Business ideas for women | महिलांसाठी काही व्यवसाय कल्पना | Best business opportunities 2024 –

Business ideas for women | महिलांसाठी काही व्यवसाय कल्पना | Best business opportunities –

     हल्ली प्रत्येक महिलेला घराबाहेर पडणे शक्य होतेच असे नाही ,त्यासाठी विविध कारणे असतात. त्यामध्ये मुख्य कारण म्हणजे कुटुंबाची जबाबदारी आणि घराकडे व्यवस्थितरित्या लक्ष देऊन सर्व जबाबदारी पार पाडणे. अशीच इतर सुद्धा काही कारणे असू शकतात. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा काही बिझनेस आयडिया (Business ideas for women ) बघणार आहोत की त्या आपण घरबसल्या किंवा स्वतःच्या जोरावर सुरू करू शकतो म्हणजेच नोकरीसाठी आठ ते नऊ तास कुठेही गुंतून न राहता आपण हे व्यवसाय करू शकतो.

Business ideas for women | महिलांसाठी काही व्यवसाय कल्पना –
Advertisement

Business ideas for women
Business ideas for women

पुढे महिलांसाठी विविध व्यवसाय दिलेले आहेत ,परंतु हे व्यवसाय निवडत असताना किंवा यापैकी एखादे काम निवड करत असताना आपल्याकडे कोणते कौशल्य आहे किंवा आपल्याला कोणत्या कामांमध्ये रस आहे हे सर्वप्रथम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपल्याला एखाद्या कामामध्ये रस आहे परंतु त्याबद्दल आवश्यक कौशल्य नाही तर अशावेळी ते कौशल्य सर्वप्रथम आपण स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच योग्य ते कोर्सेस करून मग ते काम निवडावे किंवा तो व्यवसाय सुरू करावा. 

” कुठलाही व्यवसाय करत असताना वेळोवेळी आवश्यक ज्ञान मिळवणं, सहनशील असणं, इच्छाशक्ती असणे आणि सर्वात महत्त्वाचं सातत्य असणे खूप महत्त्वाचे आहे”.

Business ideas for women

Business ideas for women –

१. Health and Wellness | हेल्थ आणि निरोगीपणा –

हेल्थ आणि वेलनेस मध्ये सुद्धा विविध सर्विसेस आपण ऑफर करू शकतो ते पुढील प्रमाणे –

   – फिटनेस कोचिंग: पर्सनल ट्रेनिंग किंवा ऑनलाईन फिटनेस कोचिंग क्लासेस सुरू करू शकतो.

   – न्यूट्रिशन कन्सल्टिंग – डायट प्लॅन्स तसेच न्यूट्रिशन बाबत सल्ला देऊ शकतो.

   – मेंटल हेल्थ सर्विसेस: जर आपले यामध्ये शिक्षण झालेले असेल तर कौन्सिलिंग किंवा थेरपी सर्विसेस देऊ शकतो.

२. ई-कॉमर्स स्टोअर | E-commerce Store:

विविध वस्तूंचे आपण इ कॉमर्स स्टोअर सुरू करू शकतो.

– निश  प्रॉडक्ट्स : निष प्रॉडक्ट वर आपण फोकस केला पाहिजे. उदाहरणार्थ ,इको फ्रेंडली प्रॉडक्ट, हॅन्डमेड ड्राफ्ट्स  तसेच क्लोदिंग आणि इतर काही.

 – ड्रॉप शिपिंग: इन्व्हेंटरी मेंटेन न करता सप्लायर सोबत पार्टनिंग करून ड्रॉप  शिपिंग व्यवसाय सुरू करू शकतो यामध्ये सप्लायर्स डायरेक्ट कस्टमरला प्रॉडक्ट डिलिव्हर करतात.

३. फ्रीलायन्स सर्विसेस | Freelance Services:

– रायटिंग आणि एडिटिंग : कन्टेन्ट क्रिएशन तसेच एडिटिंग यांसारख्या सर्विसेस ऑफर करू शकता.

– ग्राफिक्स डिझाइनिंग: वेबसाईट साठी तसेच सोशल मीडिया मार्केटिंग, लोगो आणि इतर मार्केटिंग मटेरियल साठी डिझाईन सर्विसेस ऑफर करू शकता.

– वर्चुअल असिस्टंट: सोशल मीडिया मॅनेजमेंट तसेच कस्टमर सर्विस यांसारख्या सर्विसेस देऊ शकता.

४.  क्रिएटिव्ह आर्ट्स | Creative Arts:

 – फोटोग्राफी:विविध इव्हेंट साठी फोटोग्राफी करू शकता किंवा आपल्या आवडीनुसार वेगवेगळे फोटो काढून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड करून त्यावरून सुद्धा चांगली अर्निंग करू शकता. ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे उदाहरणं- Shutterstock 

– हॅन्डमेड गुड्स: Etsy सारख्या प्लॅटफॉर्म मार्फत विविध क्राफ्ट ज्वेलरी किंवा होम डेकोर ॲटम्सची विक्री करू शकता. 

५. एज्युकेशन आणि ट्युटोरिंग |  Education and Tutoring:

– ऑनलाइन कोर्सेस: तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे आणि अनुभव आहे उदाहरणार्थ विविध भाषा, कोडिंग किंवा एखादी कला तर यासंदर्भामधील कोर्सेस घेऊ शकता किंवा असे कोर्सेस तयार करून विक्री करू शकता.

– ट्युटोरिंग : आपल्याला ज्या विषयाबद्दल चांगले नॉलेज आहे त्याचे क्लासेस घेऊ शकतो.

६. इव्हेंट प्लॅनिंग | Event Planning:

– वेडिंग प्लॅनिंग : कपल्सला त्यांच्या लग्नाची प्लॅनिंग व्यवस्थित रित्या करण्यासाठी असिस्ट करू शकता.

 कॉर्पोरेट इव्हेंट्स: विविध कॉन्फरन्सेस तसेच मीटिंग कंपनी पार्टी यांसारखे इव्हेंट ऑर्गनाईज करू शकता.

७ . होम बेस्सड सर्विसेस | Home-based Services:

– इंटरियर डिझाईन: ऑफिस आणि घरासाठी डिझाईन आणि डेकोरेटिंग सर्विसेस ऑफर करता येऊ शकतात.

– केटरिंग: विविध कार्यक्रमांसाठी किंवा इव्हेंट साठी केटरिंग सर्विसेस देऊ शकता.

८. टेक्नॉलॉजी | Technology :

– डेव्हलपमेंट: विविध व्यवसायांसाठी तसेच ग्राहकांसाठी ॲप डेव्हलप करून देऊ शकता.

– टेक सपोर्ट: इंडिव्हिज्युअल साठी किंवा छोट्या व्यवसायांसाठी टेक सपोर्ट सर्विसेस ऑफर करू शकता.

९. बाल संगोपन सर्विसेस | Childcare Services:

– डे केअर: या प्रकारच्या सर्विसेस तुमच्या घरामध्ये एखाद्या रूममध्ये किंवा एखादे छोटेसे सेंटर सुरू करून सुरू करू शकता.

– नॅनी सर्विसेस: ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार बेबी सिटिंग सर्विसेस किंवा  नॅनी सर्विसेस ऑफर करू शकता. 

१०. ब्युटी आणि फॅशन | Beauty and Fashion:

– ब्युटी सलोन: मेकअप , हेअर स्टायलिंग तसेच इतर ब्युटी ट्रीटमेंट अशा प्रकारच्या सर्विसेस ऑफर करू शकता.

– फॅशन डिझाईन: फॅशन डिझाईन मध्ये सुद्धा व्यवसाय सुरू करायच्या खूप संधी आहेत जसे की स्वतः विविध प्रकारचे कपडे शिवून विक्री करू शकता किंवा फक्त त्या कपड्यांची डिझाईन करू शकता किंवा यामध्ये वर्क फ्रॉम होम जॉब करू शकता.

११. सस्टेनेबल आणि ग्रीन व्यवसाय | Sustainable and Green Businesses:

– इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स: इको फ्रेंडली प्रॉडक्ट्सची विक्री करू शकता.

 ग्रीन कन्सल्टिंग: याबद्दल ज्ञान असल्यास इतरांना या क्षेत्रामध्ये चांगले व्यवसाय कशाप्रकारे उभारायचे याबद्दल मार्गदर्शन करू शकतो.

   अशाप्रकारे असे विविध व्यवसाय ( Business ideas for women  )आहे की जे महिला स्वतः सुरू करू शकतात. आपल्या आवडीनुसार आपल्याकडे असणाऱ्या कौशल्यानुसार आपण व्यवसायाची निवड करू शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment