploma in AI मधून करू शकतो. त्यानंतर यामध्ये डिग्री सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. किंवा 12 वी नंतर Engineering Collages मध्ये सुद्धा या AI शाखेत प्रवेश घेऊ शकतात.

Video production –

 जगामध्ये creator economy 100B$ झाली आहे. आणि 2027 पर्यंत ती trillion dollar of economy होणार आहे. आणि खूप सारे creators आज जगात आहे. आणि भविष्यातही creators ची संख्या खूप वाढणार आहे. आणि अश्या मध्ये त्या सर्व creators ला त्यांचे video next level edit करण्यासाठी video editor ची गरज आज पण आहे. आणि भविष्यात पण राहणार आहे. त्यामुळे video production या क्षेत्रात फक्त video editingच नाही तर vfx, animation सारख्या अनेक creative video तयार करणारे लोक पाहिजे आणि ते खूप कमी आहे. सर्वांना common video editing जमते. पण प्रोफेशनल edit करणारे किंवा animation तयार करणारे आजही खूप कमी आहेत. आणि याची गरज फक्त video creators यांनाच नाही तर आता हळू हळू शाळेत, कॉलेज मध्ये मुलांना animation video द्वारे digital board वर शिकवले जाणार आहे. एवढेच नाही तर movie industry मध्ये अश्या स्कील फुल लोकांची फार गरज आहे. तुम्ही जर kgf-2 movie पहिला असेल तर तो movie पुणे येथे राहणारा एका 19 वर्षाचा मुलगा उज्ज्वल कुलकर्णी याने केला आहे. म्हणजे एवढ्या कमी वयात काम मिळण म्हणजे आज त्याच्या कडे असलेली स्कील आणि अनुभव बघून दिल जात. आणि फक्त तुम्ही कोणताही जॉब न करता freelancing करून जर तुमची सर्विस देणार तुम्ही जॉब पेक्षा नक्कीच तुमची salary जास्त असेल. कारण skillful freelancers 1 मिनिटाचा video बनविण्याचे 10 हजार रुपयांपर्यंत चार्ज करतात. त्यामुळे as a freelancer तुमचा average package खूप जास्त असू शकतो.

शिक्षण – अनेक institutes आहेत जिथे तुम्ही video production मध्ये diploma कोर्स करू शकतात. किंवा ऑनलाईनही कोर्सेस उपलब्ध आहे.

Chartered Accountant –

मित्रांनो ज्या पद्धतीने भारताची अर्थव्यवस्था ग्रो होत आहे. त्यासोबतच Finance & Accounting क्षेत्रातील करीयर लोकांच आकर्षण ठरत चालल आहे. आणि एवढेच नाही तर या क्षेत्रातील असणाऱ्या प्रोफेशनल्सची आवश्यकता सुद्धा वाढत चालली आहे. त्यातलच एक पद म्हणजे CA(Chartered Accountant). CA ही पदवी खूप सन्मान पूर्व आणि जवाबदारी असलेली आहे. आज प्रत्येक कंपनी मध्ये CA ची आवश्यकता असते आणि प्रत्येक कंपनीत वेगवेगळ्या कामांसाठी CA ची आवश्यकता असते. जसे कि, Management, Audit, Accountant, Analysis, Taxation, Financial Advice आणि या कामांसाठी CAची खूप पदांवर नियुक्ती होते. जसे कि, CFO, Manager, Tax Advisor, Finance manager, accounts manager, financial business analyst, auditing, special auditing, chairman, managing director, CEO, finance director, financial controller, chief accountant, Chief Internal Auditor.

मित्रांनो commerce sector च नाव घेतलं तर सर्वात जास्त commerce मधल्या विद्यार्थ्यांचं स्वप्न CA ची परीक्षा पास होण असत. पण ही परीक्षा पाहिजे तेवढीही सोपी नसते. कारण दर वर्षी या परीक्षेत पास होणाऱ्या मुलांची संख्या खूप कमी असते. त्यामुळे कोणी जर या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पास झाला तर ती खूप मोठी गोष्ट समजली जाते.

CA Course कसा करावा. – 

12 वी पास झाल्यावर CA कोर्स तुम्ही करू शकतात. तीन स्टेप मध्ये तुम्हाला शिक्षण घ्याव लागत. CA चे प्रमाणपत्र हे सीए फाऊंडेशन, सीए इंटरमीडिएट आणि सीए फायनल या तीन परीक्षा पूर्ण केल्यानंतर दिले जाणारे व्यावसायिक प्रमाणपत्र आहे.

Civil Services –

मित्रांनो तुम्हाला जर देशाच्या सेवेत मोठा सहभाग घ्यायचा असेल. आणि तुम्हाला आत्मसन्मानासह चांगला पगार व सर्व सुख सोयी पाहिजे असतील तर तुम्ही Civil Services ची exam या पदापर्यंत पोहचू शकतात. यात देश सेवाही होते. सोबत सन्मान आणि सर्व सुख सुविधा फक्त अडचण यात एकच आहे. कि, संपूर्ण भारतातून मुल यापरीक्षेसाठी तयारी करतात पण बोटावर मोजण्या इतकेच जागा या पदांसाठी निघत असतात. त्यामुळे तुमची मेहनत घायची तयारी असेल तर तुम्ही civil services ची तयारी करू शकतात.

परीक्षा व निवड –

Civil Services मध्ये जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करावी लागते. MPSC आणि UPSC या परीक्षा असतात.

Medical Professionals –

मित्रांनो lockdown मध्ये आपल्या सर्वांना माहित पडलेच आहे.  कि, medical professionals ची गरज किती आहे. त्याआधीही होती आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. म्हणून या क्षेत्रात पैश्याची लिमिट नाहीये. अनेक प्रकारचे प्रोफेशन्स या क्षेत्रात आहे. त्यापैकी तुम्ही एक क्षेत्र निवडून करीयर करू शकतात.

परीक्षा – या क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला NEET, किंवा CET(PCB) या परीक्षा देता येतील.

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version