Parivartan ECSS Programme हा HDFC Bank च्या Parivartan उपक्रमाअंतर्गत चालवला जाणारा शिष्यवृत्ती व आर्थिक सहाय्य कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम विशेषतः असे विद्यार्थी ज्यांचे गुण चांगले आहेत पण आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशांना मदत करण्यासाठी आहे. तसेच मागील परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.
HDFC Bank Scholarship 2025 पात्रता (Eligibility)
या कार्यक्रमासाठी तीन प्रमुख श्रेणी आहेत – शाळा, पदवी आणि पदव्युत्तर.
सामान्य अटी
अर्जदार भारतीय नागरिक असावा.
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹2,50,000 पेक्षा जास्त नसावे.
मागील वर्षीच्या परीक्षेत किमान 55% गुण मिळालेले असावेत.
मागील तीन वर्षांत वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकट आलेले असल्यास प्राधान्य दिले जाते.
श्रेणी-निहाय पात्रता
शाळा / ITI / Polytechnic / Diploma शिकणारे विद्यार्थी
अंडरग्रॅज्युएट (UG) – सामान्य व व्यावसायिक कोर्सचे विद्यार्थी
पोस्टग्रॅज्युएट (PG) – सामान्य व व्यावसायिक कोर्सचे विद्यार्थी