दिवाळीमध्ये करता येणारे काही हटके व्यवसाय | Diwali Business

दिवाळीमध्ये करता येणारे काही हटके व्यवसाय | Diwali Business –

Advertisement

     दिवाळी काळात करता येणारे पारंपारिक असे व्यवसाय तर आपल्या सर्वांनाच माहीतच आहे परंतु आज असे काही व्यवसाय आपण बघणार आहोत की ते जरा हटके आहे आणि दिवाळीच्या काळात असे व्यवसाय सुरळीतपणे चालू सुद्धा शकतात. चला तर सुरुवात करूया …

१. रांगोळी काढून देणे ( Rangoli making business) –

घरासमोर छान पैकी मोठी रांगोळी काढावी असे बरेच जणांना वाटते परंतु सगळ्यांकडेच ही कला असतेच असे नाही आणि म्हणूनच जर तुमच्याकडे ही कला असेल तर नक्कीच तुम्ही इतरांना रांगोळी काढून देऊन त्याद्वारे कमाई करू शकता. यासाठी तुम्ही सोशल मीडियाची मदत घेऊ शकता. सोशल मीडियावर पेज किंवा अकाउंट तयार करून त्यावर तुम्ही यापूर्वी काढलेल्या रांगोळ्यांचे फोटोज अपलोड करू शकता जेणेकरून लोकांना तुमच्या जवळ असलेल्या कलेबद्दल माहिती मिळेल. तसेच किती साईजची रांगोळी काढण्यासाठी तुम्ही किती चार्जेस घेतात याची माहिती सुद्धा लोकांना द्या. अशाप्रकारे हा एक हटके आणि चांगला बिजनेस ठरू शकतो.

२ . घर सजावट करून देण्याचा बिझनेस ( Home decoration business ) –

दिवाळीच्या काळामध्ये आपलं घर छान सजलेलं दिसावं घरामध्ये अगदी प्रसन्न वाटावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु आजच्या धावपळीच्या काळात सगळ्यांकडेच इतका वेळ असतो असे नाही आणि म्हणूनच तुम्ही जर घर सजावट करून देण्याचा व्यवसाय सुरू केला तर नक्की हा व्यवसाय फायद्यात ठरू शकतो. यासाठी तुम्ही सोशल मीडिया द्वारे मार्केटिंग करू शकता आणि कस्टमरची ऑर्डर आल्यानंतर त्यांच्याशी त्यांच्या मनातील कल्पना जाणून घेऊन आपण सुद्धा वेगवेगळ्या थीम त्यांना दाखवून योग्यरीत्या आकर्षक असे सजावट त्यांना करून देऊ शकता आणि त्याद्वारे चांगली कमाई करू शकता.

३ . घराची साफसफाई करून देण्याचा व्यवसाय ( Home cleaning business) –

तसे तर नेहमीच आपले घर प्रत्येकजण स्वच्छ ठेवतात परंतु जी डीप क्लीनिंग असते ती दिवाळीच्या वेळी केली जाते. परंतु सगळ्यांकडेच ईतका वेळ असतो असे नाही आणि म्हणूनच काही लोक घराची साफसफाई सुद्धा इतर लोकांकडून करून घेतात म्हणूनच तुम्ही असा व्यवसाय सुरू करू शकता आणि एक छोटीशी टीम बनवून त्यांच्याकडून हे काम करून घेऊ शकता. तसेच बऱ्याचदा घरामध्ये झुरळ आढळतात म्हणून पेस्ट कंट्रोलचा सुद्धा यामध्ये समावेश करू शकता.

        आहे ना काहीतरी वेगळे व्यवसाय….? या पूर्वी आपण दिवाळी फराळ व्यवसाय आणि दिवाळी मध्ये करता येणारे ५ व्यवसाय ह्या वर आर्टिकल लिहले आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version