तुम्ही एकटेही सुरू करू शकता असा बिझनेस | Graphic Design Business | Best business ideas 2024 –
ग्राफिक्स डिझाईन व्यवसाय हा इफेक्टिव कम्युनिकेशन मटेरियल तयार करण्यासाठी तसेच व्यवसायांसाठी किंवा ऑर्गनायझेशन साठी ब्रॅण्डिंग करण्यासाठी खूप गरजेचा आणि महत्त्वपूर्ण असा व्यवसाय आहे. ग्राफिक डिझाईन मुळे मेसेजेस कन्वे करणे म्हणजेच योग्यरीत्या पोहोचवणे खूप सोपे होऊन जाते.त्याचबरोबर ब्रँडची ओळख निर्माण करण्यामध्ये सुद्धा ग्राफिक डिझाईनचा खूप मोठा वाटा आहे. त्याचबरोबर विविध आकर्षक असे इमेजेस, इनविटेशन कार्ड्स, बॅनर्स यांसारख्या अनेक गोष्टी ग्राफिक डिझाईन मुळे आपण करू शकतो. त्यामुळेच आजच्या डिजिटल युगामध्ये ग्राफिक डिझाईन व्यवसाय हा खरोखरच एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. तुमच्याकडे जर हे कौशल्य असेल किंवा नसेल तर तुम्ही ग्राफिक्स डिझाईन कोर्स करू शकता किंवा कोर्स न करता सुद्धा युट्युब च्या सहाय्याने ग्राफिक्स डिझाईन शिकू शकता आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
जाणून घेऊयात ग्राफिक्स डिझाईन ( Graphics Design Business ) व्यवसायाबद्दल अधिक माहिती…
Graphics Design Business I ग्राफिक्स डिझाईन व्यवसाय –
Table of Contents
१. ग्राफिक डिझाइन व्यवसायाला नाव द्या आणि व्यवसायासाठी लोगो तयार करा | graphic design business name and logo –
– ग्राफिक डिझाईन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्या व्यवसायाला आकर्षक आणि लोकांच्या लक्षात राहण्यासारखे योग्य ते नाव द्या.
– आपल्या व्यवसायासाठी आकर्षक असा लोगो तयार करा.
२. तुम्ही कोणत्या सर्विसेस देणार आहात ते ठरवा | services –
लोगो डिझाइन, पॅकिंग आणि लेबल डिझाइन, इनविटेशन कार्ड डिझाईन, बॅनर डिझाईन, वेबसाइट डिझाइन किंवा इतरही ग्राफिक डिझाईनच्या खूप सार्या कल्पना आहेत. तुम्ही कोणकोणत्या सर्विसेस देणार आहात त्या सर्विसेसची लिस्ट तयार करा.
३. ग्राफिक डिझाईन व्यवसायासाठी लक्षीत ग्राहक ओळखा | Target audience for Graphic Design Business –
ग्राफिक डिझाईन व्यवसायासाठी तुम्ही कोणत्या ग्राहकांना केंद्रित करणार आहात म्हणजेच तुम्ही थेट व्यावसायिक, किंवा मोठ्या कंपनी यांना टारगेट करणार आहात की इतर ग्राहकांना टार्गेट करणार आहात ते ठरवा.
४.तुम्ही किती चार्जेस घेणार आहात ते ठरवा | Charges –
ग्राफिक डिझाईन व्यवसाय करत असताना तुम्हाला महिन्याला साधारणतः किती कमाई करायची आहे तसेच तुमचे ध्येय काय आहे ते पूर्ण करण्यासाठी किती क्लायंटची आवश्यकता भासणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करून कोणत्या डिझाईनसाठी किती शुल्क आकारायचे हे तुम्ही ठरवू शकता.
५. तुम्हाला नवीन डिझाइन क्लायंट कसे सापडतील?
New clients for Graphic Design Business –
– ग्राफिक डिझाईन व्यवसायासाठी नवनवीन क्लाइंट शोधण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांची एक लिस्ट तयार करा.
– विविध मार्केट प्लेस किंवा अजून कोणते मार्ग आहेत याची यादी तयार करा. आपल्याजवळ यादी असल्यामुळे आपल्याला योग्य दिशा मिळत राहील.
– तसेच सोशल मीडिया वर सुद्धा आपला प्रेझेन्स दर्शवा, सोशल मीडियावरून सुद्धा अनेक क्लायंट आपल्याला मिळू शकतात.
६ . ग्राफिक डिझाईन व्यवसायासाठी ग्राहक आपल्यासोबत दीर्घकाळ जोडून राहावे यासाठी काय केले पाहिजे ?
– आपल्याकडे जे ग्राहक येतात त्यांचे समाधान होईपर्यंत डिझाईन मध्ये चेंजेस करण्यासाठी तयार असले पाहिजे.
– तसेच आपल्याला योग्य वाटणारी डिझाईन आपल्या ग्राहकांना ती डिझाईन कशी योग्य आहे हे योग्यरीत्या समजावून सुद्धा गरजेचे आहे कारण बऱ्याचदा काही ग्राहकांना नवनवीन गोष्टींबद्दलची माहिती नसते त्यामुळे गैरसमज होऊ शकतात.
– आपल्याकडे येणारे ग्राहक पुन्हा आपल्याकडे येण्यासाठी त्यांना मंथली सर्विसेस देऊ शकतात तसेच डिस्काउंट किंवा विविध ऑफर्स सुद्धा त्यांना देऊ शकता.
७. ग्राफिक्स डिझाईन व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी ?
Graphic design business marketing –
– इतर व्यवसायांची मार्केटिंग करण्यासाठी त्या व्यवसायासाठी विविध बॅनर्स किंवा वेगवेगळ्या एडवर्टाइजिंग पद्धती वापराव्या लागतात परंतु ग्राफिक्स डिझाईन व्यवसायासाठी आपण जे काही काम करतो त्या कामावर कुठेतरी कॉर्नरला आपल्या व्यवसायाचे नाव आणि आपला मोबाईल नंबर किंवा वेबसाईट द्यावी, असे केल्यामुळे आपोआपच आपल्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचते.
– ग्राफिक डिझाईन व्यवसायासाठी क्रिएटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे तसेच अनुभव, अपडेट राहणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे.
– आपल्या क्लायंटचे डिझाईन जर एखाद्या दुसऱ्या क्लायंटला आवडले तर आपोआपच आपले क्लायंट वाढत जातात, म्हणूनच ग्राफिक डिझाईन व्यवसायामध्ये क्रिएटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे ज्यामुळे आपली छाप इतरांच्या मनामध्ये उमटते.
अशाप्रकारे ग्राफिक डिझाईन व्यवसाय अगदी स्वतः एकट्याने सुद्धा आपण सुरू करू शकतो. या व्यवसायासाठी जास्त गुंतवणुकीची सुद्धा आवश्यकता नाही हल्ली प्रत्येकाकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप असतेच परंतु अगदीच हेही नसेल तर आपल्या मोबाईल वरून सुद्धा आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो आणि एकदा की आपल्याकडे भांडवल तयार झाले की पुढील सेटअप आपण करू शकतो.