Business ideas | रिसेशन प्रूफ व्यवसाय | मंदी न येऊ शकणाऱ्या व्यवसाय आयडियाज –
आपल्याकडे व्यवसाय आयडिया भरपूर असतात परंतु बरेचसे असे व्यवसाय असतात की जे काही कारणास्तव चालत नाहीत किंवा त्या व्यवसायांना मंदी येऊ शकते. याचे उदाहरण म्हणजे कोरोना काळामध्ये आपण बघितलेच की बरेचसे व्यवसाय ठप्प झाले होते .परंतु काही व्यवसाय मात्र असे होते की जे सुरू होते म्हणजेच असे काही व्यवसाय आहेत की जे नेहमीच सुरू राहू शकतात. कोरोना काळ हा जरा कठीणच काळ होता परंतु इतर वेळी सुद्धा काही व्यवसाय व्यवस्थित रित्या चालत नाहीत परंतु असे काही व्यवसाय असतात की ज्यांची गरज मानवाला असतेच. चला तर जाणून घेऊया अशाच काही बिझनेस आयडियाज…
१ . हेल्थकेअर सर्व्हिसेस / मेडिकल –
प्रत्येकालाच आपले आरोग्य प्रिय असते परंतु आरोग्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बिघाड हा होतच असतो त्यामुळेच आपण डॉक्टरकडे जातो. म्हणूनच येथे हे लक्षात घ्यायचे आहे की हेल्थकेअर सर्विसेस कधीही बंद होऊ शकत नाही त्यामुळे अशा सर्विसेसशी निगडित काही व्यवसाय सुरू केल्यास फायदेशीर ठरू शकतो.
२ . ऑनलाइन रिटेल –
अगदी कोरोना काळामध्ये सुद्धा दुकाने बंद होती परंतु कालांतराने दुकाने सुरू झाल्यानंतर सुद्धा लोक दुकानांमधून खरेदी करण्यास घाबरत होते आणि ऑनलाईन शॉपिंग पद्धतीला प्राधान्य देत होते. आजही बरेच लोक ज्यांच्याकडे वेळेची कमतरता आहे असे लोक त्याचबरोबर ज्यांना ऑनलाइन शॉपिंग करायला आवडते असे लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. म्हणूनच आपण सुद्धा ऑनलाईन शॉपिंग स्टोअर सुरू केले तर फायद्यात ठरू शकते. यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत उदाहरणार्थ, Affiliate मार्केटिंग, मिशो, इंस्टाग्राम शॉपिंग पेज.
( आपल्या आयकॉनिक मराठी यूट्यूब चॅनल वर विविध व्हिडिओज उपलब्ध आहेत )
३ . युटिलिटी सर्विसेस –
पाणी, वीज, गॅस या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहेत. अशा गोष्टींची निगडित व्यवसाय सुरू केले तर ते सुद्धा व्यवस्थितरित्या चालू शकतात उदाहरणार्थ,
घरपोच पाणीपुरवठा सेवा – सर्वच लोकांना फिल्टर घेणे शक्य नसते त्यामुळे बरेच लोक पाण्याचे जार विकत घेणे पसंत करतात.
फिल्टर शॉप – वेगवेगळ्या कंपन्यांचे फिल्टरचे रिटेल स्टोअर
गॅस पुरवठा – गॅस एजन्सी सोबत संपर्क साधून या संबंधित व्यवसाय सुरू करू शकता.
वीज – इलेक्ट्रिसिटी – रिपेरिंग सर्विसेस , लाईट फिटिंग इत्यादी.
४ . ऑनलाइन शिक्षण /क्लासेस/कोर्सेस –
आपण कोरोना काळामध्येच बघितले की शाळा जरी बंद होत्या परंतु ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू होते. शिक्षण ही काळाची गरज आहे, त्याचबरोबर वेगवेगळे कौशल्य शिकायला सुद्धा बऱ्याच जणांना आवडते.परंतु वेळेची कमतरता असल्याने तसेच जाण्या येण्याचा खर्च वाढतो त्यामुळे बरेच जण ऑनलाईन पद्धतीने कोर्सेस शिकण्यास पसंती दर्शवतात म्हणूनच तुमच्याकडे जे काही कौशल्य आहे त्याबद्दल ऑनलाईन क्लासेस तुम्ही घेऊ शकता.
५ . अन्नपदार्थ संबंधीत व्यवसाय –
भाजीपाला व्यवसाय, किराणा व्यवसाय, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांसारखे अन्नपदार्थांशी निगडित व्यवसाय सुद्धा कधीही बंद होऊ शकत नाही फक्त आपल्या उत्पादनाचा दर्जा उत्तम असणे गरजेचे आहे आणि उत्पादनाचे दर सुद्धा योग्य असले पाहिजे. यासाठी योग्यरीत्या मार्केटिंग करता येणे सुद्धा गरजेचे आहे.
अशा रीतीने हे काही व्यवसाय आहेत की जे बंद होऊ शकत नाहीत परंतु त्यासाठी आपल्याकडे शिक्षण, त्याबद्दल चे ज्ञान, उत्तमरीत्या काम करता येणे,मार्केटिंग करण्याची योग्य पद्धत येणे गरजेचे आहे.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |