Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana | ओबीसी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रुपये …| ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना I Best Government schemes 2024

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana | ओबीसी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रुपये …| ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना –

       शिक्षणासाठी ओबीसी कॅटेगिरी मधील विद्यार्थ्यांना 60 हजार रुपयांची मदत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने ( Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana )अंतर्गत मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विकास महामंडळाद्वारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची परिस्थिती गरिबीची आहे अशा विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमुळे खूप आधार मिळणार आहे आणि या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुद्धा सोयीस्कर होणार आहे. चला तर जाणून घेऊयात या योजनेबद्दल अधिक माहिती…

Advertisement

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना –

– ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विकास महामंडळातर्फे करण्यात आलेली आहे. 

– या योजनेमुळे ओबीसी कॅटेगिरी मधील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी मदत मिळणार आहे. 

– या योजनेद्वारे विविध स्तरावर भत्ते दिले जातात त्यामध्ये विद्यार्थी भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता यांचा समावेश आहे.

– ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत ओबीसी कॅटेगिरी मधील विद्यार्थ्यांना 60 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. 

– जिल्ह्यातील 600 म्हणजेच एकूण 21600 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Eligibility Criteria | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पात्रता –

– अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

– अर्जदार विद्यार्थी ओबीसी/एस्सी, एसटी प्रवर्गामधील असणे आवश्यक आहे.

– अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याकडे ओबीसी मागासवर्गीय कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

– अर्जदार विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी वस्तीगृहामध्ये किंवा भाड्याने रूम घेऊन राहत असावा.

– ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

– इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

– या योजनेसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड मिरीट लिस्ट द्वारे केली जाणार आहे, म्हणजेच ज्यांना शैक्षणिक वर्षांमध्ये चांगले पर्सेंटेज किंवा गुण मिळाले त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

– अपंग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, जिल्हा सर्जन कडून 40% पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

– अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महिला व बालकल्याण विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे.  

– विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

– विद्यार्थ्याचे आधार कार्ड बँक अकाउंट सोबत लिंक असावे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana benefits | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे फायदे –

– ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी साठ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

– जे विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी वस्तीगृहामध्ये राहतात त्यांना या योजनेमुळे विद्यार्थी भोजन भत्ता, निर्वाह भत्ता, निवास भत्ता असे विविध भत्ते मिळणार आहेत.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दिले जाणारे भत्ते :

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana

मुंबई, पुणे आणि इतर शहरांसाठी :

भोजन भत्ता :   32,000/- रुपये

निवास भत्ता :  20,000/- रुपये

निर्वाह भत्ता : 8,000/- रुपये

एकूण 60,000 /- रुपये

महानगरपालिका क्षेत्रासाठी :

भोजन भत्ता : 28,000/- रुपये

निवास भत्ता : 15,000/- रुपये

निर्वाह भत्ता : 8,000/- रुपये

एकूण 51,000 /- रुपये

जिल्ह्याच्या ठिकाणी :

भोजन भत्ता : 25,000/- रुपये

निवास भत्ता : 12,000/- रुपये

निर्वाह भत्ता : 6,000/- रुपये

एकूण 43,000 /- रुपये

तालुक्याच्या ठिकाणी : 

भोजन भत्ता : 23,000/- रुपये

निवास भत्ता : 10,000/- रुपये

निर्वाह भत्ता : 5,000/- रुपये

एकूण 38,000 /- रुपये

Dnyanjyoti Savitribai Phule Scheme Documents | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –

–  आधार कार्ड

– जात प्रमाणपत्र

– विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.

– विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे पासबुक.

– विद्यार्थ्याची इयत्ता 10 वी आणि 12 वी मार्कशीट.

– महाविद्यालय, विद्यापीठ, कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असल्याचा पुरावा (प्रवेश प्रमाणपत्र / पावती).

– रहिवासी दाखला

Dnyanjyoti Savitribai Phule Scheme  Application| ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज –

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावयाचा असल्यास ऑफलाईन पद्धतीने करता येऊ शकतो ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दल अजून माहिती उपलब्ध नाही.

– ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास जवळील समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी असणारा फॉर्म घ्यावा.

– फॉर्म मधील सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरावी व त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडावी. 

– त्यानंतर फॉर्म जमा करावा.

– आपण केलेल्या अर्जाची व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर आपण ह्या योजनेसाठी पात्र असू तर या योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकतो.

अधिक माहितीसाठी क्लीक करा …

https://iconikmarathi.com/wp-content/uploads/2024/04/202403111534453834.pdf

https://iconikmarathi.com/wp-content/uploads/2024/04/202312131645415734.pdf

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version