फोटो/व्हिडिओ काढून पार्ट इन्कम करण्याची सुवर्णसंधी | Best earning idea in 2022
मित्रांनो तुम्हाला पण फोटो किंवा व्हिडिओ काढून पैसे कमावयाचे आहे. तर तुम्ही नक्कीच फोटो आणि व्हिडिओ काढून पार्ट टाईम earning सुरु करू शकतात. तुम्हाला जर थोडेसे जरी चांगले फोटो काढता येत असतील आणि तुमच्या कडे एक मोबाईल आहे जेथून तुम्ही चांगल्या Quality चे फोटोस/व्हिडीओ क्लिक करू शकतात. तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये संपूर्ण माहिती मिळेल.
फोटो/व्हिडिओ काढून पैसे कसे कमवता येतात?
मित्रांनो पैसे कमविण्याचे अनेक असे मार्ग आहेत. जेथून आपण कमवू शकतात. त्यात आजच्या वर्तमान स्थितीत सर्वात प्रसिद्ध असा मार्ग म्हणजे ऑनलाइन पैसे कमविण्याचा मार्ग झाला आहे. ज्यात तुम्ही घरीबसून आपल्या वेळेनुसार काम करून ऑनलाईन पैसे कमवू शकतात. आणि या ऑनलाईन पैसे कमविण्याच्या मार्गातच एक असा सुद्धा मार्ग आहे. ज्यामध्ये आपण फोटो/व्हिडिओ काढून पार्ट टाईम करून इन्कम जनरेट करू शकतो.
फोटो/व्हिडिओ काढून पैसे कसे कमवावे?
काही अश्या वेबसाईट्स आहेत ज्या वेबसाईट फोटो/व्हिडिओची खरेदी विक्री करतात. जस Amazon, Flipkart या ई-कॉमर्स वेबसाईट वरून लोक ऑनलाईन वस्तू खरेदी करतात. आणि याच ई-कॉमर्स वेबसाईट वर सेलर्स सुद्धा असतात जे Amazon, Flipkart सारख्या वेबसाईट वर वस्तू विकतात आणि या ई-कॉमर्स कंपन्या फक्त मध्यस्थी करतात खरेदी आणि विक्री करणाऱ्यांमध्ये. तसच stock footage पुरविणाऱ्या वेबसाईट आहेत. या वेबसाईट अश्या लोकांना stock footage पुरवितात ज्या लोकांना आपल्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी, आपल्या content साठी, media साठी, जाहिरातीसह इत्यादी कामांसाठी कॉपीराईट फ्री असलेले फोटो/व्हिडिओ लागतात. तर या stock footage वेबसाईटवर ज्या लोकांकडे चांगले फोटो/व्हिडिओचे footage आहे ते येथे अपलोड करतात. ज्या लोकांना फोटो/व्हिडिओची आवश्यकता असते असे लोक येऊन त्या फोटो/व्हिडिओ चार्ज वेबसाईटला देऊन तिथून ते footage डाऊनलोड करतात. Footage साठी चार्ज केलेले पैसे काही % वेबसाईट ठेवत असते आणि काही % ज्यांनी ते फोटो अपलोड केले होते. त्यांना देत असते. तर तुम्ही सुद्धा तुमची फोटोग्राफीचा प्रवास सुरु करून पार्ट टाईम पैसे कमवू शकतात.
टॉप 10 Stock footage वेबसाईट जेथे तुम्ही फोटो/व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवू शकतात.