CGTMSE scheme | Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises Scheme | सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट | क्रेडिट गॅरंटी स्कीम | Best Business loan Schemes 2024
CGTMSE scheme | Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises Scheme | सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट | क्रेडिट गॅरंटी स्कीम –
बऱ्याच लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो परंतु आर्थिक अडचणीमुळे किंवा भांडवल उपलब्ध नसल्याकारणाने ते शक्य होत नाही आणि अशातच जर कर्ज घ्यायला गेले तर तारण ठेवण्यासाठी काही नसल्याने सुद्धा कर्ज मिळत नाही. परंतु केंद्र सरकार तर्फे तसेच राज्य सरकार तर्फे वेगवेगळ्या योजना जनतेसाठी राबवल्या जात असतात त्यापैकीच एक अशी योजना आहे की ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना विनातारण कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध होते या योजनेबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत,ती योजना आहे CGTMSE scheme / क्रेडिट गॅरंटी स्कीम.
Table of Contents
CGTMSE scheme | क्रेडिट गॅरंटी स्कीम –
– ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे परंतु कर्जासाठी ते तारण न देऊ शकणार असल्यास या योजनेअंतर्गत त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे आणि सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
– तसेच भारतामधील उद्योगांच्या विकासामध्ये “सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट” या योजनेमुळे हातभार लागतो आहे.
– कर्ज घेण्यासाठी या योजनेअंतर्गत कोणतीही मालमत्ता तारण ठेवण्याची गरज नाही.
– या योजनेमुळे उद्योग वाढीला सुद्धा चालना मिळत आहे.
– शेतीशी थेट निगडित व्यवसाय या योजनेअंतर्गत पात्र नाहीत.
– ही योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली त्यावेळी ट्रेडिंग व्यवसाय या योजनेसाठी पात्र नव्हते, परंतु आता या योजनेअंतर्गत ट्रेडिंग व्यवसाय सुद्धा पात्र आहेत.
– आपली वार्षिक उलाढाल किती आहे तसेच बँकेच्या इतर नियमानुसार आपण पात्र आहोत की नाही यानुसार या योजनेसाठी आपली पात्रता ठरवली जाते.
– वैयक्तिक मालकत्व, भागीदारी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, नोंदणीकृत कंपनी यांसारखे एम एस एम इ युनिट्स या योजनेसाठी पात्र राहतील.
लोनसाठी आवश्यक कागदपत्रे | Necessary documents for loan –
– CGTMSE loan एप्लीकेशन फॉर्म
– बिज़नेस प्रोजेक्ट रिपोर्ट
– व्यापार इंकॉर्पोरेशन लेटर / कंपनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
– CGTMSE लोन कवरेज पत्र
– बँकेकडून कर्ज मंजूरीची प्रत
– बँके द्वारा आवश्यक इतर काही कागदपत्रे
CGTMSE scheme अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँका –
– स्केड्यूल कमर्शियल बँक (SCB)
– सार्वजनिक क्षेत्रातील बँका
– प्रायव्हेट बँका
– ग्रामीण क्षेत्रीय बँका
– नॉन बैंकिंग फाइनेंशियल कंपनी (NBFC)
– स्मॉल इंडस्ट्रियल डेवलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI)
– राष्ट्रीय लघु उद्योग निगम (NSIC)
– उत्तर पूर्वी विकास वित्त निगम लिमिटेड (NEDFI)
क्रेडिट गॅरंटी स्कीमसाठी अर्ज | Application Process of cgtmse scheme –
– क्रेडिट गॅरंटी स्कीम साठी अर्ज करायचा असेल बँकेमध्ये जाऊन यासंदर्भात लेखी कळवू शकता, त्यानंतर बँक CGTMSE कडे ऑनलाइन अर्ज सादर करते.
⭕ व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर मिळवा व्यवसायासाठी कर्ज..