CGTMSE scheme | Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises Scheme | सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट | क्रेडिट गॅरंटी स्कीम | Best Business loan Schemes 2024

CGTMSE scheme | Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises Scheme | सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट | क्रेडिट गॅरंटी स्कीम –

     बऱ्याच लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो परंतु आर्थिक अडचणीमुळे किंवा भांडवल उपलब्ध नसल्याकारणाने ते शक्य होत नाही आणि अशातच जर कर्ज घ्यायला गेले तर तारण ठेवण्यासाठी काही नसल्याने सुद्धा कर्ज मिळत नाही. परंतु केंद्र सरकार तर्फे तसेच राज्य सरकार तर्फे वेगवेगळ्या योजना जनतेसाठी राबवल्या जात असतात त्यापैकीच एक अशी योजना आहे की ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना विनातारण कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध होते या योजनेबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत,ती योजना आहे CGTMSE scheme / क्रेडिट गॅरंटी स्कीम.

Advertisement

CGTMSE scheme

CGTMSE scheme | क्रेडिट गॅरंटी स्कीम – 

– ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे परंतु कर्जासाठी ते तारण न देऊ शकणार असल्यास या योजनेअंतर्गत त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे आणि सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

– तसेच भारतामधील उद्योगांच्या विकासामध्ये “सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट” या योजनेमुळे हातभार लागतो आहे.

– कर्ज घेण्यासाठी या योजनेअंतर्गत कोणतीही मालमत्ता तारण ठेवण्याची गरज नाही.

– या योजनेमुळे उद्योग वाढीला सुद्धा चालना मिळत आहे.

– या योजनेचा खूप मोठा फायदा म्हणजे विनातारण कर्ज मिळते.

– या योजनेमुळे बरेचसे नवीन उद्योजक तयार होऊ शकतात आणि उद्योग वाढीला प्रोत्साहन सुद्धा मिळत आहे.

– बँकेला नवीन व्यवसायांना कर्ज देताना जास्त जोखीम घ्यावी लागत नाही.

– या योजनेमुळे व्यवसायांची संख्या वाढल्याने रोजगाराच्या नवनवीन संधी सुद्धा उपलब्ध होत आहेत.

– CGTMSE या योजनेअंतर्गत कर्जाची गॅरंटी घेतली असल्याने बँकांना सुद्धा या योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जामध्ये रिस्क कमी प्रमाणामध्ये असते.

पुढे दिलेल्या चार्ट प्रमाणे CGTMSE Scheme साठी फी लागू असते, ही फी कर्जदाराला भरावी लागते आणि ही फी वार्षिक असते.

स्लॅब (CGTMSE loan limit)फी चा दर (टक्केवारीमध्ये)
० – १० लाख ०.३७
१० लाख – ५० लाख ०.५५
५० लाख – १ करोड     ०.६०
१ करोड – २ करोड१.२०
२ करोड – ५ करोड  १.३५

– शेतीशी थेट निगडित व्यवसाय या योजनेअंतर्गत पात्र नाहीत.

– ही योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली त्यावेळी ट्रेडिंग व्यवसाय या योजनेसाठी पात्र नव्हते, परंतु आता या योजनेअंतर्गत ट्रेडिंग व्यवसाय सुद्धा पात्र आहेत.

– आपली वार्षिक उलाढाल किती आहे तसेच बँकेच्या इतर नियमानुसार आपण पात्र आहोत की नाही यानुसार या योजनेसाठी आपली पात्रता ठरवली जाते.

– वैयक्तिक मालकत्व, भागीदारी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, नोंदणीकृत कंपनी यांसारखे एम एस एम इ युनिट्स या योजनेसाठी पात्र राहतील.

– CGTMSE loan एप्लीकेशन फॉर्म

– बिज़नेस प्रोजेक्ट रिपोर्ट

– व्यापार इंकॉर्पोरेशन लेटर / कंपनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

– CGTMSE लोन कवरेज पत्र

– बँकेकडून कर्ज मंजूरीची प्रत

– बँके द्वारा आवश्यक इतर काही कागदपत्रे

– स्केड्यूल कमर्शियल बँक (SCB)

– सार्वजनिक क्षेत्रातील बँका

– प्रायव्हेट बँका

– ग्रामीण क्षेत्रीय बँका 

–  नॉन बैंकिंग फाइनेंशियल कंपनी (NBFC)

– स्मॉल इंडस्ट्रियल डेवलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI)

– राष्ट्रीय लघु उद्योग निगम (NSIC)

– उत्तर पूर्वी विकास वित्त निगम लिमिटेड (NEDFI)

– क्रेडिट गॅरंटी स्कीम साठी अर्ज करायचा असेल बँकेमध्ये जाऊन यासंदर्भात लेखी कळवू शकता, त्यानंतर बँक CGTMSE कडे ऑनलाइन अर्ज सादर करते.

⭕ व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर मिळवा व्यवसायासाठी कर्ज..

⭕ Government Loan Schemes 

⭕ जाणून घ्या कोणत्या सरकारी योजना आहेत…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.viral-talk.in/government-loan-schemes/?amp=1

⭕ व्यवसाय सुरू करायचा असल्यास मिळवा दहा लाख ते एक कोटी पर्यंत कर्ज..

⭕ जाणून घ्या काय आहे योजना…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment