10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट आणि विविध परीक्षांचे मोफत प्रशिक्षण | Free Tablet, Coaching for 10 passed students in 2022
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना महाज्योती या संस्थे अंतर्गत MHT-CET/JEE/NEET 2024 करीता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. यात विद्यार्थ्यांना MHT-CET/JEE/NEET या परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण, या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅबलेट सोबतच इंटरनेट आणि या परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक दिली जाणार आहेत. या योजनेत तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर खालील माहिती वाचा जर तुम्ही यात पात्र असणार तर नक्की अप्लाय करा.
योजनेच्या लाभासाठी पात्रता:
-
उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
-
ईतर मागासवर्गीय, भटक्या जमाती तसेच ईतर मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.
-
उमेदवार नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावा/असावी.
-
ज्या उमेदवारांनी 2022 मध्ये 10 वी परिक्षा दिलेली आहे. उमेदवार अर्ज भरण्यास पात्र आहे. अश्या उमेदवारांनी अर्ज करतांना 10 वी परिक्षा प्रवेश पत्र जोडून अर्ज करावा.
-
शहरी विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या मार्च 2022 च्या दहावीच्या परीक्षेत 70% तर ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 60% मार्क्स असणे आवश्यक आहे.
-
उमेदवाराने 11वी Science(विज्ञान) या शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
या योजनेत मिळणारा लाभ
-
MHT-CET/JEE/NEET या स्पर्धा परीक्षांचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण मिळेल.
-
या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅबलेट मिळेल.
-
सोबतच मोफत दररोज 6 G.B.(जी.बी.) इंटरनेट डाटा मिळेल.
-
स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके मोफत मिळतील.
या योजनेत अर्ज करण्यासाठी कोणत्या Category तील विद्यार्थी पात्र आहेत.
OBC/VJNT/SBC
अर्ज कसा करावा?
-
महाज्योतीच्या संकेत स्थळावर जाऊन Notice Board मधील Application for MHT-CET/JEE/NEET 2024 यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
-
अर्जासोबत जातीचा दाखला, दहावी परीक्षा प्रवेशपत्र, अधिवास प्रवेशपत्र(Domicile Certificate) नॉन-क्रिमीलेयर, आधार कार्ड ही कागदपत्रे स्वःसाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावी.
-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जुलै 2022 असेल. ऑफलाईन किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्ज करतांना ऑनलाईन अपलोड करण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
-
10वी बोर्ड परीक्षेतील हॉल तिकीट
-
10वी चे मार्कशीट
-
Cast सर्टफिकेट
-
आधार कार्ड
-
नॉन-क्रिमीलेयर
-
डोमासाईल
-
पासपोर्ट फोटो
-
स्वाक्षरी(स्कॅन केलें फोटो)
-
बोनाफाईड(असल्यास)
टीप – वरील सर्व कागदपत्र तुम्हाला JPG format मध्ये अपलोड करावे लागतील.
अप्लाय करण्याची शेवटची दिनांक – 30 जुलै 2022
संपूर्ण माहितीसाठी – क्लिक करा.
अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा.
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम
Advertisement