आपल्या बेबीसाठी मिळवा बेबी केअर किट अगदी मोफत | Baby Care Kit Yojana | बेबी केअर किट योजना | Best Government schemes 2024

आपल्या बेबीसाठी मिळवा बेबी केअर किट अगदी मोफत | Baby Care Kit Yojana | बेबी केअर किट योजना

     राज्य सरकारतर्फे तसेच केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जात असतात त्यापैकी काही योजना गरोदर महिलांसाठी सुद्धा असतात. महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा राज्यांमधील गरोदर महिला आणि त्यांच्या नवजात बालकांसाठी सुद्धा विविध योजना राबवल्या जात असतात. अशीच एक योजना बेबी केअर किट योजना ( Baby care Kit Yojana ) याबद्दल अधिक माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Advertisement

Baby Care Kit Yojana | बेबी केअर किट योजना –

– 26 जानेवारी 2019 रोजी बेबी केअर किट योजनेची सुरुवात झाली.

– बेबी केअर किट या योजनेंतर्गत शासकीय रुग्णालयामध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या प्रसूतीमध्ये जन्मलेल्या नवजात बालकाला अंगणवाडी सेविकांच्या मदतीने बेबी केअर किटचा लाभ दिला जातो. 

– सरकारी रुग्णालयात महिलांना बाळांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ” बेबी केअर किट ” ही योजना सुरू करण्यात आली आहे.

– महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांची पहिली प्रसूती शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हावी, असा सुद्धा या योजनेमागील उद्देश आहे.

–  त्याचबरोबर नवजात बाळाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे,ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि आई आणि बालकाच्या मृत्युदराचे प्रमाण कमी होणे असे सुद्धा उद्दिष्ट या योजनेचे आहे.

Baby Care Kit Yojana लाभार्थी –

सरकारी रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मलेले पहिले बाळ बेबी केअर किट योजनेचे लाभार्थी असतील.

बेबी केअर किट मध्ये काय काय असते? 

– थर्मामीटर

– टॉवेल

– बाळाचे कपडे (लंगोट, सदरा)   

– डायपर 

– मच्छरदाणी

–  बेबी ऑइल

– प्लास्टिक चटई

–  बेबी शाम्पू

–  थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ब्लँकेट 

– नेल कटर 

– खेळणी 

– बाळाचे हातमोजे ,पायमोजे

– मातांसाठी हात धुण्याचे लिक्वीड 

– झोपण्यासाठी एक लहान गादी 

– सर्व साहित्य ठेवण्यासाठी एक लहान पिशवी

बेबी केअर किट योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता | Eligibility for Baby care Kit Yojana –

– अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. 

– महिलेची प्रसूती सरकारी रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली तरच या योजनेचा लाभ घेता येईल.

– डिलिव्हरीच्या 2 महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

बेबी केअर किट योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे  | Necessary documents for for Baby care Kit Yojana –

– शिधापत्रिका झेरॉक्स

– पालकांचे आधार कार्ड 

– आईच्या बँक खात्याचे डिटेल्स

बेबी केअर किट योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया  | Application for Baby care Kit Yojana –

– बेबी केअर किट योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे शक्य नाही त्यामुळे बेबी केअर किट योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी आपल्या परिसरातील जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये भेट द्यावी.

– अंगणवाडी केंद्रामधून बेबी केअर किट योजनेसाठीचा अर्ज मिळवावा तसेच या योजनेबद्दल इतर काही माहिती हवी असल्यास त्या ठिकाणावरून मिळेल.

– बेबी केअर किट योजनेचा अर्ज व्यवस्थित रित्या भरावा त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडावी आणि अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा.

– अर्ज जमा केल्यानंतर आपली सर्व कागदपत्रे तसेच इतर माहिती बरोबर असल्यास म्हणजेच आपण या योजनेसाठी पात्र असल्यास बेबी केअर किट योजनेचा लाभ आपल्याला दिला जाईल.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version