Best Investment Plans for Your Child | तुमच्या मुलांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना | Best investment plans –
जर तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा बाळ जन्माला येणार असेल तर ही एक आनंदाची गोष्ट असते आणि या आनंदाच्या सोबतच येते ती म्हणजे जबाबदारी. आपल्या मुलांचे आयुष्य सुखकर आणि सुरक्षित व्हावे असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते आणि त्यासाठीच महत्त्वाची असते ती गुंतवणूक (Best Investment Plans for Your Child). आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा काही ( Best Investment Plans for Your Child ) योजना किंवा गुंतवणूक पर्याय जाणून घेणार आहोत…
Best Investment Plans for Your Child | तुमच्या मुलांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना | Best investment plans –
Table of Contents
Best Investment Plans for Your Child
1. Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना –
– सुकन्या समृद्धी योजना ही खास मुलींसाठी तयार केली गेलेली योजना आहे.
– सुकन्या समृद्धी योजनेचे चांगले फायदे आणि वैशिष्ट्ये आहेत.
– सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता :
फक्त मुली या योजनेसाठी पात्र असतील.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी दहा वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुली पात्र असतील त्यामुळे मुलीचे आई-वडील मुलीचा जन्म झाल्यानंतर लगेच सुद्धा ही योजना सुरू करून घेऊ शकता.
– गुंतवणुकीचा कालावधी:*
मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत खाते सक्रिय राहू शकते आणि तुम्ही जास्तीत जास्त १५ वर्षांसाठी गुंतवणूक केली पाहिजे.
– कर लाभ: कॉन्ट्रीब्युशन्स कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र ठरते, तर मिळवलेले व्याज कलम 10 अंतर्गत करमुक्त आहे.
– विड्रॉल अटी : मुलगी २१ वर्षांची झाल्यावर किंवा १० वी पूर्ण केल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी पैसे काढता येतात.
– चालू व्याज दर: व्याज दर सध्या 8.2% आहे.
या योजनेमध्ये नियमितपणे गुंतवणूक करून, तुम्ही तुमच्या मुलीसाठी 21 वर्षांची होईपर्यंत संभाव्यतः ₹80 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता काय, अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागतात ही सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.
2. Public Provident Fund (PPF)| पब्लिक प्रॉव्हिडंट फंड –
– पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या गुंतवणुकीच्या पर्यायाकडे आपण पारंपारिक आणि विश्वसनीय असा गुंतवणूक पर्याय म्हणून बघतो.
– व्याज दर : सध्या, PPF 7.1% व्याज दर देते. हे दरवर्षी चक्रवाढ होते, जे कालांतराने तुमची बचत वाढवू शकते.
– कर लाभ : PPF मध्ये कॉन्ट्रीब्युशन कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत.मिळालेले व्याज तसेच मॅच्युरिटी रक्कम करमुक्त आहेत.
– कर्ज सुविधा: पाच वर्षांनंतर, तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यावर कर्ज घेऊ शकता, आवश्यकतेनुसार लिक्विडिटी देऊ शकता.
– PPF हा एक उत्कृष्ट दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे जो तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
3. Step-Up SIP | स्टेप अप एसआयपी –
– पुढील गुंतवणूक पर्याय आहे ,स्टेप ऑफ एसआयपी म्हणजेच स्टेप अप सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.
– यामध्ये हळूहळू तुम्ही तुमची गुंतवणूक वाढवू शकता आणि जसजसे तुमचे उत्पन्न वाढेल तसतसे तुम्ही यामधील गुंतवणूक वाढवू शकता त्यामुळे हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.
– नियमित गुंतवणूक : एका ठराविक रकमेपासून सुरुवात करा, उदा. ₹10,000, आणि ती दरवर्षी ठराविक टक्केवारीने वाढवू शकता. एस आय पी कमी गुंतवणुकीपासून सुद्धा सुरू केली जाऊ शकते.
– दीर्घकालीन वाढ: स्टेप-अप एसआयपीद्वारे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास १५ ते २० वर्षांमध्ये अधिक चांगला परतावा मिळू शकतो.
– प्रोजेक्टेड रिटर्न: समजा ,12% चा वार्षिक परतावा गृहीत धरला तर, तुमची गुंतवणूक काही वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या वाढू शकते, 40 वर्षांमध्ये संभाव्यतः ₹11 कोटीपर्यंत पोहोचू शकते.
– एस आय पी या गुंतवणुकीच्या पर्यायामुळे मुलांच्या भविष्यासाठी मदत होईलच त्यासोबतच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये सुद्धा याचा हातभार लागू शकतो.
4. Sovereign Gold Bonds | सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स –
– सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे परंतु आपण दुकानांमध्ये जाऊन जे फिजिकल सोनं खरेदी करतो त्याची शुद्धता तसेच मेकिंग चार्जेस अशा काही गोष्टी त्या ठिकाणी येतात परंतु त्या ऐवजी जर सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स खरेदी केले तर त्यासाठी काही मेकिंग चार्जेस नसतात तसेच सोन्याच्या शुद्धतेबद्दल काळजी करण्याची गरज नसते आणि त्याची सुरक्षा कशी करावी याबद्दल सुद्धा काळजी करण्याची गरज नसते.
– व्याज : गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेवर 2.5% वार्षिक व्याज मिळते, जे अर्धवार्षिक जमा केले जाते.
– बाजार किमतीत सवलत: बॉण्ड्स बाजारभावापेक्षा सवलतीत खरेदी केले जाऊ शकतात, ज्यामुळे ते किफायतशीर पर्याय बनतात.
– SGB मध्ये गुंतवणूक हा गुंतवणूक पर्याय सुद्धा तुमच्या मुलाच्या भवितव्याला सुरक्षित ठेवण्यासाठी एक स्मार्ट पर्याय ठरू शकतो.
– इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा असा पर्याय आहे, जो कर बचतीसह इक्विटी गुंतवणुकीचे फायदे एकत्र देतो.
– लॉक-इन कालावधी: ELSS मध्ये तीन वर्षांचा अनिवार्य लॉक-इन कालावधी आहे, ज्यामुळे यामध्ये केलेली गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक आहे.
– कर फायदे: कलम 80C अंतर्गत गुंतवणूक कर कपातीसाठी पात्र ठरते, ज्यामुळे कर वाचवता येतात.
– उच्च परताव्याची संभाव्यता : ELSS प्रामुख्याने इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असल्याने, दीर्घ मुदतीसाठी उच्च परतावा देण्याची क्षमता आहे.
प्रत्येक गुंतवणूक पर्यायाचे स्वतःचे वैशिष्टे आहेत आणि ते तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. निर्णय घेण्यापूर्वी तुमची आर्थिक उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता आणि इतर आवश्यक गोष्टींचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हुशारीने ( Best Investment Plans for Your Child ) निवड करू शकता.