Billboard business | बिल बोर्ड बिझनेस | Innovative and latest business ideas 2024 –

Billboard business | बिल बोर्ड बिझनेस | Innovative and latest business ideas 2024 –

    बिलबोर्ड हे छोट्या, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांसाठी जाहिरात करण्याचा सर्वात पसंतीचा असा मार्ग आहे. वर्तमानपत्रे तसेच मासिकांच्या तुलनेत, बिलबोर्ड अधिक प्रभावी आहेत आणि हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींपेक्षा स्वस्त आहेत. बिलबोर्डचा वापर प्रॉडक्ट किंवा सर्विसेस बद्दल माहिती देण्यासाठी केला जातो.

     बिलबोर्ड ॲडव्हर्टायझिंग आउट डोअर ॲडव्हर्टायझिंग विभागांतर्गत येतात. बिलबोर्ड जाहिरात कंपनी सुरू करण्यासाठी मार्केट रिसर्च आणि धोरणात्मक नियोजन आवश्यक आहे.

Advertisement

      बिलबोर्ड जाहिरात कंपन्या प्रिंटेड, पेंट केलेले डिस्प्ले किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले पब्लिक डिस्प्लेसाठी ॲडव्हर्टायझिंग मटेरियल तयार करतात आणि डिझाइन करतात. चला तर जाणून घेऊयात बिलबोर्ड व्यवसाय ( Billboard Business) बद्दल अधिक माहिती…

Billboard business

1 . बिलबोर्ड व्यवसाय शिकून घ्या | Learn the billboard business –

– बिलबोर्ड बिजनेस लॉन्च करण्याआधी आपल्याकडे काही कौशल्य असणे नक्कीच गरजेचे आहे त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स, काही ग्राफिक्स डिझाईनिंग स्किल्स त्याचबरोबर बिल बोर्ड बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

– बिल बोर्डचे पुढील प्रकार आहेत :

१. क्लासिक बिल बोर्ड – 

महामार्ग, एक्सप्रेसवे किंवा जड रहदारीच्या रस्त्यावर असे बिलबोर्ड बघायला मिळतात,हे खूप मोठ्या आकारात येतात. सर्वात लोकप्रिय 14′ x 48′ रुंद, 10.5′ x 36′ रुंद किंवा इतरही आकार आहेत. क्लासिक बिलबोर्ड पायी चालणारे आणि वेहीकल चालवणारे दोन्ही ट्रॅफिक अट्ट्रॅक्ट करतात.

२. विनाइल बिलबोर्ड –

विनाइल बिलबोर्ड चमकदार असतात. तसेच, हे बोर्ड परफेक्ट रंग आणि लूकसह येतात.

३ . पोस्टर्स – 

पोस्टर्स बुलेटिन बोर्ड पेक्षा साईजने लहान असतात. हे स्थानिक जाहिरातदार स्थानिक बाजारपेठेला अशा प्रकारच्या जाहिराती वापरतात.

४ . पेंटेड बिल बोर्ड –

 आजकाल पेंट केलेले होर्डिंग फारच दुर्मिळ झाले आहेत. आवश्यकता असल्यास, काही जाहिरातदार अजूनही या प्रकारचे बिलबोर्ड वापरतात.

५ . मोबाइल बिलबोर्ड – 

मोबाईल होर्डिंग ही नवीन संकल्पना आहे. एका मोबाइल बिलबोर्डसह, बुलेटिन वेगवेगळ्या ठिकाणी हलवू शकता जिथे टारगेट ऑडियन्स असतील.

६. इलेक्ट्रॉनिक्स बिल बोर्ड –

सध्या जास्त ट्रेडिंग असणारे हे बिलबोर्ड आहेत, यामधील थ्रीडी बिलबोर्ड तर खूपच आकर्षक वाटतात परंतु त्याच्या किमती सुद्धा तितक्याच हाय आहेत.

2 . मार्केट रिसर्च | Billboard business Market research –

– हा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवस्थित मार्केट रिसर्च करणे गरजेचे आहे, त्यासाठी या व्यवसायामध्ये पहिल्यापासूनच असलेल्या कंपन्यांची डिझाईन तसेच त्यांची प्राईसिंग याबद्दल माहिती जाणून घ्या.

– तसेच छोट्या आणि मध्यम कंपन्यांबद्दल माहिती मिळवण्यासाठी लोकल बिजनेस असोसिएशनशी सुद्धा संपर्क करू शकता.

– आपण ज्या भागात राहतो त्या ठिकाणी या व्यवसायासाठी मार्केट आहे की नाही ही सुद्धा माहिती मिळवा.

3 . या व्यवसायासाठी ब्रॅण्ड नेम निवडा | Select proper brand name for Billboard business –

कुठल्याही व्यवसायासाठी त्या व्यवसायाला समर्पक आणि catchy असे नाव निवडणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या व्यवसायाच्या नावावरूनच त्या व्यवसाय याबद्दल माहिती मिळू शकेल आणि अधिक कस्टमर आकर्षित होतील.

4 . व्यवसाय योजना तयार करा | Business plan for billboard business –

– बिलबोर्ड बिजनेस साठी व्यवसाय योजना तयार करा त्यामध्ये या व्यवसायामध्ये तुम्ही किती गुंतवणूक करणार आहात, मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे, बिलबोर्ड साठी प्राइसिंग काय ठेवणार आहात, मॅनपावर किती लागेल अशा सर्व गोष्टींचा विचार करून व्यवसाय योजना तयार करा.

5 . आवश्यक परवाने आणि रजिस्ट्रेशन | Registration and Licence required for billboard business –

कुठल्याही व्यवसायासाठी तो व्यवसाय रजिस्टर करणे गरजेचे असते त्याचबरोबर त्या व्यवसायासाठी जे परवाने आवश्यक असतात ते काढणे सुद्धा खूप महत्त्वाचे असते.

– कंपनी रजिस्ट्रेशन

– जीएसटी रजिस्ट्रेशन

– इतर आवश्यक परवाने

6 . दर ठरवा | Set the pricing of billboards –

– बिल बोर्डचा दर हा बिलबोर्डची साईज, बिल बोर्डचे लोकेशन, कोणत्या प्रकारचा बिलबोर्ड आहे अशा विविध गोष्टींवर ठरतो, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही दर ठरवू शकता.

7 . बिलबोर्ड व्यवसायाचा प्रचार आणि मार्केटिंग – 

– व्यवसायासाठी ऑनलाईन प्रेझेन्स असणे गरजेचे आहे, यामध्ये व्यवसायाची वेबसाईट तयार करणे तसेच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणे सुद्धा गरजेचे आहे. थोडक्यात सोशल मीडिया मार्केटिंग ही पद्धत गरजेची आहे यामुळे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त टार्गेट ऑडियन्स पर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्यापैकी जास्तीत जास्त ऑडियन्स कस्टमर बनण्याचे चान्सेस सुद्धा असतात.

– बिलबोर्ड व्यवसायाबद्दल मार्केटिंग करत असताना बिल बोर्डचे समोरच्याच्या व्यवसायाला काय काय फायदे होतील हे पटवून देणे गरजेचे आहे.

    अशा रीतीने बिलबोर्ड व्यवसाय ( Billboard Business) हा एक हटके व्यवसाय आहे, जो व्यवस्थित मार्केट रिसर्च करून या व्यवसायाबद्दल सर्व गोष्टी शिकून घेऊन सुरू केला तर नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

5 work from home business ideas
⭕5 वर्क फ्रॉम होम बिझनेस आयडियाज…
ट्रॅडिशनल+लेटेस्ट…
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://iconikmarathi.com/work-from-home-business-ideas/

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment