Bank of Baroda CSP कसे सुरु करावे | बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र कसे सुरू करावे | income opportunities 2024 –

Bank of Baroda CSP कसे सुरु करावे | बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र कसे सुरू करावे | income opportunities 2024 –

    Bank of Baroda CSP कसे सुरु करावे, याबद्दल अधिक माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ग्रामीण भागामधील ग्राहकांना बँकेमध्ये काही काम असल्यास बँकेची शाखा दूर असते त्यामुळे वेळ सुद्धा जातो तसेच खर्च सुद्धा वाढतो परंतु ग्राहक सेवा केंद्रामुळे बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या बऱ्याच सेवा दिल्या जातात आणि त्यामुळे याचा फायदा ग्राहकांना सुद्धा होतो आणि जे ग्राहक सेवा केंद्र सुरू करतात त्यांना सुद्धा होतो. चला तर जाणून घेऊयात बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्राबद्दल अधिक माहिती…

Advertisement

Bank of Baroda CSP | बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र –

Bank of Baroda CSP

– बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र बँकिंग सुविधा उपलब्ध करून देते आणि यालाच मिनी बँक असे सुद्धा म्हणू शकतो. 

– बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र मार्फत ग्राहकांना बँकेमार्फत दिला जाणाऱ्या सुविधा दिल्या जातात आणि यामुळे ग्राहकांचा बँकेमध्ये जाण्याचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचते.

– ग्राहकांना मेन शाखेमध्ये न जाता त्यांच्याजवळच उपलब्ध असलेल्या ग्राहक सेवा केंद्रामार्फत सुविधा मिळाव्यात यासाठी बऱ्याच बँका मिनी बँक म्हणजेच ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्याची संधी देते, यामुळे बेरोजगारांना कामाची एक चांगली संधी उपलब्ध होते. 

– ज्या क्षेत्रामध्ये ग्राहक सेवा केंद्र नसतील अशा क्षेत्रांमध्ये ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्याची चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदाचे ग्राहक सेवा केंद्र सुद्धा आपण सुरू करू शकतो आणि ग्राहकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देऊन चांगली कमाई करू शकतो, त्यासोबतच विविध सुविधांवर वेगवेगळे कमिशन सुद्धा मिळते.

Bank of Baroda CSP कसे सुरु करावे?

*बँकेशी संपर्क साधा –

– जर आपण बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुक असू तर बँकेमध्ये जाऊन तेथील मॅनेजर शी संपर्क साधावा.

– त्यांच्याकडून बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी लागणारी सर्व माहिती मिळवावी तसेच आपण हे सेवा केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुक आहोत हे देखील सांगावे, जर आपण ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पात्र असू आणि आपल्या परिसरामध्ये ग्राहक सेवा केंद्र नसेल तर त्यांच्यामार्फत पुढील प्रोसेस केली जाईल.

– त्यांच्यामार्फत आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळतो आणि आपण ग्राहक सेवा केंद्र सुरू करू शकतो. 

– ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी जर आपल्याकडे पुरेसे पैसे नसतील तर दीड लाखापर्यंत लोन सुद्धा त्यांच्या मार्फत दिले जाते.

*कंपनीशी संपर्क साधा –

– बऱ्याच अशा कंपन्या उपलब्ध आहेत की ज्या ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यामध्ये आपली मदत करतात परंतु यामध्ये काही फ्रॉड कंपन्या सुद्धा असू शकतात त्यामुळे योग्य कंपन्यांशी संपर्क साधूनच ग्राहक सेवा केंद्र सुरू करावे किंवा या ऐवजी बँकेशी संपर्क साधावा.

सीएससी, वायामटेक, ऑक्सीजन, सहज जन सेवा केंद्र ही काही कंपन्यांची नावे आहेत.

Bank of Baroda CSP सुरू करण्यासाठी आवश्यक पात्रता –

– बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुक असणारी व्यक्ती त्या परिसरामधील रहिवासी असणे आवश्यक आहे.

– इच्छुक व्यक्तीचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक पाहिजे.

– इच्छुक व्यक्ती कमीत कमी इंटरमीडिएट पास असावे.

– कम्प्युटरचे बेसिक नॉलेज त्या व्यक्तीला असणे आवश्यक आहे.

–  Institute Business Correspondent Exam पास असणे आवश्यक आहे.

– इच्छुक व्यक्तीजवळ पोलीस वेरीफिकेशन लेटर असावे. 

– आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.

Bank of Baroda CSP सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

– पासबुक

– आधार कार्ड

– ओळखपत्र

– रहिवासी दाखला

– रेशन कार्ड

– पासपोर्ट साइज फोटो

– आईआईबीएफ सर्टिफिकेट

– ड्राइविंग लाइसेंस

– कंप्यूटर सर्टिफिकेट

– इंटरमीडिएट सर्टिफिकेट/ रिझल्ट

Bank of Baroda CSP सुरू करण्यासाठी आवश्यक सामान –

– इंटरनेट कनेक्शन 

– कंप्यूटर किंवा लॅपटॉप 

– कलर प्रिंटर व स्कॅनर 

– सुरक्षित लॉकर आणि आवश्यक फर्निचर 

–  दुकान ( ज्याचा एग्रीमेंट पेपर असणे आवश्यक आहे )

– बायोमेट्रिक, फिंगरप्रिंट स्कॅनर

बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्याचे फायदे :

– ज्यांचे घर बँकेपासून दूर आहे त्यांना बँकेच्या सुविधा जवळच मिळू लागल्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचते.

– तसेच बँकेमध्ये गेल्यावर मोठमोठ्या लाईन मध्ये उभे राहावे लागते परंतु या ठिकाणी असे नसते. 

– बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र सुरू केल्यामुळे बऱ्याच लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

– कोणतीही पात्र व्यक्ती सहजरीत्या बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र सुरू करू शकते.

बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र या मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा –

– नवीन ग्राहक खाते उघडणे.

– ग्राहकाचा मोबाईल नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक करणे.

– ग्राहकाच्या खात्यातून पैसे काढणे आणि जमा करणे. 

–  एटीएम कार्ड  

– ग्राहकाचे पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणे.

–  विमा सेवा प्रदान करणे.

– ग्राहकाचे RD-FD खाते उघडणे.

– ग्राहकांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे.

– इतर बँकिंग कार्ये 

बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्रमार्फत होणारी कमाई –

सर्विसेस कमिशन
आधार कार्ड मार्फत बँक खाते उघडल्यानंतर 25 रुपये  
आधार कार्ड बँक अकाउंट सोबत लिंक केल्यानंतर 5 रुपये 
कस्टमरच्या अकाउंट वर पैसे जमा केल्यावर किंवा पैसे काढल्यानंतर 0.5% 
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेचे खाते उघडल्यानंतर दरवर्षी प्रती खाते  30 रुपये
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे खाते खोलल्यानंतर दरवर्षी प्रती खात्यावर एक रुपया
जर आपण ग्राहक सेवा केंद्रामार्फत लोन दिले तर अशावेळी बँकेमार्फत पूर्ण लोनच्या 10 टक्के
जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment