मोफत पिठाची गिरणी योजना | Mofat Pithachi Girani Yojana| Free Flour Mill scheme Maharashtra

      केंद्र सरकार तर्फे तसेच राज्य सरकार तर्फे जनतेच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. महिलांना काहीतरी लघुउद्योग करता यावा.त्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी आपण एका योजनेबद्दलची माहिती बघणार आहोत ती योजना आहे –  मोफत पिठाची गिरणी योजना.

Advertisement

मोफत पिठाची गिरणी योजना | Free Floor Mill scheme Maharashtra –

– महिलांना आत्मनिर्भर बनता यावे, स्वावलंबी बनता यावे, स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरू शकते.

– राज्यामध्ये सामाजिक तसेच आर्थिक विकास करण्याचा या योजनेचा उद्देश असून या योजनेमुळे महिलांना रोजगार मिळेल तसेच आर्थिक हातभार लागेल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे किंवा कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे सोपे होऊ शकते.

– मोफत पिठाची गिरणी योजना ही महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे.

– या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी म्हणजेच मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी महिलेला काहीच रक्कम भरावी लागत नाही म्हणजेच या योजनेमार्फत 100% अनुदान दिले जाते 

– ही योजना विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुद्धा सोपी ठेवण्यात आलेली आहे.

पीठ गिरणी योजना या योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक अनुदान –

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पिठाच्या गिरणीच्या एकूण किमती इतके म्हणजेच शंभर टक्के अनुदान दिले जाते.

मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी नियम आणि अटी –

– अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.

– अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे.

– अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नसावे.

– अर्जदार महिलेच्या कुटुंबामधील कोणीही शासकीय नोकरीमध्ये नसावे.

– आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांमधील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

– ही योजना फक्त ग्रामीण भागातील महिलांपुरतीच मर्यादित आहे या योजनेचा लाभ शहरी भागामधील महिलांना घेता येणार नाही.

– अर्जदार महिलेच्या कुटुंबातील इतर मुली किंवा महिला जरी या योजनेसाठी पात्र असतील तरी या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका महिलेलाच घेता येईल.

– तसेच अर्जदार महिलेने इतर केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या योजनेमार्फत मोफत पिठाची गिरणीचा लाभ मिळवला असल्यास या योजनेचा लाभ पुन्हा अर्जदार महिलेला घेता येणार नाही.

मोफत पिठाची गिरणीसाठी आवश्यक कागदपत्रे – 

– आधार कार्ड

– रेशन कार्ड

– रहिवासी दाखला

– कुटुंबाचा उत्पनाचा दाखला 

– जातीचा दाखला ( अनुसूचित जाती/जमातीचे असल्यास )

– पासपोर्ट साईज फोटो

– मोबाईल नंबर

– प्रतिज्ञा पत्र

– व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्यास आठ अ चा घराचा उतारा जोडावा

– इलेक्ट्रिसिटी बिल झेरॉक्स ( विद्युत पुरवठा सोय )

मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज –

– मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.

– हा अर्ज ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागात जाऊन घ्यावा व अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा.

– जर अर्जदार या योजनेसाठी खरोखरच पात्र असेल तर मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ अर्जदारास मिळेल.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment