Financial Tips | आर्थिक नियोजन करण्यासाठी काही बेसिक पण महत्वपूर्ण टिप्स | Best Financial tips –

Financial Tips | आर्थिक नियोजन करण्यासाठी काही बेसिक पण महत्वपूर्ण टिप्स | Best Financial tips –

     जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपले आर्थिक नियोजन व्यवस्थित रित्या व्हावे ,तसेच आपल्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात आणि बचत सुद्धा व्हावी असे वाटते. त्या परीने प्रत्येक व्यक्ती प्रयत्न सुद्धा करत असते. पुढे अशा काही फायनान्शिअल टिप्स दिल्या आहेत की ज्याचा उपयोग नक्कीच तुम्हाला होऊ शकतो.

Advertisement

१. बचत/दर महिन्याला आपण जेवढे पैसे कमावतो त्यापैकी 20 टक्के रक्कम बाजूला ठेवा –

आपण जर दर महिन्याला आपण जे काही पैसे कमावतो त्यापैकी 20 टक्के रक्कम जर बचत केली तर नक्कीच या बचतीचा फायदा भविष्यामध्ये आपल्याला होईल तसेच ही रक्कम योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करून सुद्धा चांगली सेविंग करता येऊ शकते.

२ . अंदाजे सहा महिन्यासाठी तुम्हाला जो काही खर्च येतो तेवढ्या अमाऊंटचा इमर्जन्सी फंड बनवा.

प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली वेगळी असते आणि प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला येणारा खर्च सुद्धा वेगळा असू शकतो. जर आपण आपल्याला महिन्याला ज्या काही गोष्टी लागतात उदाहरणार्थ भाजीपाला, किराणा, तसेच घराचे किंवा गाडीचे हप्ते, दवाखाना खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च किंवा इतर खर्च या सर्वांचा एक अंदाज काढून तुम्हाला सहा महिन्यांसाठी जो काही खर्च येतो तेवढ्या रकमेचा तुम्ही एक इमर्जन्सी फंड तयार करून ठेवू शकता. या इमर्जन्सी फंड मुळे भविष्यामध्ये जर काही अडचण अचानकपणे उद्भवली तर नक्कीच या इमर्जन्सी फंड चा उपयोग तुम्हाला होईल.

३ . एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स बनवा.

ही टीप अत्यंत महत्त्वाची आहे आपल्याकडे नक्कीच एकापेक्षा अधिक इनकम सोर्स असणे गरजेचे आहे. जर भविष्यामध्ये एका सोर्स थ्रू येणारा इन्कम जर बंद झाला तर आपल्याकडे नक्कीच दुसरा ऑप्शन उपलब्ध पाहिजे त्यासाठी अधिक इनकम सोर्स बनवणे नक्कीच गरजेचे आहे.

( आपल्या IcoNik Marathi YouTube चॅनलवर खूप साऱ्या income ideas उपलब्ध आहेत, चेक करू शकता.)

उदाहरण घ्यायचे झाले तर कोरोना काळामध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यापैकी बरेच जण फक्त नोकरीवर अवलंबून होते काहींकडे शेतीही नव्हती आणि दुसरा पर्याय सुद्धा उपलब्ध नव्हता अशा व्यक्तींना जगणे सुद्धा कठीण होऊ लागले होते. परंतु जर तुमच्याकडे इतर इन्कम सोर्स उपलब्ध असला तर अशी वेळ कधी येणार नाही म्हणूनच आपण नोकरी करत असो किंवा व्यवसाय करत असू तरीसुद्धा काहीतरी इतर इन्कम सोर्स आपल्याकडे असणे नक्कीच गरजेचे आहे.

४ . जर कर्ज घेण्याची गरज नसेल तर कर्ज घेऊ नका –

बरेच व्यक्ती ज्यावेळी कर्जाची आवश्यकता असते त्यावेळेस कर्ज घेतात परंतु काही व्यक्ती असेही असतात की गरज नसताना सुद्धा कर्ज घेतात आणि नंतर कर्ज भरणे कठीण होऊन जाते त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीसाठी कर्ज घेत आहोत, ती गोष्ट खरोखर सध्या गरजेची आहे का, घेतलेले कर्ज आपण कशा रीतीने फेडू शकू अशा सर्व गोष्टींचा विचार करूनच मग कर्ज घ्यावे अन्यथा गरज नसेल तर कर्ज घेणे टाळावे.

५ . जोपर्यंत आपल्याकडे काही बचत किंवा संपत्ती तयार होत नाही तोपर्यंत अनावश्यक शौक किंवा हौस पूर्ण करणे टाळावे.

बऱ्याचदा काही गोष्टींची आपल्याला हौस असते परंतु त्या गोष्टीची गरज नसते मग अशावेळी जर त्या गोष्टीची जास्त आवश्यकता नसेल आणि आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम नसू तर अशा गोष्टी घेणे नक्कीच टाळावे. नक्कीच हौस पूर्ण करणे यामध्ये काही चुकीची गोष्ट नाही परंतु जोपर्यंत आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत अनावश्यक गोष्टी घेणे नक्कीच टाळावे.

६ .  फायनान्सच्या संदर्भात अधिक माहिती मिळवत रहा.

आपल्याला जर आपल्या आर्थिक नियोजन व्यवस्थित करायचे असेल तर नक्कीच..

 – फायनान्स रिलेटेड पुस्तके वाचणे. 

 – सोशल मीडिया वरून किंवा योग्य त्या सोर्स वरून फायनान्स रिलेटेड माहिती मिळवणे.

– तसेच कोणत्या ठिकाणी आपण गुंतवणूक केल्यामुळे फायदेशीर ठरू शकते याची माहिती मिळवणे.

– तसेच वेगवेगळ्या स्कीम जाणून घेणे.

– अजून कोणत्या मार्गाने आपण इन्कम जनरेट करू शकतो याबद्दल माहिती मिळवणे.

ह्या गोष्टी करू शकतो.

या फायनान्शिअल टिप्स आर्थिक नियोजन व्यवस्थित रित्या करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment