Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana  | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana  | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना –

     केंद्र सरकार तर्फे तसेच राज्य सरकार तर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. परंतु जनतेपर्यंत सर्वच योजनांची माहिती पोहोचतेच असे नाही बऱ्याच व्यक्तींना तर सरकारतर्फे कोणत्या योजना राबवल्या जातात याबद्दल माहिती सुद्धा नसते. आपल्या वेबसाईटवर आपण वेगवेगळ्या योजनांची माहिती घेऊन येत असतो आज सुद्धा अशाच एका योजनेबद्दलची माहिती आपण बघणार आहोत ती योजना आहे “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना.”

Advertisement

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana  | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना –

– शेती संबंधित कुठलेही काम करत असताना शेतकऱ्यांवर कुठलीही समस्या ओढवली ,अपघात झाला , मृत्यू झाला किंवा कोणताही अवयव निकामी झाला तर अशावेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत आर्थिक सहाय्य केले जाते. 

– नक्कीच शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.

– कुठल्याही आपत्तीमुळे जर समजा एखाद्या कुटुंबामधील शेतकऱ्याचा जर मृत्यू झाला तर खूप मोठे दुःख आणि आर्थिक समस्या सुद्धा त्या कुटुंबावर ओढवते याच परिस्थिती मधून बाहेर काढण्यासाठी या योजनेमार्फत आर्थिक सहाय्य केले जाते.

– ही योजना महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांसाठी लागू आहे.

– ३२.२३ रुपये इतकी कमी रक्कम या योजनेअंतर्गत आकारली जाते आणि ही रक्कम राज्य सरकार मार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत भरली जाते. ही रक्कम सरकार भरत असल्याकारणाने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नाही.

आपत्ती –

– पूर

– रस्ता अपघात,

– सर्पदंश

– विंचूदंश

– वीज पडल्याने मृत्यू

– विजेचा शॉक

– नैसर्गिक आपत्ती

– शेती संबंधित काम करत असताना मृत्यू ओढावल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व.

– कीटकनाशक तोंडात गेल्याने विषबाधा होऊन मृत्यू 

– जनावराच्या हल्ल्याने मृत्यू 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत मिळणारे लाभ  –

– शेतीसंबंधी काम करत असताना कुठल्याही प्रकारचा अपघात झाला किंवा कोणताही एक अवयव जर निकामी झाला तर त्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये विमा दिला जातो.

– शेतीसंबंधी कामे करत असताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला किंवा दोन अवयव निकामी झाले किंवा डोळे गेल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपये विमा नुकसान भरपाई म्हणून दिला जातो.

– जर शेतीसंबंधी मध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना अपंगत्व आले तर एक लाख रुपये या योजनेमार्फत शेतकऱ्यांना उपचारासाठी मिळतो.

– शेती संदर्भामधील कामे करत असताना जर समजा त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये इतके आर्थिक सहाय्य या योजनेमार्फत केले जाते.

– शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबांना मिळणारा लाभ डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर DBT द्वारे दिला जातो.

पुढील कारणांसाठी ही योजना लागू होत नाही –

– विमा योजना लागू होण्यापूर्वी असलेले अपंगत्व

– आत्महत्या

– अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे झालेला मृत्यू

– भांडण करताना किंवा इतर काही गुन्हा करत असताना दुखापत झाल्यास

– नैसर्गिक मृत्यू

– आजारपणा मधील मृत्यू

– शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव जर झाला तर त्यामुळे झालेला मृत्यू

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Documents –

– शिधापत्रिका (रेशनकार्ड)

– बँक अकाऊंट डिटेल्स

– अपघात झालेला असल्यास प्रथम माहिती अहवाल

– मृत्यू किंवा अपघाताचा दावा करण्यासाठी अर्ज

– मृत्यू झालेला असल्यास मृत्युपत्र

– शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या शेतजमिनीचा ७/१२ व ८ अ

– अपघात झालेल्या ठिकाणचा संपूर्ण पंचनामा केल्याचा अहवाल

– पोस्ट मॉर्टम अहवाल

– कृषी अधिकारी यांचे पत्र

अर्ज –

अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरता येतो.

घटना झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जाणे गरजेचे आहे तरच या योजनेचा लाभ मिळू शकतो.  

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version