Best career options after 10th 12 th | दहावी आणि बारावीनंतर करिअर करण्यासाठी काही उत्तम ऑप्शन्स | Best career options 2025
दहावी आणि बारावी झाली की दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे तसेच त्यांच्या पालकांपुढे सुद्धा हा प्रश्न असतो की नेमकी करिअर कोणत्या क्षेत्रात निवडावे. काही विद्यार्थी आणि पालकांचे हे आधीपासूनच ठरलेले असते परंतु ज्यांनी हा निर्णय अद्याप पर्यंत घेतलेला नाही त्यांना हा ब्लॉग उपयुक्त ठरू शकतो. या ब्लॉगमध्ये आपण दहावी आणि बारावी नंतर करिअर करण्यासाठी काही उत्तम असे ऑप्शन्स बघणार आहोत.या ब्लॉग मध्ये विविध क्षेत्रांची माहिती, त्यातील स्कोप/संधी व सरासरी पगार (salary) दिलेले आहेत.
Best career options after 10th 12 th | दहावी आणि बारावीनंतर करिअर करण्यासाठी काही उत्तम ऑप्शन्स | Best career options 2025
Table of Contents
१०वी नंतरचे करिअर पर्याय
१०वी नंतर अनेक विद्यार्थ्यांना पुढील वाटचाल कुठे करायची याबद्दल संभ्रम असतो. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स की व्यावसायिक कोर्स? योग्य निर्णय घेतल्यास यशस्वी करिअरची सुरुवात इथूनच होते. पुढे काही पर्याय आहेत.
१. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग (Polytechnic Diploma)
कोर्स कालावधी: ३ वर्षे
शाखा: सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन आणि इतर
संधी: खासगी/सरकारी कंपन्या, पुढे BE द्वारे उच्च शिक्षण
सरासरी पगार: रु. १२,००० – रु. २५,००० प्रतिमाह (फ्रेशर)
२. ITI (Industrial Training Institute)
कोर्स कालावधी: २ वर्षे
शाखा: फिटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, COPA, ड्राफ्ट्समन
संधी: सरकारी/खाजगी क्षेत्रात नोकऱ्या, सेल्फ-एम्प्लॉयमेंट
सरासरी पगार: रु. ८,००० – रु. २०,००० प्रतिमाह
३. ११वी-१२वी (सायन्स / कॉमर्स / आर्ट्स)
सायन्स: इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी
कॉमर्स:CA, CS, बँकिंगआर्ट्स: UPSC/MPSC, मीडिया, सोशल वर्क
संधी:पुढे पदवीचे शिक्षण, विविध प्रोफेशनल कोर्सेस
पगार: शिक्षणानुसार वेगवेगळा
४. डिप्लोमा इन फार्मसी (D.Pharm)
कोर्स कालावधी: २ वर्षे
संधी: मेडिकल स्टोअर, हॉस्पिटल, फार्मा कंपनी
सरासरी पगार: रु. १०,००० – रु. ३०,००० प्रतिमाह
५. अॅनिमेशन आणि ग्राफिक डिझायनिंग
कोर्स कालावधी:६ महिने – २ वर्षे (डिप्लोमा/सर्टिफिकेट)
संधी:मिडिया, फिल्म इंडस्ट्री, फ्रीलान्सिंग
सरासरी पगार: रु. १५,००० – रु. ७०,००० प्रतिमाह
६. फॅशन डिझायनिंग / इंटेरिअर डिझायनिंग
शिक्षण: डिप्लोमा किंवा डिग्री कोर्सेस
संधी: स्वत:चा व्यवसाय, डिझाइन स्टुडिओ, MNCs
सरासरी पगार: रु. २०,००० – रु. ८०,००० प्रतिमाह
७. हॉटेल मॅनेजमेंट
कोर्स कालावधी: १-३ वर्षे (डिप्लोमा / डिग्री)
संधी: हॉटेल्स, क्रूझ, रेस्टॉरंट्स, केटरिंग
सरासरी पगार: रु. १५,००० – रु. ५०,००० प्रतिमाह
८. डिफेन्स सेवा – NDA (National Defence Academy)
NDA परीक्षा
संधी: आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
सरासरी पगार: रु. ५०,००० – रु. १,५०,००० प्रतिमाह + भत्ते
९. डिजिटल मार्केटिंग
कोर्स कालावधी: ३ – ६ महिने
संधी: सोशल मीडिया, कंटेंट मॅनेजमेंट, SEO
सरासरी पगार: रु. १५,००० – रु. ७०,००० प्रतिमाह
१०. व्यवसाय (Entrepreneurship)
शिक्षण: कौशल्य आवश्यक
संधी: स्वतःचा उद्योग सुरू करण्याची संधी
कमाई: मर्यादा नाही – मेहनतीनुसार कमाई
बारावी नंतर काही करिअर पर्याय
१. इंजिनिअरिंग (Engineering)
शाखा: कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, IT
शिक्षण: १२वी (PCM) नंतर इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा (JEE, CET)
संधी: खासगी कंपन्या, सरकारी नोकऱ्या, स्टार्टअप्स
सरासरी पगार: रु. २५,००० – रु. १,००,००० प्रतिमाह (अनुभवानुसार वाढ)
२. वैद्यकीय क्षेत्र (Medical Field)
शाखा: डॉक्टर (MBBS), नर्सिंग, फार्मसी, BAMS, BHMS
शिक्षण: १२वी (PCB) नंतर NEET परीक्षा
संधी: हॉस्पिटल्स, क्लिनिक, संशोधन संस्था
सरासरी पगार: रु. ३०,००० – रु. १,५०,००० प्रतिमाह (विशेषज्ञ डॉक्टर यापेक्षा अधिक कमावू शकतात)
३. कॉम्प्युटर सायन्स/आयटी (IT/Computer Science)
शिक्षण: B.Sc. IT, BCA, MCA, B.Tech (CS/IT)
संधी:सॉफ्टवेअर कंपन्या, MNCs, फ्रीलान्सिंग
सरासरी पगार: रु. ३०,००० – रु. २,००,००० प्रतिमाह
४. चार्टर्ड अकाउंटंट (CA)
शिक्षण: बारावीनंतर CPT/CA Foundation परीक्षा
संधी: खाजगी कंपन्या, स्वतःचा व्यवसाय
सरासरी पगार: रु. ४०,००० – रु. २,५०,००० प्रतिमाह
५. आर्मी / नेव्ही / एअरफोर्स (Defence Services)
शिक्षण: NDA, CDS परीक्षा (१२वी PCM नंतर)
संधी: सैन्य दल, नौदल, हवाई दल
सरासरी पगार: रु. ५०,००० – रु. १,५०,००० प्रतिमाह + निवास, भत्ता
६. डिझायनिंग आणि अॅनिमेशन (Designing & Animation)
शाखा: ग्राफिक डिझाईन, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX)
शिक्षण: डिप्लोमा/डिग्री कोर्सेस
संधी: मिडिया, फिल्म इंडस्ट्री, अॅड एजन्सीज
सरासरी पगार: रु. २०,००० – रु. १,००,००० प्रतिमाह
७. शिक्षक / प्राध्यापक (Teaching)
शिक्षण: D.Ed, B.Ed, B.Sc./B.A. + B.Ed
संधी: शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस
सरासरी पगार: रु. २५,००० – रु. ७०,००० प्रतिमाह
८. पोलिस, एमपीएससी, यूपीएससी
शिक्षण: कोणत्याही शाखेतील पदवी
संधी: सरकारी सेवा (IAS, IPS, PSI, STI, etc.)
सरासरी पगार: रु. ५५,००० – रु. २,००,००० प्रतिमाह + भत्ते ( पदांनुसार वेगवेगळा )
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
९. फायनान्स व बँकिंग क्षेत्र
शिक्षण: B.Com, M.Com, MBA Finance
संधी: बँक परीक्षा (IBPS, SBI), फायनान्शियल सल्लागार
सरासरी पगार: रु. ३०,००० – रु. १,५०,००० प्रतिमाह
१०. उद्योजकता / स्टार्टअप (Entrepreneurship)
शिक्षण: कोणतेही, पण कौशल्य हवे
संधी: स्वतःचा व्यवसाय सुरू करणे
कमाई: मर्यादा नाही – तुमच्या मेहनतीवर अवलंबून
तुमच्या क्षमतेनुसार, आवडीनुसार आणि भविष्यातील ध्येय लक्षात घेऊन करिअर निवडा.
*या ठिकाणी दिलेला पगार हा अंदाजे दिलेला आहे यामध्ये कमी जास्त प्रमाण असू शकते तसेच वेगवेगळ्या व्यक्तींच्या अनुभवानुसार तसेच शिक्षणाानुसार आणि कौशल्यानुसार पगार बदलू शकतो.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |