सायबर कॅफे बिसनेस म्हणजे काय | What is cyber cafe business in Marathi
आपण अश्या Cyber Cafe Services Business Idea याबद्दल माहिती घेणार आहोत. ज्याठिकाणी Scholarship forms भरले जातात, CET, JEE, NEET यांसह अनेक परीक्षांचे फॉर्म्स भरले जातात. हॉस्टेल फॉर्म, डिप्लोमा, ITI, Engineering college admission असे अनेक फॉर्म्स भरले जातात. त्याचबरोबर सर्व सरकारी नोकऱ्यांचे फॉर्म्स भरले जातात. आणि ही प्रोसेस पूर्ण वर्षभर सुरु असते. आता नुकताच 10वी, 12वीचा निकाल लागला तर विद्यार्थी आता admission घेतात. CET ची परीक्षा देतात कॉलेज निवडतात. त्यानंतर नोकरी भरती प्रक्रिया सुरु असतात. हे पूर्ण वर्षभर सुरु असत. याव्यवसायात खूप डिमांड आहे. फक्त तसे व्यवसाय करणारे पाहिजे.
बिसनेस करण्यासाठी चांगले ठिकाण | Best location for business
तुम्ही अश्या ठिकाणी जर हा बिसनेस सुरु केला जिथे शाळा, कॉलेज, होस्टेल असेल ती सर्वात फायदेशीर जागा असेल किंवा ज्याठिकाणी बस stand असत तिथे जर सुरु केला तर ग्रामीण विभागातील मुल शाळा-कॉलेज मधून घरी शहरातून बसने ये-जा करतात तर तिथे सुद्धा चांगली मार्केटप्लेस आहे.
बिसनेस सुरु करण्यासाठी लागणारे साहित्य | Equipment to start business
- Computer
- Internet connection
- Printer and scanner (2 in 1 or separate)
- UPS
बिसनेस सुरु करण्यासाठी लागणारी गुंतवणूक | Investment for start business
- कम्प्युटर – 25,000 ते 30,000
- इंटरनेट कनेक्शन – 500 ते 1000/ per month
- प्रिंटर आणि स्कॅनर (2 in 1) – 15,000 ते 20,000
- UPS (optional) – ५ हजारांपासून सुरुवात
- शॉपसाठी लागणारे भाडे
- Tier 1 (Metro) cities – started from 8-10 thousand
- tier2-tier3 cities – started from 5-8 thousand
- Deposit in starting around 15-20k
एकूण रक्कम ५० ते ७० हजार रुपयांपर्यंत तुमच्या आवश्यकतेनुसार
बिसनेस मधून मिळणारा फायदा | Profit of business
प्रत्येक फॉर्मला governmenrt किंवा ज्या क्षेत्राचा फॉर्म असेल तर त्याच चलन ठरलेलं असत त्याच payment फॉर्म भरत असतांना करावे लागते. पण त्यासोबतच आपण एक फॉर्म भरण्याचे 100 रुपयांपर्यंत घेऊ शकतो. म्हणजे दिवसातून तुम्ही फक्त 5 जरी फॉर्म सुरुवातीला भरले तरी तुमची अर्निंग येथे 500 रुपयांपर्यंत रोज होणार आहे. आणि महिन्याला तुम्ही 15 हजार रुपयांपर्यंत सुरुवातील कमवू शकणार आहात. याच सारख तुम्ही जास्त फॉर्म्स भरले तर महिना ५० हजार रुपयांपर्यंत तुमची इन्कम जाऊ शकते किंवा त्यापेक्षाही जास्त.
बिसनेस ग्रो करण्यासाठी टीप | Tip for grow business
जर तुमच cyber cafe अश्या ठिकाणी आहे जिथे कॉलेज आहे किंवा असा परिसर जिथे मुल सरकारी नोकरीची तयारी करतात असे काही क्लासेस जवळ किंवा ईतर ठिकाण तर तुम्ही जर google वर खूप साऱ्या वेबसाईट आहेत किंवा youtube वर लहान मोठ्या रोज कोणत्या न कोणत्या सरकारी नोकरीच्या संधी येतात त्याबद्दल जरी रोजचे update तुमच्या शॉपच्या बाहेर एका board वर update करत गेले तर यामुळे मुल update सुद्धा पाहायला येतील तुमची फ्री मध्ये मार्केटिंग सुद्धा होईल आणि तुम्ही मुलांना फॉर्म सुद्धा भरून देऊ शकणार.
व्यवसाय कसा वाढवावा | How to expand business in Marathi
तुम्ही जर फॉर्म भरण्या सोबतच तुमच्या centerला csc सोबत जोडून आणि सेतू चे काही सर्विस दिली तर अजून तुमचा व्यवसाय वाढेल. त्यासाठी परीक्षा द्यावी लागते. पण तेथून तुम्ही संपूर्ण मार्केटसोबत तुमचा व्यवसाय करू शकतात.