How to Become a BC Agent in Airtel Payments Bank | एअरटेल बी सी एजंट कसे बनायचे –
आजच्या ब्लॉगमध्ये बीसीए एजंट ( BC agent) कसे बनायचे आणि त्याचे फायदे काय हे बघणार आहोत.जर तुम्ही एअरटेल Mitra ॲपचे पहिल्यापासूनच जर रिटेलर असाल तर बीसी एजंट बनणे अजून सोपे आहे, यासाठी डिस्ट्रीब्यूटर सोबत किंवा एअरटेल स्टोअर शी संपर्क करून बीसी एजंट बनण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते. तसेच यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा प्रोसेस कम्प्लीट करता येऊ शकते.
How to become Airtel Payments Bank Retailer? एअरटेल पेमेंट बँक बीसीए एजंट कसे बनायचे ?
BC Agent –
– यासाठी फॉर्म भरावा लागेल.
– त्यानंतर त्यांचा रिटेलर आपल्याशी संपर्क साधेल.
– पुढील प्रक्रिया केली जाईल आणि बीसी एजंट म्हणून आपले काम सुरू होईल.
Table of Contents
BC agent पात्रता –
– पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
– वयोमर्यादा 18 ते 70 वर्ष आवश्यक आहे.
– बेसिक फायनान्शिअल नॉलेज असणे आवश्यक आहे.
– आपल्याकडे शॉप सेटअप असणे आवश्यक आहे, साईज कितीही असली तरी हरकत नाही.
– आपल्या एरियामध्ये आपली ओळख असावी आणि विश्वासार्ह असले पाहिजे.
Features | वैशिष्ट्ये –
– अगदी काही मिनिटांमध्येच सेविंग बँक अकाउंट उघडता येईल.
– 24×7 मनी ट्रान्सफर, डिपॉझिट, विड्रॉल
– रिचार्ज आणि युटिलिटी बिल पेमेंट
– AEPS (Aadhaar Enabled Payment System)
– Issue Loans
– इन्शुरन्स पॉलिसीज
– इझी कॅश ड्रॉप पॉईंट
– डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर – गव्हर्मेंट सबसिडी
– मायक्रो एटीएम सर्विसेस
Benefits of Airtel Payments Bank Retailer |BC agent benefits/ फायदे –
– बीसी एजंट बनवून काम करणे सोपे आहे.
– विविध सर्विसेस देऊन चांगले कमिशन मिळवता येते.
– वेळोवेळी कमिशन पे आऊट मिळते.
– 24X7 सेवन सपोर्ट
– विश्वासार्ह आणि मोठे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आहे.
एअरटेल बीसी एजंट बनल्यानंतर आपल्याला लॉगिन आणि पासवर्ड दिला जाईल. यामध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस आपण देऊ शकतो ते बघूया…
*मायक्रो | Micro ATM –
– ही सर्विस देण्यासाठी आपल्याला एअरटेल पेमेंट बँकचे मायक्रो एटीएम मशीन घ्यावे लागेल.
– या मशीनद्वारे ग्राहकांना पैसे विड्रॉल करण्याची सुविधा पुरवली जाऊ शकते.
– एअरटेल पेमेंट बँकचे मायक्रो एटीएम ची किंमत दोन हजार रुपयाच्या आसपास आहे.
*Aadhar enabled payment system –
– ग्राहकाला आधार कार्डद्वारे पैसे काढून देण्याची सुविधा याद्वारे पुरवली जाते.
– यासाठी आपल्याकडे फिंगरप्रिंट डिवाइस असणे आवश्यक आहे.
Aadhar enabled payment system –
– या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर चेक बॉक्स येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
– त्यानंतर बीसीएजंटला किंवा रिटेलरला फिंगरप्रिंट डिवाइस युज करून थंब द्यायचा आहे.
– अशा रीतीने AePS च्या पोर्टलवर लॉगिन होते.
Services –
– कॅश विड्रॉल
– मिनी स्टेटमेंट
– बॅलन्स इन्क्वायरी
– सेंड टू बँक
– ऍक्टिव्हिटी लॉग
AePS कसे work करते ?
– कस्टमर डिटेल्स ज्यामध्ये कस्टमर मोबाईल नंबर, आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आयडी टाकावा लागतो.
– त्यानंतर अमाऊंट आणि बँक अकाउंट सिलेक्ट करून ग्राहकाच्या रिक्वायरमेंटनुसार सर्विसेस देऊ शकतो.
– यानंतर प्रोसीड करून कस्टमरचा फिंगरप्रिंट घ्यावे लागेल.
– त्यानंतर रिटेलर mpin एंटर करायचा आहे.
– त्यानंतर समजा ग्राहकाने कॅश विड्रॉल साठी रिक्वेस्ट केलेली असेल तर कॅश विड्रॉल कम्प्लीट होते आणि त्या प्रकारची रिसीट जनरेट होते.
AePS/Micro ATM
Slab
Commission (Rs)
100-499
0.25
500-999
1.5
1000-1499
2
1500-1999
3
2000-2499
4
2500-2999
6
3000
8
>>3000-10000
6
• रिटेलरला एक रुपया पर कस्टमर पर डे मिळतो.
बऱ्याचदा बीसी एजंट कंपनी कमिशन व्यतिरिक्त समजा एखाद्या व्यक्तीने हजार रुपये काढले तर त्यासाठी दहा रुपये किंवा एखाद्या व्यक्तीने दहा हजार रुपये काढले तर त्यासाठी शंभर रुपये असे एक्स्ट्रा इन्कम सुद्धा कमावतात.
*Mini-Statement काढता येते.
*Send to bank ऑप्शन यूज करून बँकेमध्ये पैसे ट्रान्स्फर करता येतात.
*Open bank account हा ऑप्शन वापरून एअरटेल पेमेंट बँक मध्ये सेविंग अकाउंट ओपन करता येते.
Base Commission
Product – Saving Account
Commission
0-399 FCI plus 100/-AFC: Rs.40/- Slab wise payout applicable on all circles.
>>400 FCI plus 100/-AFC: 75/-
Reward 123: Rs.80/- Reward 123 Mini: Rs.50/-
Additional Payout: Rs 10-If PAN is captured and validated. PAN payout is not applicable on Reward 123/Reward 123 Mini SBA
*Airtel DTH recharge – 3% commision
इतर DTH – 1.25% ( BBPS only )
*Cash deposit –
जर एखाद्या ग्राहकाला कॅश डिपॉझिट करायचे असेल तर तसा ऑप्शन सुद्धा यामध्ये उपलब्ध आहे. एअरटेल पेमेंट बँकचे अकाउंट असेल तर पुढील प्रमाणे कमिशन मिळते.
Money transfer
Minimum base commission
0-25000
0.25%*सिलेक्टेड सर्कल्स
इतर बँक अकाउंट मध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी चार्जेस लागतात.
*अटल पेन्शन योजना –
– या ऑप्शनमुळे ग्राहकाचे अटल पेन्शन योजनेसाठी अकाउंट ओपन करू शकतो.
– यासाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे.
– अटल पेन्शन योजनेसाठी अकाउंट उघडल्यानंतर किती कमिशन मिळते हे मंथली प्रीमियम वर अवलंबून असते.
100 पेक्षा कमी मंथली प्रीमियम असल्यास
20 रुपये
100 ते 200 दरम्यान मंथली प्रीमियम असल्यास
40 रुपये
२०० पेक्षा जास्त मंथली प्रीमियम असल्यास
50 रुपये
कॉटरली प्रीमियम पॉलिसी
60 रुपये
हाफ इयरली प्रीमियम पॉलिसी
60 रुपये
*Refer for Gold loan –
Gold loan –
IIFL 0.7% of disbursed amount
Muthoot 0.7% of disbursed amount
Axix Bank 0.7% of disbursed amount
*Recharge option –
या ऑप्शन च उपयोग करून रिचार्ज सुद्धा करू शकतो आणि त्यावर काही परसेंट कमिशन बीसी एजंटला मिळते.
ऑपरेटरचे नाव
कमिशन %
बीएसएनएल
3%
एमटीएनएल मुंबई
2%
एमटीएनएल दिल्ली
2%
जिओ
2%
व्ही आय
2%
एअरटेल रिचार्ज साठी ( सर्कलनुसार )
डीएल सर्कल सोडून इतर सर्व सर्कल साठी 3 टक्के
आणि डीएल सर्कल साठी 2.50%
अशाप्रकारे विविध ऑप्शन्स एअरटेल पेमेंट बँकेमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक सर्विसेस वर बीसी एजंटला (BC Agent ) काही टक्के कमिशन मिळते.
एअरटेल पेमेंट्स बँकेत बीसी एजंट बनल्याने तुम्हाला ग्राहकांना आवश्यक बँकिंग सर्विसेस उपलब्ध करून देता येतात आणि विविध व्यवहारांवर कमिशन मिळू शकते. रोख पैसे काढणे असो, बँक खात्यात पैसे पाठवणे असो किंवा इतर बँकिंग सेवा ऑफर करणे असो, BC एजंट असल्याने अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची आकर्षक संधी मिळते.