Bandhkam Kamgar Pradhanmantri Suraksha Vima Yojana –

बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना  –
      बरेच लोक बांधकाम कामगार म्हणून काम करत असतात परंतु हे काम करत असताना त्यांचा काही अपघात झाला किंवा त्यांना काही दुखापत झाली तर आर्थिक परिस्थिती गरीब असल्याकारणाने त्यांना त्यावर उपचार करणे कठीण होऊन जाते आणि अशातच अपघाताचा मृत्यू आला तर त्यांच्या कुटुंबाचे पुढे काय…?
Advertisement
   जर समजा बांधकाम कामगारांचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत त्या कामगारांचा विमा उतरवला जातो.

बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना | Bandhkam Kamgar Pradhanmantri Suraksha Bima Yojana –

– बरेचसे बांधकाम कामगार आर्थिक दृष्ट्या गरीब असतात मग अशावेळी जर त्यांचा अपघात झाला तर त्यांच्याकडे औषध उपचार करण्यासाठी सुद्धा पैसे उपलब्ध नसतात.
– सध्या प्रत्येक नागरिकाने विमा काढणे आवश्यक आहे परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने प्रत्येक व्यक्तीला ते शक्य होते असे नाही त्यामुळेच बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना सुरू करण्यात आलेली आहे.
– बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दोन लाखांपर्यंतचा विम्याचा लाभ महिन्याला फक्त एक रुपया भरून घेता येणार आहे.

बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा फायदा | Bandhkam Kamgar Pradhanmantri Suraksha Bima Yojana benefit –

महिन्याला फक्त एक रुपया भरून बांधकाम कामगारांना दोन लाखांपर्यंतचा विमा लाभ बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत घेता येणार आहे.

बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Bandhkam Kamgar Pradhanmantri Suraksha Vima Yojana

– पासपोर्ट साईज फोटो
– जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
– आधार कार्ड
– पॅन कार्ड
– रहिवासी दाखला
– कायमचा पत्ता पुरावा
– 90 दिवस काम केले आहे असे प्रमाणपत्र
– मोबाईल नंबर
– काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
– नोंदणी अर्ज
– बँक पासबुक झेरॉक्स
– नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
– महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
– ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
– घोषणापत्र

बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज | Application for Bandhkam Kamgar Pradhanmantri Suraksha Vima Yojana –

– पुढे बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे तेथून फॉर्म डाउनलोड करता येऊ शकतो.
– त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितरित्या भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून हा फॉर्म आपल्या क्षेत्रांमधील कामगार कार्यालयात जमा करावा.

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म पी डी एफ – येथे क्लिक करा

बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म – येथे क्लिक करा.  



ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

नोंदणी व नुतणीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले नविन 90 दिवसांचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे – येथे क्लिक करा
 
बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र- येथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म – येथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्र – येथे क्लिक करा

Advertisement

Leave a Comment