Courier Franchise Business Ideas | कुरिअर फ्रँचायझी व्यवसाय –
पार्सल किंवा पॅकेजेस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवले जाते आणि त्यासाठी शुल्क आकारले जाते, ही सर्विस कुरिअर फ्रांचाईजी बिझनेस उपलब्ध करून देतात. कुरियर सेवा या विविध व्यवसायांसाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत कारण विविध व्यवसायांचे उत्पादने अगदी दूरपर्यंत पोहोचवण्याचे काम या करत असतात. आपण सुद्धा आपल्या स्वतःचा कुरिअर फ्रँचायझी व्यवसाय सुरू करू शकतो. चला तर जाणून घेऊयात अधिक माहिती…
1. व्यवसाय योजना /Business Plan –
– कुरिअर फ्रँचायझी व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय योजना तयार करणे महत्त्वाचे आहे.
– व्यवसाय योजनेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो:
ठिकाण, डिलिव्हरी स्थानिक ठिकाणी करणार की लांब अंतरावर सुद्धा करणार, लहान पार्सल किंवा अवजड पार्सल, मालवाहतूक करण्यासाठी कोणते वाहन वापराल, परवाने कोणते लागतील ….. यांसारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींचा विचार व्यवसाय करत असताना करणे गरजेचे आहे.
2 . वाहतूक नियोजन/ Transportation –
– कुरियर सेवा फक्त एका राज्यापूर्ती मर्यादित ठेवणार आहात की विविध राज्यांमध्ये सुरू करणार आहात हे ठरवणे गरजेचे आहे.
– त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी कोणते वाहने वापरणार आहात इतर राज्यांमध्ये कुरिअर सेवा सुरू करायची असल्यास विविध वाहनांचा विचार करू शकतात उदाहरणार्थ विमान, बोट,ट्रेन.
– वाहनाची क्षमता त्याचबरोबर इंधन कार्यक्षमता इतर सर्विसिंगचा खर्च यांसारखे घटक लक्षात घेऊन योग्य त्या वाहनाची निवड कुरिअर वाहतुकीसाठी करा.
3 . कायदेशीर आवश्यकता / Legal requirements –
– तुमच्या कुरिअर व्यवसायाची कायदेशीर संस्था म्हणून नोंदणी करा.
– एकल मालकी, भागीदारी किंवा खाजगी मर्यादित कंपनी सारखी व्यवसाय रचना निवडून कुरिअर सेवांसाठी आवश्यक परवाने आणि परवानग्या मिळवा.
4 . ठिकाण /location and infrastructure –
– कुरियर सेवा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक व्यवस्थित जागा निवडून त्या ठिकाणी ऑफिस सेट करा.
– ज्या सुविधांची आवश्यकता आहे त्यामध्ये गुंतवणूक करा जसे की विश्वसनीय वाहतूक व्यवस्था, पॅकेजेस साठी ट्रॅकिंग प्रणाली.
5 . उपकरणे /Equipments –
– कम्युनिकेशन करण्यासाठी, डिलिव्हरी मॅनेजिंग आणि ट्रेकिंग करण्यासाठी योग्य त्या टेक्नॉलॉजी मध्ये गुंतवणूक करा.
– त्याचबरोबर इतर आवश्यक उपकरणांची लिस्ट बनवा आणि त्यानुसार मार्केट रिसर्च करून योग्य त्या दरामध्ये उत्तम क्वालिटीचे उपकरणे खरेदी करा.
6 . स्टाफिंग / Staffing –
– नक्कीच कुरिअर सेवा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे त्यामध्ये वेअर हाऊस कर्मचारी,ड्रायव्हर्स, अकाउंटंट, सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह, पार्सल पीकर यांसारख्या विविध कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे.
– नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना ग्राहक सेवा, पॅकेज हाताळणी त्याचबरोबर सुरक्षा प्रोटोकॉल यावर आवश्यक ते प्रशिक्षण द्या.
7 . टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन –
– ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी त्याचबरोबर ट्रॅकिंगसाठी युजर फ्रेंडली अशी वेबसाईट त्याचबरोबर मोबाईल ॲप तयार करा.
– ऑर्डर डिस्पॅच करण्यासाठी तसेच ऑर्डर मॅनेजमेंट साठी योग्य ती सिस्टीम बनवा.
8 . नेटवर्किंग आणि पार्टनरशिप –
– ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, लोकल व्यवसाय आणि त्यासोबतच इतर संभाव्य ग्राहकांची सुद्धा संपर्क साधा.
– विश्वसनीय सप्लायर आणि सर्विस प्रोव्हायडर सोबत भागीदारी सुद्धा करू शकता.
9 . मार्केटींग आणि ब्रँडिंग –
– एक जबरदस्त लोगो आणि टॅग लाईन बनवा.
– आपल्या कुरियर सेवा व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी विविध मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरा.
– सोशल मीडिया मार्केटिंग ही हल्ली मार्केटिंग मधील एक महत्त्वपूर्ण अशी मार्केटिंग पद्धती आहे.
10 . प्राईस स्ट्रक्चर –
– आपल्या कुरियर सर्विसेस साठी योग्य ते प्राईस स्ट्रक्चर ठरवा.
– ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये जाहिराती किंवा विविध डिस्काउंट देण्याचा विचार सुद्धा करू शकता.
11 . कंपलाईन्स आणि रेगुलेशन्स –
– इंडस्ट्रीज रेगुलेशन्स आणि कंपलाईन्स स्टॅंडर्डस याबद्दल नेहमी माहिती घेत रहा.
– ऑपरेशन डेटा प्रोटेक्शन आणि प्रायव्हसी लॉ पाळत आहेत ह्याची खात्री करा.
12 . तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार करू शकता किंवा पुढे काही कुरियर सर्विसेस ब्रँड दिले आहेत त्यांची फ्रेंचाईजी घेऊ शकता :
– DTDC
– Day Xpress Courier and Cargo Services
– InXpress
– FedEx
– Bluedart
( यापैकी कुठल्याही कंपनी बद्दल डिटेल माहिती हवी असल्यास कमेंट करा )
नेहमी ग्राहकांच्या फीडबॅक नुसार तसेच इतर आवश्यकतेनुसार आपल्या कुरियर सर्विसेस मध्ये वेळोवेळी आवश्यक ते बदल करून सर्व परिस्थितीमध्ये कुरिअर सेवा व्यवस्थितपणे कशा देता येतील याचा विचार करणे गरजेचे आहे.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |
Watch Full Video-