10 असे व्यवसाय जे तुम्ही 0 रुपयात सुरु करु शकता | Zero Investment Business Ideas In Marathi (2023)

अनेक लोक म्हणतात कि आम्हाला स्वतःचा Business चालू करायचा आहे पण आमच्याकडे भांडवल नाही, आमच्याकडे पैसे नाही. तुमच्या याच अडचणीतून तुम्हाला सोडवण्यासाठी मी तुम्हाला १० बिन भांडवली व्यवसाय सांगणार आहे.

1 YouTube Channel ( यूट्यूब चॅनल )

Zero Investment मध्ये सुरू होणारा सर्वात सोपा व्यवसाय म्हणजे YouTube Channel. YouTube Channel सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची मोठी Investment करण्याची गरज नाही.

Advertisement

तुमच्याकडे जर फक्त एक स्मार्ट फोन आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही घर बसल्या स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करू शकता आणि दर महिन्याला लाखो रुपये कमवू शकतो.

तुम्ही जवळपास कोणत्याही Topic वर YouTube Channel बनवू शकता फक्त त्या टॉपिक मध्ये इतरांनाही देखील इंटरेस्ट असला पाहिजे उदाहरण द्यायचं झालं तर – Comedy, Music, dance, entertainment, Online coaching, Yoga, Vlogging , health , fitness , Educational अनेक topic आहे.

YouTube वरून तुम्ही YouTube Monetization, Advertising, Affiliate marketing अशा अनेक मार्गांनी पैसे कमाऊ शकता.

2  Blogging ( ब्लॉगिंग )

तुमच्याकडे जर एक स्मार्ट फोन आणि इंटरनेट कनेक्शन असेल तुम्ही घर बसल्या स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता आणि लाखो, करोडो रुपये कमवू शकता.

ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची इन्वेस्टमेंट करण्याची गरज नाही.

भारतामध्ये अनेक ब्लोगर्स ब्लॉग च्या माध्यमातून दर महिन्याला 50 लाख ते 1 करोड पेक्षा हि जास्त पैसे कमवत आहे.

3. Electronic Appliances Repairing ( इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त करणे )

आजकाल प्रत्येक घरांमध्ये अनेक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतात टीव्ही, फ्रीज, कूलर, फॅन, वॉशिंग मशीन आणि तुम्ही कितीही चांगल्या क्वालिटीचं इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस घेतला तरी देखील कधी ना कधी ते खराब होतच आणि खराब झाल्यावर त्याला दुरुस्त करावा लागत.

या व्यवसायाची कायम डिमांड राहणार आहे. तुम्ही जर योग्य किमतीत चांगलं काम करून दिलं तुमच्याकडे भरपूर कस्टमर येतील.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त रिपेरिंग चा एखादा कोर्स करावा लागेल. 

4. Breakfast Corner ( ब्रेकफास्ट कॉर्नर )

चांगल्या आरोग्यासाठी सकाळी नाश्ता करणे अत्यंत गरजेचे असते परंतु कामाच्या घाईगडबडीत नाश्ता करायचं राहून जातं.

त्याच बरोबर सकाळी सकाळी रोजच कोणता नाश्ता बनवावा असा देखील घरातल्या महिलांना प्रश्न असतो आणि म्हणूनच इथे तुमच्यासाठी चांगली संधी निर्माण होते.

तुम्ही अत्यंत कमी भांडवलात तुमचं ब्रेकफास्ट कॉर्नर सुरू करू शकता.

व्यवसायात नाविन्य निर्माण करण्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त Healthy नाष्टा तुमच्या नाश्ता सेंटर मध्ये ठेवू शकता.

त्याच बरोबर आपले महाराष्ट्रीयन पदार्थ देखील तुम्ही नाश्त्यासाठी ठेवू शकता.

5 .  Artificial / Fashion Jewellery (कृत्रिम / फॅशन ज्वेलरी)

महिलांना दागिने वापरायला खूप आवडतात परंतु आजकाल सोन्या-चांदीचे दागिने घेणे परवडत नाही त्याचबरोबर अशी दागिने घालून फिरणं हे धोक्याचं असतं आणि म्हणूनच इथे तुमच्यासाठी संधी निर्माण होते.

तुम्ही आर्टिफिशल ज्वेलरी विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हवं तर तुम्ही घर बसल्या देखील हा व्यवसाय सुरू करू शकता किंवा वेगवेगळ्या कॉलनीमध्ये फिरून देखील तुम्ही ही आर्टिफिशियल ज्वेलरी विकू शकता.

या व्यवसायामध्ये अत्यंत चांगलं प्रॉफिट मार्जिन असतं तुम्ही ऑनलाईन देखील ही आर्टिफिशियल ज्वेलरी विकू शकता.

६ . Old Bike and Car Selling Business ( जुन्या टू – व्हिलर आणि कार चा व्यवसाय)

प्रत्येकाला वाटत असतं की त्याच्याकडे स्वतःची गाडी असावी परंतु आजकाल गाड्यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहे.

बाइक घेणे किंवा कार घेणे हे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही आणि म्हणूनच असे लोक सेकंड हँड किंवा जुन्या गाड्या घेणं पसंद करतात.

परंतु चांगली गाडी कुठे मिळल हे त्यांना माहीत नसतं त्याचबरोबर एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून बाईक किंवा कार विकत घेताना लोक थोडेसे घाबरतात.

तुम्ही जुन्या बाईक तसेच कार विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी Investment करण्याची गरज नाही. तुम्ही भांडवल नसेल तरीही हा Business करू शकता.

यासाठी तुम्हाला फक्त ज्या लोकांना गाड्या विकायच्या आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची list बनवायची आहे आणि जर कोणाला गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही या लोकांशी संपर्क साधून व्यवहार पूर्ण करू शकता आणि तुम्ही मध्ये भरपूर कमिशन कमावू शकता.

७ . Job Recruitment Service ( नोकरी भरती सेवा )

आजकाल शिकून देखील तरुणांना नोकरी मिळत नाही. तुम्ही शून्य भांडवलात जॉब रिक्रुटमेंट सर्व्हिस सुरू करू शकता आणि लोकांना जॉब मिळण्यासाठी मदत करू शकता.

यासाठी तुम्हाला कंपन्यातील HR Department मध्ये ओळख वाढवावी लागेल तसेच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन तुम्हाला कंपनीच्या मालकांशी तसंच मॅनेजर सोबत ओळख करावी लागेल आणि त्यांना तुमच्या बिजनेस बद्दल सांगावे लागेल.

यातून तुम्ही अतिशय चांगले पैसे कमावू शकता.

८ . Tiffin Service ( टिफिन सेवा )

खानावळ प्रमाणे तुम्ही टिफिन सर्विस देखील सुरू करू शकता. तुम्ही खानावळ आणि टिफिन सर्विस दोन्हीही व्यवसाय एकत्रितपणे करू शकता. 

जेवण बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्या घरात असतात त्यामुळे तुम्ही शून्य भांडवलात देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.

कस्टमर आणि पैसे यायला लागल्यावर तुम्ही ऑनलाईन जाहिरात करुन तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

९ . Yoga Classes ( योगा क्लासेस )

आज काल लोक त्यांच्या हेल्थ आणि फिटनेस बाबद जागृत होत आहे आणि म्हणूनच योगा क्लासेस ची डिमांड देखील खुप वाढत आहे.

तुम्ही योगा चा एखादा छोटासा कोर्स करून स्वतःचे योगा क्लासेस सुरू करू शकता.

योगा क्लासेस सुरू करण्यासाठी तुमच्याकडे हे स्किल असणे गरजेचे आहे. हा एक अत्यंत साधा आणि सोपा बिनभांडवली व्यवसाय आहे.

१० . CSC ( Common Service Center ) ( कॉमन सर्विस सेंटर )

कॉमन सर्विस सेंटर हा एक अतिशय चांगला बिन भांडवली व्यवसाय आहे.

तुम्ही एखादा गाळा भाड्याने घेऊ शकता आणि तिथे वेगवेगळ्या सर्विस देऊ शकता जसे की insurance service, passport service, PAN card service, pension service, income certificate, caste certificate, सरकारी योजनांशी संबंधित सर्विसेस.

यासाठी तुम्ही एक सेकंड हँड कॉम्पुटर घेऊ शकता. CSC Centre सुरू करण्याआधी तुम्ही एखाद्या तुमच्या आसपासच्या CSC Centre वर दोन-तीन महिने काम करू शकता आणि याठिकाणी कशा पद्धतीने काम केलं जातं याचा अनुभव घेऊ शकता.

Advertisement

Leave a Comment