Agriculture related business idea | शेती संदर्भामधील काही हटके बिझनेस | Business ideas

Agriculture related business idea | शेती संदर्भामधील काही हटके बिझनेस आयडिया | Business ideas –

    शेती हा एक व्यवसाय आहेच, परंतु शेती सोबतच इतर सुद्धा काही व्यवसाय करता येणे शक्य आहे. बरेचसे लोक असे व्यवसाय करतात सुद्धा आणि त्याद्वारे चांगली कमाई सुद्धा करतात. आजच्या लेखामध्ये आपण शेती निगडित अशाच काही व्यवसाय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत….

१ . सेंद्रिय शेती ( Organic Farming ) : 

सध्या सेंद्रिय उत्पादनांना मागणी वाढत आहे त्यामुळे कृत्रिम कीटकनाशके आणि खतांचा वापर न करता फळे, भाज्या किंवा औषधी वनस्पतींचे उत्पादन करणारी सेंद्रिय शेती सुरू करून चांगली कमाई केली जाऊ शकते.

२ . कृषी-पर्यटन (Agro Tourism ): 

    सध्या कृषी पर्यटनाला सुद्धा खूप स्कोप आहे.तुम्ही सुद्धा तुमचे फार्म विजिटरसाठी खुले करू शकता.फार्म टूर, वर्क शॉप्स आणि इतर ॲक्टिविटिज उदाहरणार्थ, फोटोग्राफी यांसाठी विविध ऑफर देवू शकता.यामुळे शेतीबाबत जनजागृती होईल आणि उत्पन्न सुद्धा मिळू शकते.

३ . एक्वापोनिक्स शेती ( Aquaponics Farming ) : 

ही शेतीची एक आधुनिक पद्धत आहे, यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय सुद्धा कमी होऊ शकतो. शाश्वत आणि फायदेशीर शेती व्यवस्था तयार करण्यासाठी जलचर ( मासे किंवा इतर जलचर, शक्यतो मासे ) हायड्रोपोनिक्स (मातीशिवाय वाढणाऱ्या वनस्पती / झाडे ) एकत्र वाढ केली जाते असे म्हणू शकतो.एक्वापोनिक्स शेती द्वारे सुद्धा चांगले उत्पन्न मिळू शकते.

४ . कृषी सल्लागार ( Agri-Consulting ): 

तुमच्याकडे जर शेतीसंदर्भामधील डिग्री असेल किंवा तुम्हाला शेती संदर्भात अधिक ज्ञान असेल तर इतर शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, मातीचे आरोग्य कसे चांगले राखावे, किंवा आधुनिक शेती तंत्राची अंमलबजावणी कशी करता येते, उत्पन्न कसे वाढवावे, कोणत्या ठिकाणी कोणते पीक घ्यावे या सर्व गोष्टींबाबत मार्गदर्शन करू शकता,कृषी सल्लागार बनू शकता.

५ . कृषी उपकरणे भाड्याने देवू शकता ( Agri-Equipment Rental ) –

    खरंतर आपल्या गावाकडे आपण शेतकरी मंडळी कोणाकडे जर ट्रॅक्टर असेल आणि नांगर नसेल परंतु त्यांना नांगर हवा असेल अगदी सहज विनामूल्य त्यांना नांगर नेण्याची परवानगी देतो असा आपला स्वभाव असतो. परंतु जर तुमच्याकडे कृषी संदर्भांमधील जास्तीची उपकरणे असतील तर किंवा तुम्ही कृषी उपकरणांमध्ये गुंतवणूक सुद्धा करू शकता म्हणजेच जास्तीचे उपकरणे खरेदी करू शकता आणि ज्या शेतकऱ्यांकडे ही उपकरणे नाहीत त्यांना ही उपकरणे भाड्याने देऊ शकता असे केल्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा आगाऊ येणारा खर्च वाचू शकेल आणि आपल्याला सुद्धा त्यातून उत्पन्न मिळू शकते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment